20 पटांच्या शाळांबाबत शासनाचे महत्वाचे नियम व शासन निर्णय

 20 पटांच्या शाळांबाबत शासनाचे महत्वाचे नियम व शासन निर्णय  

HTML

      महाराष्ट्र शासनाचे सहसचिव मां. ना. ऊ. रौराळे यांनी दि १३ डिसेंबर २०१३ रोजी एक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्य पट संख्येवर आधारित शिक्षक पदे निश्चित कारणे बाबत शासन निर्णय  पारित केला आहे. त्या GR मधील कलम ६ नुसार......

     

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

 i. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, अशा शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात यावे.

 ii. नजीकच्या शाळेच्या अंतरामुळे विद्यार्थ्यांचे समायोजन करणे शक्य होत नसल्यास अशा विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान देऊन त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित करण्यात यावे.

 iii. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी वरील प्रमाणे आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१४-२०१५ ) विद्यार्थ्यांचे आवश्यक ते समायोजन करावे. भौगोलिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे समायोजन करणे शक्य नसल्यास अशा शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात सर्वंकष आढावा घेऊन सकारण प्रस्ताव शासनास सादर करावा.

iv. स्थानिकी स्वराज्य संस्थांचे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी (मुख्य अधिकारी कार्यकारी, महानगरपालिका आयुक्त इ)  दरवर्षी दिनांक 15 डिसेंबर पर्यंत आढावा घेऊन विहित प्रस्ताव दिनांक 15 जानेवारीपर्यंत शासनास सादर करावा.

अधिक माहिती करिता खालील दि १३ डिसेंबर २०१२ चा शासन निर्णय सविस्तर वाचा.  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.