जिल्हांतर्गत बदली परिपत्रक दि 12 ऑक्टोबर 2022 विनंती व प्रशासकीय बदली
अर्थ व स्पष्टीकरण
परिपत्रक दि १२ ऑक्टोबर २०२२ नुसार......
जिल्हा अंतर्गत बदली शासन निर्णय दि ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णय विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना विवरण पत्र एक बदलीस पात्र शिक्षक मध्ये (पृष्ठ क्रमांक 17 वर ) नमूद केल्याप्रमाणे.....
अ) मला बदली नको असून प्रशासकीय बाबींमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा किंवा आ) मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील अशी तरतूद आहे.
३. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यासगटा समवेत विसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीबाबतच्या संदर्भीय क्रमांक एक येतील दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाचे विवरण पत्र एक बदलीस पात्र शिक्षक बाबत खालील प्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.........
जर एखाद्या शिक्षकांनी सदर विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेल्या उक्त अ येतील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदली वेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्ण प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवा जेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही , मात्र जर एखाद्या शिक्षकांनी सदर विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेला उक्त आ येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.
सदर बाबा जिल्हा अंतर्गत बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या मार्फत सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याची पोच संग्रही ठेवावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .