दप्तराचे ओझे
शासन निर्णय दि २१ जुलै २०१५ नुसार .....
विद्यार्थ्याच्या बौद्धिक वाढीबरोबरच निकोप व सदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करून आनंदी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत खालील सूचना देण्यात येत आहेत. या सूचना राज्यांतर्गत सर्व मंडळाच्या शाळांना लागू राहतील.
शाळेने घ्यावयाची काळजी
दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या दहा टक्के च्या आत राहील याची जबाबदारी पालकां एवढीच मुख्याध्यापकाची आहे. यापुढे शाळेमुळे मुलांच्या दप्तराचे वजन मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही. यासाठी शाळेने सर्जनात्मक पद्धतीने वेळापत्रक तसेच गृहपाठाचे नियोजन करायचे करावयाची आहे. सर्व मुख्याध्यापक प्रशिक्षित आणि सुज्ञ असल्यामुळे स्वतः वेगवेगळे विचार करतीलच किंवा केला असणार आहे, परंतु दप्तराच्या ओझ्या बाबतच्या तक्रारी समाजामधून येतच आहेत. कोणत्याही दिवशी मुलांना अधिक पुस्तके आणि वह्या आणाव्या लागणार नाही. यासाठी काही सूचना खाली दिलेल्या आहेत. यापेक्षाही अधिक चांगल्या उपाययोजना मुख्याध्यापकांकडे असू शकतात याचीही जाण शासनास आहे.
1. इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसारच पाठ्यपुस्तके वर्गात आणावीत. शासनाने बोर्डाने विहित केलेल्या पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त इतर कोणतीही पुस्तके शाळेत आणण्याची गरज नाही. अशा साहित्यांमुळे दप्तराचे वजन मर्यादेपेक्षा अधिक होत असल्यास त्यावर मुख्याध्यापक स्तरावर बंदी घालण्यात यावी.
2. शिक्षकांनी गृहपाठाचे नियोजन करावे. गृहपाठ तपासण्यासाठी विषयनिहाय दिवस निश्चित करण्यात यावा. त्या दिवशी त्याच विषयाच्या गृहपाठाची वही मुलांनी आणावे. एकाच दिवशी अनेक विषयांचे गृहपाठ व निबंध तपासणीसाठी आणू नयेत. इयत्ता पहिली व दुसरी साठी गृहपाठाच्या वह्यांची आवश्यकता नाही.
अ. शंभर पानांपेक्षा मोठ्या व जाड कवर असलेल्या वह्यांची विद्यार्थ्यांना सक्ती करू नये. विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या सूचना शाळेने द्यावात. तसेच प्रथम आणि द्वितीय सत्रासाठी वर्ग पाठ आणि गृहपाठ यांच्या वह्या स्वतंत्र ठेवण्याबाबत नियोजन करता येईल. अभ्यासक्रमातील जोड विषयांसाठी एकच वही वापरता येईल.
ब. कार्यानुभव ,चित्रकला ,संगणक, शारीरिक शिक्षण, बालविर व बाल वीर बाला या विषयांसाठी वह्या वापरण्यात येत असल्यास त्या शाळेमध्येच ठेवण्यात याव्यात.
क. शाळेत ग्रंथालय सारखे दप्तरआलय सुरू करावे. यात इयत्ता निहाय आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य विद्यार्थी निहाय उपलब्ध करण्याची आवश्यक्य नोंदी सह व्यवस्था करता येईल. कपाट, हँगर्स, रॅकची व्यवस्था करता येईल. यासाठी लोकसहभागाची मदत होऊ शकते.
ड. काही जिल्हा, गट, बीट, केंद्र शाळांनी मागील वर्षाची न फाटलेली पुस्तके जमा केली आहेत. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांसाठी शाळेत पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मुले यावर्षी दिलेली पुस्तके घरी वापरतात आणि मागील वर्षाची जमा झालेली पुस्तके शाळेत वापरतात. यामुळे त्यांना दप्तरांमध्ये पुस्तके आणावी लागत नाही. इतर मुख्याध्यापकांनी तसे नियोजन करावे.
३. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी त्यांच्या वयोगटा नुसार शाळेमध्येच खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून द्यावे.
४. दररोज वेळापत्रकात जोड तासिका ठेवाव्यात. त्यामुळे एका दिवसात कमी विषयांच्या तासिका होतील. त्यामुळे कमी वह्या पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेत आणावी लागतील. दररोज तीन ते चार विषय वेळापत्रकात ठेवावेत. जोडताशिकांमुळे शिक्षकांना वर्ग बदलताना लागणारा जाणारा अशैक्षणिक वेळ कमी होईल व शिकवण्यासाठी वेळ अधिक मिळेल. सध्या विषय निहाय एका तासिकेसाठी 30 मिनिटे ते 35 मिनिटे एवढा कालावधी आहे. तसेच वर्ग बदलताना साधारण दहा मिनिटे निघून जातात. त्यामुळे एका तासिकेसाठीचा किमान वेळ वाढवण्यात यावा. तथापि एक तासिका एक घड्याळ तासापेक्षा अधिक असू नये याची काळजी घ्यावी.
5. शाळेत स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून मुलांना घरातून पाणी आणावयाची गरज भासणार नाही.
६. शाळेत ई-लर्निंग चा वापर वाढवण्यात यावा.
७. सर्व शाळांनी पालकांनी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना पालक सभेत द्याव्यात. तसेच या सूचना इमेल , संकेतस्थळ, व्हाट्सअप आणि शाळेमधील सूचना फलकाच्या माध्यमातून सुद्धा द्याव्यात.
८. एखाद्या विद्यार्थ्याच्या दप्तराचा
आकार अधिक दिसत असल्यास मुख्याध्यापकाने शाळेत त्याचे वजन करून पहावे. हे वजन मर्यादेपेक्षा
जास्त असल्यास स्वतःची नियोजन तपासावे आणि ते दुरुस्त करून घ्यावे. पालकांना सूचना द्यायची
गरज असल्यास आवश्यक्य सूचना पालकांना द्याव्या.
पालकांनी घ्यावयाची काळजी
१. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाच्या दप्तराची वजन मुलाच्या वजनाच्या दहा टक्के पेक्षा कमी आहे याची काळजी घ्यावयाची आहे. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपले मुलाचे वजन माहीत करून घ्यावी. पहिल्या वर्गातील मुलाची सर्वसाधारण वजन २० किलो तर आठव्या वर्गातील मुलांचे साधारण वजन 42 किलोमीटर असेल. बाकीच्या वर्गातील मुलांची वजन या दोन्हीच्या मध्ये असते. म्हणजेच पहिल्या वर्गातील मुलांच्या दप्तराची वजन दोन किलो तर आठव्या वर्गातील मुलांच्या वजन ४.२ किलोग्रॅम पेक्षा अधिक असता कामा नये.
२. शालेय पोषण आहार देणाऱ्या प्रत्येक शाळेमध्ये वजन करण्याची सोय आहे. या शाळांमध्ये दर तिमाही मध्ये प्रत्येक मुलाचे वजन केले जाते. त्याच वजन काट्याच्या उपयोग दप्तराचे करायचे वजन करण्यासाठी सुद्धा करावा. विद्यार्थ्याला सांगून त्याचे व दप्तराचे वजन एकदा काढून घ्यावे. त्या माहितीच्या आधारे दप्तराचे वजन आवश्यकतेनुसार कमी करावे.
३. दप्तराची वजन
कमी करण्यासाठी काही उपाययोजना खालील प्रमाणे सुचवण्यात येत आहेत.
(पालकांच्या साठीच्या इतर सूचना खाली पहा.)
शासनाने करावयाचे कार्य
वरील प्रमाणे नियोजन आणि लोकशिक्षण झाल्याने दप्तराच्या ओझ्याच्या तक्रारी संपेल अशी अपेक्षा आहे, परंतु अकारण दप्तराचे ओझे वाढणार नाही यासाठी शासन खालील प्रमाणे दक्षता घेईल.
१. सर्व बोर्डा द्वारे विहित पुस्तकांची पुस्तके उपलब्ध राहतील याची काळजी घेणे.
2. एखाद्या शाळेत दप्तराचे वजन मर्यादेपेक्षा अधिक असल्याची तक्रार आल्यास संबंधित पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन दप्तराची वजन करून ते कमी करण्याची सूचना शाळेस व पालकास द्यावी.
३. या शासन निर्णयांमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून सुद्धा दप्तराचे वजन मर्यादेपेक्षा जास्त होत असल्यास त्याबद्दल शासनास माहिती द्यावी, जेणेकरून शासन स्तरावरून अधीक उपाययोजना करण्यात येतील.
४. या शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचना
व्यतिरिक्त अधिक उपयोगी सर्जनात्मक उपाययोजना कुठे आढळल्यास त्याबद्दलही माहिती शासनास
द्यावी. अशा उपाययोजना सर्वांच्या लाभाकरता शासन परिपत्रकाद्वारे प्रसारित करील.
विद्यार्थ्याचे इयत्ता निहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन
इयत्ता निहाय विद्यार्थ्याचा आदर्श BMI
बदली प्रक्रिया राबवत असताना पसंती क्रम 123 क्रमांकाचा विचार करण्यात यावा
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .