विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ सेवा कालावधी संदर्भात परिपत्रक दि २३ नोव्हेंबर २०२२ स्पष्टीकरण व अर्थ

 विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ सेवा कालावधी संदर्भात परिपत्रक दि २३ नोव्हेंबर २०२२

  


स्पष्टीकरण व अर्थ 


         ग्रामविकास विभागाच्या दिनांक 23 नोव्हेंबर 2022 च्या श्री. पो. द. देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार.......
          जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी ७ एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्षे सेवा पूर्ण झालेली आवश्यक आहे. याबाबत खालील प्रमाणे अधिक स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
            विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद दिनांक ७ एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात नमूद आहे. तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बदली संदर्भातील 'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची विनीयमन' आणि 'शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 5' नुसार प्रचलितरित्या एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा असेल अशी तरतूद आहे. तसेच सदर नेमणुकीचा  पदावधी  पूर्ण केला असल्याखेरीस त्याची बदली करण्यात येणार नाही. असेही उक्त  अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार दिनांक ७  एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील तरतूद विचारात घेता विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकांची विद्यमान शाळेतील तीन वर्षाची सलग सेवा पूर्ण व्हावी याकरिता सन  2022 मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत दिनांक 30 जून 2022 पर्यंत तीन वर्षे सलग सेवा झालेली आहे. असेच शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अधिक माहिती करिता खालील परिपत्रक पहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.