शासकीय अधिकारी कर्मचार्यांचा ड्रेस कोड कसा असावा ? शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांचा पेहराव पोशाख नियमावली

 शासकीय अधिकारी कर्मचार्यांचा ड्रेस कोड कसा असावा ? शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांचा पेहराव पोशाख नियमावली



महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि ८ डिसेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार.....
        मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी (ज्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना विविध शासकीय परिपत्रकांमुळे गणवेश नेमून दिलेली देण्यात आले आहेत असे शासकीय कर्मचारी वगळता) यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
अ ) सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्याना शोभनीय असावा.
 ब) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव  हा व्यवस्थित असावा जसे महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार / चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट  तसेच आवश्यकता असल्यास दुप्पटयासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट , पॅन्ट / ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करू नये.
क) यापूर्वीच्या परिपत्रकांवर दिलेल्या सूचनेनुसार खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी ) खादी कपड्याचा पेहराव प्रदान करावा.
ड) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.
इ)  कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची विहित नमुन्यातील कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे.
 ई) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयांमध्ये शक्यतो चपला, सॅंडल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅंडल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लीपर चा वापर करू नये.
              वरील सूचना या सर्व राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी तसेच कंत्राटी तत्त्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती यांनाही लागू राहतील. सर्व मंत्रालय विभाग तसेच अधिनस्त शासकीय कार्यालय, महामंडळ, उपक्रम यांनी त्यांच्याद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी कर्मचारी तसेच व्यावसायिक सल्लागार यांनाही त्यांच्या शासकीय कार्यालयातील नियुक्तीच्या वेळेस या सूचना निदर्शनास आणाव्यात.
              शासन परिपत्रक दिनांक 16 मार्च 2021 च्या शुद्धिपत्रक नुसार दिनांक ८ डिसेंबर 2020 च्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक दोन मधील मुद्दा क्रमांक बी मधील "तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यामध्ये करू नये." या वाक्य ऐवजी "तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करू नये." असे वाचावे.

अधिक माहितीकरिता ८ डिसेंबर २०२० चे व १६ मार्च २०२१ चे परिपत्रक खाली पहा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.