आंतर जिल्हा बदली कार्यमुक्ती बाबत परिपत्रक दि 2 डिसेंबर 2022
अर्थ व स्पष्टीकरण
सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतर जिल्हा बदली झालेल्या व अध्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत परिपत्रक दि २ डिसेंबर 202 रोजी निर्गमित झाले आहे.
या परिपत्रकानुसार....!!!
सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रिया अंतर्गत बदली झालेल्या सर्व जिल्हा परिषदेतील (ज्या जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा जास्त आहे अशा जिल्हा परिषदांसह) शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांनी खालील प्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.
1. सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये केवळ संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रिया अंतर्गत बदली झालेल्या व अद्याप पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांचे बदली वर्ष निहाय व विद्यमान जिल्ह्यातील सेवा जेष्ठता नुसार यादी करण्यात यावी.
2. सदर वर्ष निहाय यादीतील शिक्षकांना त्यांची विद्यमान जिल्ह्यातील सेवा जेष्ठता विचारात घेऊन प्रशासकीय कारणास्तव आवश्यकता असल्यास 2017 मध्ये संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे. त्यानंतर त्या पुढील वर्षी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे.
3. अशा शिक्षकांना बदली वर्ष व विद्यमान जिल्ह्यातील सेवा जेष्ठता विचारात घेऊन कार्यमुक्त करण्यात येत असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी व्यक्तिशः खात्री करावी.
4. एखाद्या प्रकरणी बदली वर्ष व सेवा जेष्ठता डावलून कार्यमुक्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
5. अशा शिक्षकांना कार्यमुक्त केल्यामुळे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे अधिक आहेत अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता अंतर्गत नेमणुकांद्वारे शिक्षकांची व्यवस्था करावी. यानंतर ही रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास पर्यायी व्यवस्थेचा विचार करता येईल.
6. राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे रिक्त पदाबाबत माननीय उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिका दाखल झाली असून सदर जनहित याचिका प्रकरणी शिक्षण संचालक प्राथमिक कार्यालय मार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र प्रणाली मार्फत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याने आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या पवित्र पोर्टलवर अचूकपणे नोंदवावी.
7. शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या प्रणालीवर शिक्षकांची रिक्त पदे नोंदवताना असे बदली झालेली व कार्यमुक्त करण्यात येत असलेले शिक्षक ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अशा सर्व शिक्षकांची पदे रिक्त पदे म्हणून दर्शवावीत जेणेकरून संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर पद संखे प्रमाणे शिक्षक उपलब्ध होतील.
8. तसेच असे शिक्षक बदलीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे. त्या जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील रिक्त पदी दर्शवताना सदर पदे भरण्यात आली असल्याचे गृहीत धरूनच रिक्त पदे दर्शवावीत जेणेकरून अशा जिल्हा परिषदांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार नाही
९. सन 2017 पासून शासनामार्फत विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणाली द्वारे राबवण्यात आलेल्या बदली प्रक्रियेतून अशा शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असल्यामुळे अशा शिक्षकांना कार्यरत जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करणे तसेच समोरील जिल्हा परिषदेत हजर करून घेणे कर्मप्राप्त आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना कार्यमुक्त न केल्यामुळे तसेच हजर करून न घेतल्यामुळे काही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील.
10. विद्यार्थ्यांची हित विचारात घेता 1 एप्रिल 2023 चे ते दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्ती बाबतचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 1 मे 2023 ते 31 मे 2023 या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.
11. सदरची नियमावली सन 2017 ते सन 2022 या कालावधीत केवळ संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी लागू राहील.
12. सदर सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून
त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .