नवोदय प्रवेश परीक्षा 2023, NVS ADMISSION TO CLASS VI (2023-24)

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-24 NVS ADMISSION TO CLASS VI (2023-24)



 

मुदत वाढली.......
अंतिम मुदत दि 15 फेब्रुवारी 2023




नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी ?
        नवोदय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना बऱ्याच वेळा सर्वरचा प्रॉब्लेम येऊन अर्ज भरले जात नाहीत,फॉर्म भरल्यानंतर बाहेर पडलं जात,काही tab open होत नाहीत, अशी तक्रार बऱ्याच शिक्षकांकडून होत आहे. तरी या संदर्भात खालील प्रकारे काळजी घेतल्यास आपला अर्ज 100% कमी वेळेत भरला जातो.
  •  आपण जो ब्राउझर वापरणार आहात त्याची हिस्ट्री क्लिअर करून घ्या.
  •  फॉर्म भरताना शक्यतो रात्री उशिरा किंवा सकाळी पहाटेची वेळ निवडा.
  •  फॉर्म भरण्यासाठी शक्यतो ब्रॉडबँड /वायफाय कनेक्शन असल्यास उत्तम. 
  • मोबाईलच्या net स्पीडला कंपनीनुसार थोडा प्रॉब्लेम येत आहे.बऱ्याचदा काही tab open होत नाहीत. फॉर्म भरल्यावर  save न होता बाहेर पडलं जात आहे .
  • browser change करून पहा( क्रोम /मोझीला/edge )
  • फॉर्म भरताना स्टेप बाय स्टेप थोडं थोडं थांबून थांबून भरा. 
  •  लिंक ओपन केल्यानंतर १ मिनिट थांबा. फॉर्म भरतेवेळी देखील सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर १ मिनिटं थांबा, त्यानंतरच फॉर्म सेव्ह & प्रिव्ह्यू करा.तसेच फायनल सबमिटला देखील थोडा वेळ थांबा. (थोडक्यात काय तर प्रत्येक स्टेपला थोड थोड थांबा.)
  • प्रत्यक्ष मोबाईल वरून देखील कमी वेळेमध्ये फॉर्म भरले जातात.
  • upload करावयाचे सही, फोटो, study certificate, रहिवासी प्रमाणपत्र हे आधीच scan करून साईज कमी करून तयार ठेवावे. 
  • scan करायच्या कागदपत्रांची size खालील प्रमाणे
photo & signature - 10 to 100 kb
रहिवासी प्रमाणपत्र आणि study certificate - 50 to 300 kb 
(साईज कमी करण्यासाठी  विविध पर्याय वापरू शकता.)
  •  फॉर्म भरत असताना सुरुवातीपासून सर्व details हे step by step भरावेत. मध्येच मागच्या step वर जाऊ नये. यामुळे वेळ वाचेल आणि form लवकर submit होईल.
  •  online फॉर्म भरत असताना सुरुवातीला Do you have adhar ? असे विचारले जाते. Yes or No. त्या ठिकाणी No हे option निवडा आणि त्या जागेवर पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र/आधार upload करा.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
  •  विद्यार्थी फोटो 
  • पालक सही 
  • विद्यार्थी सही
(Size:10-100 KB in .jpeg/.jpg format)
  •  पालक आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा 
  •  मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात download 
(Size:50-300 KB in .jpeg/.jpg format) 

संभाव्य निकालाची तारीख..... जून 2023

इतर महत्त्वाच्या बाबी

  •  विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे.
  •  ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजली जाईल.
  •  विद्यार्थी हा त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.
  •  विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक मे 2011 ते 3 एप्रिल 2013 दरम्यान असावी.
  •  विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2022 च्या आधी इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेला असावा.
  •  यापूर्वी नवोदयची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकत नाही.
  •  एकूण उपलब्ध जागांपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागाकरिता तर उर्वरित 25 टक्के जागा या सर्वांकरिता खुल्या असतील.


फॉर्म भरण्यासाठी लिंक...


दरवर्षीपेक्षा यावर्षी ऑनलाईन फॉर्म भरताना काही बाबीत बदल झालेला आहे तो बदल बघण्यासाठी सविस्तर या संकेतस्थळाला भेट द्या.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .