इयत्ता पहिली दाखल पात्र प्रवेश वय सन २०२3-2024
किमान व कमाल वयोमर्यादा
इ.1 ली प्रवेशाबाबत शासन निर्णय दिनांक 11.06.2010 नुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. यानुसार शाळा प्रवेशासाठी बालकाची वयोमर्यादा 6 वर्षे निश्चित करण्यात आली होती.परंतु 5 वर्षे वय पूर्ण झालेले बालकही प्रवेशास पात्र असतील असे नमूद केले होते.
त्यानंतर शासन निर्णय दिनांक 21.01.2015 व शासन शुद्धीपत्रक दिनांक 23.01.2015 नुसार बालकाचे शाळा प्रवेशाचे वय हे 6 वर्षे निश्चित करण्यात आले व त्यासाठी 31 जुलै हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला.
त्यानंतर शासन निर्णय दिनांक 25.01.2017 नुसार 6 वर्षे वय निश्चित करण्यासाठी मानिव दिनांक दुरुस्त करून तो 30 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला.
शासन निर्णय दिनांक 25.07.2019 नुसार मानिव दिनांकामध्ये आणखी 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले. म्हणजेच 2020-21 या शैक्षणिक वर्षापर्यंत आपण 15 ऑक्टोबर या दिनांकापर्यंत 6 वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना इ.1 ली मध्ये प्रवेश देऊ शकत होतो.
परंतु या निर्णयात बदल होण्यासाठी राज्यातील पालकांचा आग्रह होता. या लोकभावनेचा विचार करून शासनाने दिनांक 18.09.2020 रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून शाळा प्रवेशासाठी 6 वर्षे वय पूर्ण होण्यासाठीचा मानिव दिनांक 31 डिसेंबर असा करण्यात आला आहे. यानुसार आता 31 डिसेंबर पर्यंत 6 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या बालकांना आपण जून महिन्यात इ.1 ली मध्ये प्रवेश देऊ शकतो.
दिनांक 18.09.2020 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षापासूनच सुरु करण्यात आली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे जून 2023 मध्ये इ.1 ली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाची जन्मतारीख ही 6 वर्षे पूर्ण होण्यासाठी 31.12.2017 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
वरील शासन निर्णयांमध्ये बालकाच्या इयत्ता पहिली प्रवेशाबाबत किमान वयोमर्यादा निश्चित केलेली असली तरी कमाल वयोमर्यादा मात्र सांगितलेली नाही.
याबाबत मा.शिक्षण संचालक (प्रा.) यांनी दिनांक 20.12.2021 च्या पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी बालकाची जन्मतारीख "01.10.2016 ते 31.12.2017" या कालावधीतील असावी.
मा. शिक्षण संचालक (प्रा.) यांचे दिनांक 03.03.2022 चे आणि 19.01.2023 चे पत्र वाचून "इयत्ता पहिली प्रवेशासाठी बालकाचे 7 वर्षे वय पूर्ण असावे" असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. हे पत्र फक्त 25% RTE प्रवेशासाठी लागू असून त्यानुसार 01 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 ही वयोमर्यादा दिलेली आहे.RTE प्रवेशासाठी किमान वय 6 वर्षे व कमाल वय 7 वर्षे 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे.
इतर सर्व सर्वसाधारण बालकांच्या इयत्ता पहिली प्रवेशासाठी मा.शिक्षण संचालक (प्रा.) यांच्या दिनांक 20.12.2021 च्या पत्राचा संदर्भ घ्यावा. या संदर्भानुसार "01.10.2016 ते 31.12.2017" या कालावधीतील जन्मतारीख असलेल्या बालकांना आपण जून 2023 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकतो.
30 सप्टेंबर 2016 व त्यापूर्वीची जन्मतारीख असलेल्या बालकांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत लवचिकता ठेवावी किंवा अशा बालकांना वयानुसार इयत्ता दुसरीमध्ये प्रवेश देणे योग्य होईल.
श्री.दत्ता पाटील,बार्शी
9421874085
शासन निर्णय दि २७ जानेवारी २०२३ नुसार शाळा प्रवेशा बाबत खालील सूचना शासनाने दिल्या आहेत....
1.शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखील समिती म्हणून काम पाहिल. सदर समिती प्रवेश प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवेल.
2. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरून घ्यावा. सदर प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी असावी. प्रवेश अर्जावर पालक व विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असावेत. सदर प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्रप्रमुखास देण्यात येऊन एक प्रत शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावी.
3. विद्यार्थ्याचे प्रवेशी विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड सोबत जोडण्यात यावेत. प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड सादर करण्यात यावीत.
4. शिक्षणाधिकारी /,शिक्षण निरीक्षक,/ गटशिक्षणाधिकारी, /केंद्रप्रमुख यांनी वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पट पडताळणी पार पाडावी. शिक्षण अधिकारी ,शिक्षण निरीक्षक ,गटशिक्षणाधिकारी ,केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे हजेरीपटामध्ये नमूद विद्यार्थ्यांचे नाव व तपशील प्रवेश अर्जातील तपशीला सोबत पडताळणी करावी.
5.उपयुक्त पडताळणी दरम्यान शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांना काही विसंगती आढळल्यास त्यांनी याबाबत एका महिन्यात सखोल चौकशी करावी. अशा प्रकरणांमध्ये संबंधित शैक्षणिक संस्थेची आवश्यक्य रजिस्टर/ कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी ,शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांना राहतील. सदर चौकशीमध्ये काही गैर व्यवहार दुरुपयोग आढळून आल्यास शिक्षणाधिकारी /शिक्षण निरीक्षक/ ,गटशिक्षणाधिकारी, /केंद्रप्रमुख /यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व संचालकांच्या मान्यतेने संबंधित पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करावा.
6. काही कारणांमुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणांमध्ये बालकांचे व पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा.
7. उपरोक्त प्रमाणे अनिमित्त आढळून आलेल्या शैक्षणिक संस्थांची अनुदान परत घेण्याबाबत किंवा अनुदान थांबवण्याबाबत व शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांनी संचालकांमार्फत तात्काळ शासनास सादर करावा. शाळाने प्रत्येक महिन्याच्या शेवटी हजेरी पटाच्या प्रति शिक्षणाधिकारी /शिक्षण निरीक्षक/ गटशिक्षणाधिकारी /केंद्रप्रमुख यांना सादर कराव्यात.
9. खाजगी अनुदानित ,विना अनुदानित ,स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंअर्थ सहाय्यक शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या संबंधित संकेतस्थळावर योग्यरीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे याची शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख यांनी खात्री करावी.
अधिक माहिती व संदर्भांसाठी खालील दि २० डिसेंबर २०२१ चे परिपत्रक वाचा.
सन २०२३-२०२४ साठी RTE पहिली प्रवेश साठी उपयुक्त परिपत्रक खाली माहितीस्तव
9527593006
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .