राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा , शासन निर्णय GR

 राज्यगीत,जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा , शासन निर्णय GR 

 



     दि. १ फेब्रुवारी २०23 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या GR नुसार......!!!
1.कविवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह खालील प्रमाणे राज्य गीत स्वीकृत करण्यात येत आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे आहे. गीत खालील प्रमाणे.....


 २. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून सदर गीत दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगीकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे 1.41 मिनिटात वाजवता गाता येईल.
 ३. राज्यगीत गायन, वादन या संदर्भातील अवचित्याचे पालन करण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करण्यात यावे.
 एक.  विचारार्थ राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही राष्ट्रगीताचा मान सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.
 दोन. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्य गीताचे गायन/ वादन हे दोन्ही मुद्रित आवृत्ती सोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 
 तीन. एक मे महाराष्ट्र ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्य गीत वाजवले गायले जाईल.
 चार. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत /परिपाठ /प्रार्थना/ प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजवले/ गायले जाईल.
 पाच. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना, तसेच सर्व नागरिकांना संस्कृती ,सामाजिक आणि क्रीडा विषय कार्यक्रम इत्यादी मध्ये राष्ट्रगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजवण्यास गाण्यास मुभा राहील.
 सहा. राजकीय सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
 सात. राष्ट्रगीता बाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ती राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा  बाळगण्यात यावे. हे गीत वाजवताना / गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
 आठ. वाद्य संगीतावर आधारित या गीताची वाद्य देऊन पोलीस बँडमार्फत वाजवता येईल.
 नऊ. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पुस्तकांमध्ये या राज्य गीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
 दहा. या राज्य गीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनास कार्यालयात सूचना द्याव्यात.
 अकरा.माहिती व जनसंपर्क संचालनांकडून राज्य गीताचा प्रचार प्रसार करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे ,इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.
 बारा. या राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
 चार. सर्व शासकीय कार्यालय निम्न निम शासकीय कार्यालय, शासकीय अनुदानित व विनाअनुदानित आस्थापना ,स्थानिक स्वराज्य संस्था ,विद्यापीठ, शाळा, महाविद्यालय शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना राज्यकिताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामुळे उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याची आव्हान या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे.
 पाच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे अवचित्य साधून सदर गीत दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्राचे राज्यगीत  म्हणून अंगीकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे 1.41 मिनिटात वाजवता गाता येईल.
अधिक माहिती साठी खालील gr पहा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.