जिल्हांतर्गत बदली परिपत्रक दि २८ फेब्रुवारी २०२३ अर्थ व स्पष्टीकरण
उपसचिव महाराष्ट्र शासन मा. प्रशांत पाटील यांच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांची कार्यवाही वेळा पत्रकानुसार सुरू असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्रमांक एक, दोन, तीन ,चार, पाच, व सहा मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे.
शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील विशेष संवर्ग एक शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे. परंतु बदली प्रक्रिया राबवताना विशेष संवर्ग एक मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणे बाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यात टप्प्यात समाविष्ट झालेली आहेत. तसेच विशेष संवर्ग एक मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत तीन वर्षापेक्षा कमी झालेले आहे. अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणे बाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा विशेष संवर्ग एक मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही. अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे संदर्भ क्रमांक दोन येथील शिफारसीस अनुसरून शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील 1.8 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही अशा संवर्ग एक मधील शिक्षकांना बदलीसाठी होकार नकार देण्याची शेवटची एकमेव संधी देण्यात येत आहे. तसेच सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंती क्रम भरण्याची संधी देण्यात येत आहे.
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन पत्र दिनांक 11-2-2023 च्या वेळापत्रकात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर बाब सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यात यावी.
मा. प्रशांत पाटील उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या दुसऱ्या एका 28 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार दिनांक 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाअंतर्गत बदल्या या संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सद्यस्थिती सुरू असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्रमांक एक, दोन ,तीन चार व पाच कार्यवाही पूर्ण झालेली आहे. शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.7 नुसार बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा असे नमूद आहे. परंतु प्रत्यक्षात कालावधी नमूद करण्यात आलेला नाही. यास्तव असे स्पष्ट करण्यात येते की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक 1 मे 2023 ते दिनांक 15 मे 2023 पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्या परिस्थितीत दिनांक 16 मे 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.
अधिक माहिती साठी खाली दोन्ही परिपत्रके पाहू शकता.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .