NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२-२३
प्रश्नपत्रिका NMMS
NMMS प्रश्नपत्रिका 2021-22 CLICK HERE
NMMS प्रश्नपत्रिका 2020-21 CLICK HERE
NMMS प्रश्नपत्रिका 2019-20 CLICK HERE
NMMS प्रश्नपत्रिका 2018-19 CLICK HERE
NMMS प्रश्नपत्रिका 2015-16-17 CLICK HERE
इयत्ता आठवी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्थरापर्यंत होणारी गळती रोखावी. हे या योजनेची उद्दिष्ट आहे. इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांची उत्पन्न 3 लाख 50 हजार पेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
१.अर्ज करण्याची पद्धत
दि. 10 ऑक्टोंबर 2010 पासून ऑनलाईन आवेदन पत्रे परिषदेच्या https://www.nmms2023.nmmsmsce.in/index.aspx या संकेतस्थळावर डायरेक्ट लिंक वर उपलब्ध
होतील.
२.पात्रता
1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासन मान्य ,अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी, विद्यार्थिनी या परीक्षेत बसता येईल.
2. पालकांचे आई व वडील मिळून दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदाराचा / तलाठ्यांचा आसन 21-22 च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.
3. विद्यार्थी, विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती ,अनुसूचित जमातीचा विद्यार्थी किमान 50 टक्के गुण मिळवून प्राप्त झालेला असावा.
खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.
- विनाअनुदानित शाळेत शिकणारी विद्यार्थी
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
- जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
- शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधाचा लाभ घेणारे विद्यार्थी
- सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
३.विद्यार्थ्यांची निवड
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेला मागासवर्गींसाठीच्या आरक्षणा नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
४.परीक्षेचे वेळापत्रक
महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक
बृहन्मुंबई यांचेमार्फत दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांच्या साठी पात्रता गुण 40 % मिळणे आवश्यक आहे. एससी एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32 % मिळणे आवश्यक आहे.
५.परीक्षेसाठी विषय
सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील.
एक बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्री चाचणी असून त्यामध्ये कार्य करण भाव , विश्लेषण ,संकलन इत्यादी संकल्पना वर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
दोन शालेय क्षमता चाचणी ही सामान्यता इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य ज्ञान एकूण पस्तीस गुण, समाजशास्त्र एकूण पस्तीस गुण, गणित एकूण वीस गुण, असे तीन विषय असतील. या तीन विषयांची एकूण 90 प्रश्न सोडवायची असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालील प्रमाणे असेल
सामान्य विज्ञान 35 गुण हे, भौतिकशास्त्र 11 गुण ,रसायनशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण,
समाजशास्त्र ३५ गुण हे इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 5 गुण, भूगोल 15 गुण,
गणित 20 गुण,
६.माध्यम
राष्ट्रीय
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस मराठी, उर्दू ,हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. सर्व विद्यार्थ्यांना
मूळ माध्यमासह इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते. विद्यार्थ्यांना
यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका
दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांक पुढे पर्याय साठी चार वर्तुळे असतील. योग्य पर्यायाची
वर्तुळ, निळे, काळे बॉलपेन ने पूर्णत रंगून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली, अपुरी, अंशत रंगवलेली उत्तरे ,यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली
उत्तरे, चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाइटनर खाडाखोड करून नोंदवलेली किंवा
गुरवली गिरवली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
७.आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या
अखिल भारतीय पातळीवर एन एम एम एस शिष्यवृत्तीची
संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11682 एवढा कोटा निश्चित करून दिले आहे. कोट्यानुसार
व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणा नुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा निहाय संवर्गनिहाय
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी अपंगासाठी प्रत्येक
संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणा नुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या
जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतील.
परीक्षेसाठी
खालील प्रमाणे शुल्क करण्यात येते.
९.निकाल घोषित करणे
सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात
जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच
उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच
काढून घेणे आवश्यक्य आहे.
१०.शिष्यवृत्ती दर
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास पाच वर्षासाठी दरमहा रुपये एक हजार रुपये वार्षिक रुपये 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्ती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इयत्ता नववी तून इयत्ता दहावी व अकरावीतून इयत्ता बारावी प्रथम संधी मध्ये पास होणे आवश्यक आहे. इयत्ता दहावी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी विद्यार्थ्यांना किमान 55% गुणांची आवश्यकता आहे सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी, माध्यमिक व माध्यमिक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे मार्फत केले जाते.
११.अनधिकृतते बाबत इशारा
मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेच्या प्रकारचे परीक्षा किंवा पूर्व परीक्षा
घेणे प्रमाणपत्र देणे शिष्यवृत्ती देणे, याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले
नाही. अशा संस्था बाबतची कोणतीही जबाबदारी मान संसाधन विकास मंत्रालय एम एच आर डी नवी
दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची वर राहणार नाही.
अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील परिपत्रक वाचा .
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .