SCERT राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-23
राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांचे अध्ययनात खंड पडू नये. यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी. तसेच सर्व स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवकर्मशीलतेला व सजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत सन 2022-23 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.
गट
1. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्ता /सेविका व पर्यवेक्षिका)
2. प्राथमिक गट( उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)
3. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
4. विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गट
5. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य ,केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)
ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सूजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी
१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद ,नगरपालिका ,महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातात.
२. राज्यातील आयसीडीएस विभागाच्या अधिनस्त अंगणवाडीतील कार्यकर्ते सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.
३. डी एल एड विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्षीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षण गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता ,ज्येष्ठ अधिव्याख्याता या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
४. स्पर्धक सध्या scert, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, डाएटमध्ये विषय सहाय्यक डायट अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.
स्पर्धेचे नियम
नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे....!!!
१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.
२. स्पर्धकाने सादर करीत असलेला उपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वयंघोषित प्रमाणपत्र सादर करावे. प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.
३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबवलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमच्या प्रकल्प अहवाला समवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक्य आहे.
४. सादर करण्यात आलेला उपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना, मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृती संशोधन व लघु संशोधन पाठवू नये.
५. नवोपक्रम लेखन मराठी , इंग्रजी किंवा हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.
६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टायपिंग साठी युनिकोड या फोंट (font) चाच वापर करावा. फॉन्ट साईज 12, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच, उजवी बाजू वरील बाजू तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी एक इंच मार्जिन समास असावा.
७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला उपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
८. सादर करण्यात आलेला उपक्रम हा सन 21-22 किंवा 22-23 या कालावधीमध्ये राबवण्यात आलेला असावा.
९. उपक्रम अहवाल शब्द मर्यादा 4000 ते 5000 असावी. फाईल मध्ये नवोपक्रमशी निगडित जास्तीत जास्त पाच फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.
10. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये 100 शब्दात मर्यादित उपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.
1.1 राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धक आणि स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम पीडीएफ व एम एस वर्ड स्वरूपात जोडावे. पीडीएफ फाईल पाच एमबी पेक्षा जास्त नसावी.
12. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रम निगडित इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक उपक्रम स्पर्धेच्या लिंक वर विविध ठिकाणी नोंदवावी.
13. राज्यस्तरीयन उपक्रम स्पर्धा सन 22-23 साठी स्पर्धकांनी आपले उपक्रम या https://scertmaha.ac.in/innovation/ लिंकवर दिनांक 2 नोव्हेंबर 2022 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अपलोड करावे.
14.जिल्हास्तर विभाग सर्व राज्यस्तरावर प्रथम दहा क्रमांकाच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल.
15. राज्यस्तरीयन उपक्रम स्पर्धेत पारितोषिके व उत्तेजनार्थ बक्षीस पात्र स्पर्धकांनी
आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्या वेळी सादर करणे
बंधनकारक राहील.
प्रतिज्ञापत्र
नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन
प्रत्येक स्तरावर दोन फेरीमध्ये केले जाणार आहे. जिल्हा व विभाग स्तरावर द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणाानुक्रमे पहिल्या एक ते सात क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणाानुक्रमे पहिल्या एक ते दहा क्रमांकासाठी राबवण्यात येईल.
जिल्हास्तर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर प्रथम फेरीत नवोपक्रम अहवालांची मूल्यांकन करून प्रथम एक ते सात क्रमांकावर असलेल्या नवपक्रमांची सादरीकरण कार्यालयात जाऊन करून द्वितीय फेरीत मूल्यांकन करण्यात येईल. गुणांच्या आधारावरच जिल्हा व विभाग प्रथम पाच क्रमांक निर्धारित करण्यात येऊन पुढे तेच राज्यस्तरावर पाठवण्यात येतील. ( टीप-मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटांची मूल्यमापन प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)
नवोपक्रम अहवालाचे जिल्हा विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात
येईल. स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.
राज्यस्तरावर
वरील प्रमाणेच उपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील
10 उत्कृष्ट उपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रम सादरीकरण करण्यासाठी
बोलवण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ
क्रमांक निश्चित करण्यात येतील.
राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धेची कार्यवाही
पहिला टप्पा
अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार
पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक घट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे उपक्रम पुढे scert महाराष्ट्र पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
आ) विभाग स्तरावरील पुरस्कार
विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ति तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांची नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत त्यांचे नाव scert महाराष्ट्र पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवले जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. (टीप-मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाचही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)
दुसरा टप्पा
राज्यस्तरावरील पुरस्कार
नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित
पुढील पाच गटातील पारितोषकांचे वितरण केले जाईल.
नवोपक्रम बँक
राज्यस्तरावर पुरस्कारा प्राप्त सर्व नवोपक्रम तसेच जिल्हा व विभाग स्तरावरील
प्रत्येक गटातील गुणाानुक्रमे पहिल्या पाच नवोपक्रम चा समावेश राज्याच्या नवोपक्रम बँक मध्ये करण्यात येईल. हे नवोपक्रम scert महाराष्ट्र पुणे या कार्यालयाच्या
वेबसाईटवर इनोव्हेशन बँक मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील.
उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙏😊
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .