U-Dise Plus 2022-23 मार्गदर्शक सूचना परिपत्रक दि 18 ऑक्टोबर 2022

 U-Dise Plus 2022-23 मार्गदर्शक सूचना परिपत्रक दि 18 ऑक्टोबर २०२२ 



 

 घटक 

 

लिंक 

 UDISE PLUS वेबसाईट 

 link

 

 

 UDISE PLUS मराठी नमुना जुना  ( फक्त मार्गदर्शक )

 Download

 

 

 UDISE PLUS इंग्रजी नमुना 

 Download

 

 

  UDISE PLUS मराठी नमुना मार्गदर्शिका 2022-23 

 download

 

 

   UDISE PLUS मराठी नमुना 2022-23 

 download

 

 

         

              

    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक मा .कैलास पगारे यांनी u-dise plus २०२२-२३ संदर्भात दि १८ ऑक्टोबर २०२२ रोजी परिपत्रक काढून खालील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत...... 

                       भारत सरकारकडून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरता कळविले आहे. यु-डायस प्लस प्रणाली मधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (पीजीआय), नॅशनल अचिवमेंट सर्वे (न्यास), स्कूल एज्युकेशन कॉलिटी इंडेक्स निर्देशांकाची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.

                     यु-डायस प्लस प्रणाली मध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यांमध्ये माहिती संकलित करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती, शाळेचे ठिकाण, व्यवस्थापन ,माध्यम इत्यादी शाळा सुरक्षा, अनुदान व खर्च व्यावसायिक प्रशिक्षण ,भौतिक सुविधा, साहित्य, उपक्रम ,संगणक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादी माहिती संगणकी कृत करण्यात येत आहे. याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून यु-डायस युजरनेम व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

                    दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती, विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव ,मोबाईल नंबर, घरचा पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर नंबर, जन्मदिनांक, जात, बीपीएल दिव्यांगांचे प्रकार ,शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शालाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, आरटीई प्रवेश ,सहाय्यभूत सुविधा इत्यादी यु-डायस प्लस सॉफ्टवेअर मध्ये शाळा स्तरावरून अद्यावत करण्यात येणार आहेत.

                   दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकी कृत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र शालेय शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांचे कडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सन 2022-23 चे यु-डायस प्रपत्र बाबत झालेले बदल याबाबत जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामवर यांना दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

                  प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्राम वर यांनी यु-डायस प्लस प्रणालीचे काम करणाऱ्या अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु-डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख,डाटा एन्ट्री ऑपरेटर, एम आय एस कोऑर्डिनर्वेटर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता काम करणाऱ्या अधिकारी, मोबाईल शिक्षक, इत्यादी अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावर याचप्रमाणे तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणाली बाबत प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणामध्ये माहिती संकलना बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अमलबजावणीसाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे.

                    भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते की सण 22-23 या वर्षातील सर्व शाळांची माहिती दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत  सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे. सन 2023-24 समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो. माहिती संकलनासाठी सण 2022-23 चे यु-डायस प्रपत्र भरण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहे .

अधिक माहिती साठी udise plus २०२२-२३ चे खालील परिपत्रक पहा व download देखील करू शकता.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.