राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२२
सर फाऊंडेशन नवोपक्रम स्पर्धेचं वैशिष्ट्य
सर फाऊंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम निवडीबाबत...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर फाऊंडेशन नवोपक्रम स्पर्धेचा पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक काढत नाही...
एखादा उपक्रम एका ठिकाणी खूप चांगला ठरू शकतो तर काही ठिकाणी तो सामान्य ठरू शकतो...
त्यामुळे तो चांगला किंवा पहिल्या नंबरचा काढणे चुकीचे ठरते...
त्यामुळे फाऊंडेशन उपक्रमांना A+, A, B+, B, C या ग्रेडमध्ये ठेवते..
यातील ए व ए प्लस ग्रेडमध्ये आलेले नवोपक्रम नॅशनल टीचर इनोव्हेशन अवॉर्ड साठी निवडले जातात...
निवडलेल्या सर्व नवोपक्रमांना एकाच दर्जाचे अथवा प्रथम क्रमांकाचे समजले जाते... त्यामुळे कुठल्याही शिक्षकांमध्ये वैयक्तिक स्पर्धा होत नाही. ज्यांचा उपक्रम चांगला मग ते शिक्षक एकाच शाळेतले जरी असले तरी ते पात्र ठरू शकतात....
आपली स्पर्धा शिक्षकांशी नाही तर त्यांच्या नवोपक्रमांच्या दर्जाशी आहे..
हे यातले वेगळेपण अधोरेखित करता येते...
यामुळेच कधी 53, कधी 105, कधी 159 असे नवोपक्रम अंतिमतः निवडले जातात...
यातून आपल्याला जास्तीत जास्त उपक्रमशील शिक्षकांना शोधणे आणि त्यांच्या नवोपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट गाठता येते.
समजा 100 नवोपक्रम आले आणि ते सगळेच ए व ए प्लसच्या पुढे असतील तर
'सर फाऊंडेशन' या सगळ्यांना यामध्ये निवडेल...
त्यात पहिला दुसरा असा नंबर काढणार नाही.
सर्वांचा यथोचित सन्मान केला जाईल.
नवोपक्रम स्पर्धेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रेमी, कोणत्याही व्यक्ती ज्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत, ते सर्वजण भाग घेऊ शकतात...
जे या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी काम करत आहे ते सर्व पात्र आहेत..
अगदी शिक्षकांपासून ते शिक्षण संचालकापर्यंत!
चला तर मग वाट कोणत्या मुहूर्ताची पाहताय?
लवकरात लवकर सहभागी व्हा!
NATIONAL TEACHER INNOVATION AWARD 2022
Apply for
NATIONAL LEVEL EDUCATIONAL INNOVATIONS COMPETITION 2022*
& Get a chance to WIN
*NATIONAL TEACHER INNOVATION AWARD 2022
__________________________
__________________________
APPLY NOW
#SIRF_NLEIC22
देशभरातील प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना सुवर्णसंधी
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाऊंडेशन महाराष्ट्र) आयोजित
राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२२ मध्ये शालेयस्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना (नवोपक्रमांना) याद्वारे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये नवोपक्रम सादर करता येईल.
देशभरातील प्रयोगशील शिक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना सहभागी होण्याची संधी
सूचना:-
नवोपक्रमाचे लेखन पुढील मुद्यांच्याच आधारे केलेले असावे.
मुद्दे:-
1. नवोपक्रमाचे शीर्षक
2. नवोपक्रमाची गरज व महत्त्व
3. नवोपक्रमाची उद्दिष्टे
4. नवोपक्रमाचे नियोजन
5. नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
6. नवोपक्रमाचे निष्कर्ष / फायदे
7. परिशिष्ट
8. नवोपक्रमाची सद्यस्थिती.
#या अपलोड करावयाच्या pdf फाईलला तुमचे नाव द्या. याची साईज 10 MB पर्यंतच असावी.
(संपूर्ण नवोपक्रम तयार करून त्याची पीडीएफ झाल्यानंतरच आपण वरील लिंकला क्लिक करून ती फाईल सबमिट करायची आहे)
टीप - स्पर्धेची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२२
टीम सर फाऊंडेशन, महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी संपर्क
राजन गरुड : 7057540074
आनंद आनेमवाड : 9890697966
शिल्पा वनमाळी : 9923871279
सतीश सातपुते : 9422471197
शोभा माने : 9421552517
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .