NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2022-2023
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NNMS आठवी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक 21 डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण 563 केंद्रावर घेण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे परिषदेच्या या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर १२ डिसेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर प्रवेश पत्रे विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
सदर प्रवेश पत्रात विद्यार्थ्यांची नाव ,वडिलांचे नाव, आडनाव ,आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही) तसेच जन्मतारीख ज्यात आधार कार्ड इत्यादींमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 20-12-2022 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.
प्रवेश पत्रासाठी येथे click करा.
OR
प्रवेश पत्रासाठी येथे click करा.
H
उत्तर द्याहटवाHii
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .