Scholarship पाचवी-आठवी शिष्यवृत्ती 2022-2023 चे रजिस्ट्रेशन सह विद्यार्थी फॉर्म कसे भरावेत ?

 पाचवी-आठवी शिष्यवृत्ती 2022-2023 चे शाळा रजिस्ट्रेशन सह विद्यार्थी फॉर्म कसे भरावेत ?


रजिस्ट्रेशन साठी येथे click करा.

शाळा login साठी येथे click करा  


पेमेंट कसे करावे ?

  • सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी  डाव्या वाजूला वर असणाऱ्या फी पेमेंट या tab ला click करावे  .(खालील स्क्रीन मध्ये पहा.)


  • त्या नंतर प्रोसिड टू  पेमेंट या tab click करावे . ( खालील स्क्रीन मध्ये पहा.)

  • त्यानंतर  अशी स्कीन  open होईल .  कन्फर्म and पे लां click करावे. खालील स्क्रीन मध्ये पहा.


  • त्यानंतर अशी स्क्रीन  open होईल . आपणस पेमेंट चा उपलब्ध असेल त्या पैकी योग्य  पर्याय  निवडावा . कार्ड ची माहिती दिल्यानंतर आपणास मोबाईलवर  OTP मेसेज येईल , Otp टाकल्या नंतर आपले पेमेंट यशस्वीरीत्या पूर्ण होईल . त्या नंतर पेमेंट ची प्रिंट मारावी.अशा प्रकारे पेमेंट प्रकिया पूर्ण होईल . खालील स्क्रीन मध्ये पहा.



पाचवी-आठवी शिष्यवृत्ती 2022-2023 चे फॉर्म कसे भरावेत ?

  • प्रथम शाळेचे रजिस्ट्रेशन झाल्यावर  पाचवी आठवी शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी  शाळेच्या login वर जावून शाळा login करावे.शाळेचा udise व passward वापरून login केल्यावर खालील प्रमाणे होम पेज दिसेल.डाव्या बाजूला  वर पाचवी साठी पाचवी व आठवी साठी आठवीला click करा.

  • Registration ला click करा  म्हणजे खालील प्रमाणे स्क्रीन / फॉर्म open होईल. खालील स्क्रीन मध्ये पहा.

  • फॉर्म मधील सर्व माहिती भरा . स्टार केलेली माहिती बंधनकारक आहे .फोटो व सही १०० kb पेक्षा कमी असावा. सर्व माहिती काळजी पूर्वक भरा . माहिती चुकली असेल किंवा दुरुस्त करावयाची असेल तर पेमेंट करण्यापूर्वी कधीही दुरुस्त / EDIT करू शकता.

  • माहिती भरून झाल्यावर save & preview ला click करा .मग खालील प्रमाणे फॉर्म open होईल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
  • माहिती चेक करा. दुरुस्ती करायची असेल EDIT करा,  अन्यथा save करण्यासाठी submit करा. खालील स्क्रीन मध्ये पहा.
  • माहिती चेक करून Submit केल्यावर असा successfully (खालील स्क्रीन मध्ये पहा) चा मेजेस येईल. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्यावेत.सर्व  फॉर्म भरून झाल्यावर पेमेंट यशस्वीरीत्या भरून झाल्यावर आपली फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. ( फॉर्म भरताना चूक झाली असेल,बदल करावयचा असेल तर पेमेंट करण्यापूर्वी  एडीट / दुरुस्त करू शकता. पण एकदा पेमेंट केल्यास फॉर्म मध्ये बदल करता येत नाही.)






   रजिस्ट्रेशन कसे करावे ?
  •     विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी प्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे . रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील स्टेपने जा.                

  (प्रथमता https://www.mscepune.in/ या वेबसाईटवर जावे. डाव्या कोपऱ्यावर असलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 या टॅबला क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर  शिष्यवृत्ती परीक्षा 2023 याला क्लिक करावे किंवा  नोंदणी करण्याकरिता थेट लिंक वर जाण्याकरिता येथे click करा.)

  • आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी  २०२३ या tab मध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये शाळा नोंदणी आहे. त्या शाळा नोंदणीला क्लिक करावे.




  •  क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अशी स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये आपल्या शाळेचा यु डायस कोड टाकावा.  (खालील स्क्रीन मध्ये पहा.)


  • यु डायस कोड टाकल्यानंतर बाहेर क्लिक करावे. खाली शाळेच्या नावाच्या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव दिसेल. त्याच्या खाली इस दिस युवर स्कूल नेम ? नावाचा प्रश्न विचारला जाईल. त्या ठिकाणी असेल तरी yes म्हणावे, नसेल तर नो म्हणावे. जर आपली शाळा असेल तर येस म्हणावे. yes ला क्लिक करावे. (खालील स्क्रीन मध्ये पहा.)


  •  त्यानंतर आपल्या शाळेचा स्कूल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल खालील प्रमाणे आपण पाहू शकता. (खालील स्क्रीन मध्ये पहा.) 


  • या फॉर्म मध्ये  आपल्या शाळेची माहिती दिली जाईल. त्याच्यामध्ये काही अजून काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची पर्याय योग्य ते सिलेक्ट करावे लागतील. थोडक्यात शाळा व्यवस्थापन प्रकार, माध्यम व्यवस्थित निवडायचे आहे. त्यानंतर इतर सर्व पर्याय  व्यवस्थित सिलेक्ट करावेत. आपल्या शाळेचा मेल आयडी व मुख्याध्यापकाचा फोन नंबर व्यवस्थित नोंदवायचा आहे. मेल आयडीवर व दिलेल्या  मुख्याध्यापकाच्या फोन नंबर वर पासवर्ड जाणार आहे. त्याच्यामुळे मेल आयडी व मोबाईल नंबर व्यवस्थितच नोंदवावा. स्टार केलेली माहिती भरणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापकाची सर्व माहिती नोंदवायची आहे. (खालील स्क्रीन मध्ये पहा.)


  •  ही सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा. तपासल्यानंतर खाली सबमिट नावाची ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. सबमिट झाल्यानंतर आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर व मेल id वर आपल्या शाळेचा login id व  passward पाठवला जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी शाळा login नवीन passward ने  करावे लागेल .  अशा प्रकारे आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.