शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 पाचवी व आठवी अंतरिम निकाल

 शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 पाचवी व  आठवी अंतरिम निकाल


विद्यार्थी निकाल स्वतंत्रपणे पाहण्यासाठी येथे click करा.

(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी फक्त विद्यार्थी सिट/परीक्षा नंबर आवश्यक )

शाळा निकाल एकत्रित पाहण्यासाठी येथे click करा. 

(शाळा निकाल पाहण्यासाठी शाळेचा Udise नंबर व Password आवश्यक)

            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी चा अंतरिम निकाल सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी  परिषदेच्या अधिकृत वरील संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वरील लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वरील संकेतस्थळावर थेट पाहता येईल. 

             विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये 7 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करता रुपये 50 याप्रमाणे शुल्काचे रक्कम ऑनलाइन पेमेंट द्वारे भरणे आवश्यक्य आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव ,आईचे नाव, शहरी ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत संबंधी शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, सदर ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त आणि कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीची आवश्यकता शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जा नुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत कळवण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

65 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .