शालेय पोषण आहार , MDM Back Dated माहिती कशी भरावी ?

 शालेय पोषण आहार, MDM Back Dated माहिती कशी भरावी ?



 MDM माहिती न भरलेले दिवस कसे शोधावे ?      MDM पोर्टल click Here           

            राहिलेले दिवस कोणते हे पाहण्यासाठी प्रथम आपणास MDM पोर्टल ला जावून शाळेचा id व passward वापरून login करावे लागेल. login केल्यावर समोर Calendar दिसेल .  कोणत्या कोणत्या दिवसाची माहिती भरावयाची राहिली आहे ते पाहावे लागेल .आपणास हवा तो महिना सिलेक्ट केल्यावर  व  खालील स्क्रीन प्रमाणे भरलेले फिक्कट निळे तर  न भरलेले दिवस हे फिक्कट गुलाबी रंगांचे दिसतील. राहिलेल्या दिवसांची नोंद घेवून शाळा login मधून  logout व्हावे लागेल . त्यासाठी खालील स्क्रीन पहा.


MDM Back Dated माहिती कशी भरावी ? व्हिडिओ निर्मिती प्रदिप कुंभार 


       MDM Back Dated माहिती कशी भरावी ? स्टेप बाय स्टेप माहिती  

  • राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्यासाठी  केंद्र प्रमुख login id व password वापरून MDM पोर्टल ला प्रथम login करावे लागेल .

  •  प्रथमतः एमडीएम अटेंडन्स डेट या ठिकाणी क्लिक करून आपल्याला कॅलेंडर मध्ये  आपणास ज्या दिवशीचा डाटा भरायचा आहे ती तारीख, तो महिना सिलेक्ट करावे लागेल.
  •  त्यानंतर मॅनेजमेंट टाईप मध्ये आपल्याला जि. प. शाळांनी  लोकल बॉडी किंवा जे काही आपलं मॅनेजमेंट असेल ते सिलेक्ट करावे लागेल.
  •  त्यानंतर मॅनेजमेंट डिटेल्स मध्ये आपल्याला आपलं हवं ते योग्य मॅनेजमेंट डिटेल्स सिलेक्ट करावे लागेल. जि. प. शाळांनी Zilla Parishad (Primary) हे निवडावे.त्यानंतर रिझल्ट ला क्लिक करावे लागेल.
  •  रिझल्ट ला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर क्लस्टर व स्कूल अशा दोन टॅब खाली ओपन झालेल्या दिसतील.
  •  त्याच्यामध्ये क्लस्टर ला क्लिक करून क्लस्टरच्या खाली क्लस्टर कोड व  नाव आहे.
  •   त्या क्लस्टर कोडला/ नावाला  क्लिक करावे लागेल.    
  • खालील स्क्रीन मध्ये पहा.


  •  त्यानंतर शाळांची यादी दिसेल 
  •  आपल्या शाळेच्या नावापुढे MDM माहिती भरलेली दिसणार नाही. 
  •  आपल्या शाळे च्या  नावापुढे सर्वात शेवटी पुढे ऍड Add नावाची Tab बटन दिसेल त्या Add ला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.

  •  क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील पद्धतीने स्क्रीन दिसेल.
  •  खालील पद्धतीच्या स्क्रीन मध्ये आपल्याला  सर्व योग्य मेनू व उपस्थिती ची माहिती इयत्ता निहाय भरावी लागेल.  
  • सर्व माहिती भरल्यानंतर अपडेट ला click करावे लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.

  •  अपडेट केल्यानंतर सेव सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपणास दिसेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.


  • पुन्हा पुढील दिवसाचा डाटा भरण्यासाठी वरील प्रमाणे  जी  तारीख आहे ती सिलेक्ट करावी लागेल. पुन्हा नेहमीप्रमाणे प्रोसेस माहिती भरण्याची करावी लागेल. अशा पद्धतीने आपण माहिती ऑनलाईन केंद्रप्रमुख लॉगिन वरून भरू शकतो.

MDM Back Dated माहिती कशी भरावी ? मार्गदर्शक pdf निर्मिती वसंत भिसे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.