"आजी आजोबा" दिवस उपक्रम
"आजी आजोबा" दिवस हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व सर्व शाळा स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून 'आजी आजोबा' दिवस साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जातो. त्यानुसार हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी शाळांमध्ये आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. या दिवशी शासकीय सुट्टी आल्यास त्याच्या पुढच्या कार्यालयात दिवशी या दिवसाची कार्यक्रम घेण्यात यावेत. तथापि या प्रस्तावित दिवशी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेकडून न करता आल्यास शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करावा व यानिमित्ताने राज्यस्तर, जिल्हा स्तर व शाळा स्तरावर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत. सदर दिवशी आजी-आजोबांकरता खालील प्रमाणे उपक्रम राबवण्यात यावेत.
1 सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून घ्यावा.
2. आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत ,गायन ,वादन, चित्रकला ,नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.
३. विटी दांडू ,संगीत खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही.
४. संगीत खुर्ची सारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
५. आजी-आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा.
६. पारंपारिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. (सदर बाब ऐच्छिक असावी).
७. महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
८. शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर करावेत.
९. आजीच्या बटव्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे, दहा झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे.
अधिक माहिती करीता खालील GR वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .