RTE 25 % दुर्बल व वंचित घटक प्रवेश 2023-2024, RTE 25% Admission

 RTE २५ % दुर्बल व वंचित घटक प्रवेश 2023-2024




RTE 25 % दुर्बल व वंचित घटक ऑनलाईन  प्रवेश यादी  2023-2024 व इतर सर्व RTE प्रवेश साठी येथे click करा.


OR


RTE प्रवेश सूचना 

  • आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.
  • आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
  •  निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 22 मे 2023 पर्यंत आहे.
  •  निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
  •  ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये. पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा.
  •  अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
  •  प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
  •  निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.


                                       

RTE अर्ज 

शिक्षक संचालक मा.श्री.शरद गोसावी यांच्या दि १७ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023-2024 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील. अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.



     

                          सन 2023-24 या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम 12 1 cनुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थ साहित्य शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. सबब बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया दिनांक 1 मार्च 2023 दुपारी 3 ते दिनांक 25 मार्च 2023 रात्री 12 वाजेपर्यंत सदर सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरणे ,प्रवेश प्रक्रिये करता आवश्यक्य कागदपत्र आणि इतर अनुषंगिक बाबींबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत.

 1. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना:

 १. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम 12 एक सी नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसाहित शाळा ,खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिये करता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या   संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पूर्ण करावी.

2. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.


 वंचित गटातील बालकांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.

3. आर्थिक वर्षांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे. अशा पालकांच्या बालकांच्या आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो. 

4. पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिये करता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी.

5. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतची हवाई अंतर हे गुगल मॅप निश्चित करावयाच्या असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात ठेवून पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाणी निश्चित करण्याकरता तो बोलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांची निवासस्थानाची लोकेशन अचूक नमूद करावे.

 6. प्रवेश प्रक्रिये बाबत विहित मुदती मध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब शक्य तितक्या लवकर परिपूर्ण अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.

 7. प्रवेश प्रक्रिये बाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्यांची निराकरण करण्यात यावे.

 8. पालकांनी ऑनलाइनच अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी. उदाहरणार्थ घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, इत्यादी 

9. ज्या पालकांनी यापूर्वी आर टी ए 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

10 यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवास प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याची निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.

 11. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नयेत.

अधिक व सविस्तर माहिती साठी खालील परिपत्रक वाचा. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.