विस्थापित शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दि 7 एप्रिल 2021

  विस्थापित शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दि 7 एप्रिल 2021 


 


व्याख्या :  विस्थापित शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांना बदलीस पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये (टप्पा क्र ५ मध्ये) खो बसून मागितलेल्या शाळा उपलब्ध होणार नाहीत / मिळणार नाहीत असे शिल्लक राहणारे शिक्षक. 

टप्पा क्रमांक सहा (विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा)

         टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक पाच मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची सेवा जेष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक पाच ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व  वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

शासन निर्णय दि ७ एप्रिल २०२१ मध्ये विस्थापितांची केलेली अधिक माहिती खाली पाहू शकता.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .