जिल्हांतर्गत बदलीबाबत आजचे बदली अपडेट्स 22-23

 जिल्हांतर्गत बदलीबाबत आजचे बदली अपडेट्स 2022-2023



बदली पोर्टल वर थेट जाण्याकरिता यथे click करा.

https://ott.mahardd.in/

बदली बाबत आजपर्यंत आलेली सर्व बदली परिपत्रके व GR download साठी येथे click करा.

(सूचना:येथे खात्रीशीर व अभ्यासपूर्ण बदली अपडेट्स दिले जातात. पण परिस्थितीनुरूप माहिती मध्ये थोडाफार बदल होवू शकतो. प्रशासनाने दिलेल्या सूचना अंतिम राहतील.प्रशासनाशी संपर्कात राहणे.)

  
आज दि 16 मे २०२3 चे अपडेट्स

 शिक्षकांसाठी बदली पोर्टल लॉगिन सुरू झालेले असून बदली पोर्टलवरून आपले बदली आदेश डाऊनलोड करता येऊ शकतात.
लिंक 👇



पोर्टल फक्त आजच्या दिवस (आज रात्री १२ पर्यंत ) सुरू आहे. ज्यांच्याकडे आदेश नसतील त्यांनी त्वरित डाऊनलोड करून घ्यावेत.

आदेश कसे download करावेत ?
             बदली पोर्टल सुरु झाले असून बदली झालेल्या सर्व संवर्गाच्या शिक्षकांनी आपले आपले बदली आदेश बदली पोर्टल ला जावून वैयक्तिक login करून download करावेत .
           बदली आदेश download करण्यासाठी पोर्टल ला login करून  intra district  मध्ये transfer order या tab मध्ये जावा.  समोर दिसणाऱ्या download ला click करून आपला बदली आदेश download करू शकता


खालील स्क्रीन मध्ये पहा.




 दि 21 मार्च २०२3 चे अपडेट्स

शाळा कोणती मिळाली,हे Udise वरून कसे शोधायचे..?


१.State निवडण्याची गरज नाही.
२.Udise Code टाका.
३.Captch टाकावा.
४.आणि Submit button वर क्लिक करा.
५. शाळेची माहिती open होईल. खालील किंवा वरील लिंक open करा.


(वरील लिंक वर आपणास त्या त्या शाळेची अधिक माहिती आपणास पाहता येईल तसेच स्कूल रिपोर्ट कार्ड download करून देखील आपण त्या शाळेची सविस्तर माहिती पाहू शकता.)

 किंवा 
आपण गुगल वर जावून शाळेचा udise कोड टाकून फक्त सर्च करा . शाळेचे नाव व इतर माहिती आपणास समोर दिसेल.
     
बदली बाबत आजचे दि २१ मार्च २०२३ चे महत्त्वाचे अपडेट्स
  • सर्व बदली झालेल्या शिक्षकाना अवगत करण्यात येते की , ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांच्या इमेल वर बदली झाल्याचे confirmation mail  पाठविण्यात आलेले आहेत. आपले इमेल चेक करुन घ्यावेत .
  • ज्या शिक्षकाना बदली होवुनही  इमेल प्राप्त झाले  नाहीत त्यांचे इमेल चुकीचे असु शकतात ही पण नोंद घ्यावी.
  • शिक्षकांना आपले बदली आदेश शिक्षकांसाठी पोर्टल चालू झाल्यावर त्यांच्या स्वतःच्या लॉगिन वरून सुद्धा डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. login सुरु झाल्यावर download करून घ्यावेत. 
         (सध्या पोर्टल बंद आहे. संध्याकाळी किंवा उद्या सुरू होईल.)

  • अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या मिळालेल्या शाळांच्या याद्या CEO login ला आल्या आहेत. सर्वाना लवकरच याद्या उपलब्ध होतील.
  • त्याचप्रमाणे संवर्ग एक, संवर्ग दोन, अवघड क्षेत्रातून व संवर्ग चार मधून बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश सुद्धा  CEO लॉगिनला आलेले आहेत. आज दुपार नंतर  प्रसिद्ध होतील.
आता लागू व चालू असलेले बदली वेळापत्रक

 दि 17 मार्च २०२3 चे अपडेट्स
      
             अवघड क्षेत्रासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकाना शाळांचा  पसंतीक्रम भरण्यासाठी आज दि १७ मार्च २०२३ रोजी  रात्री १२ वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे . मुदत संपण्यापूर्वी आपले फॉर्म submit करून घ्या. सध्या सुरू असलेल्या अवघड क्षेत्रासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांपैकी केवळ 30 टक्के शिक्षकांनी आपले अर्ज  सबमिट केले असून आज पसंती क्रम भरावयाचा अंतिम दिवस आहे. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला अर्ज सबमिट करायचा विसरू नका. जर अर्ज सबमिट करावयाचा चुकून राहिला तर सिस्टीम तुम्हाला कोणतीही शाळा देऊ शकते. प्रथम शाळा भरून सेव करून ठेवा. क्रम खालीवर करू शकता.नंतर सबमिट करा.जास्त उशीर करू नका. ऐनवेळी रात्री उशिरा सर्वर चा प्रॉब्लेम होऊ शकतो. मुदत वाढणार नाही. सर्वाना शुभेच्छा....!!!

फॉर्म सबमिट व save केलेली जिल्हानिहाय आकडेवारी 17 मार्च 2023, सकाळी 5 AM


(फॉर्म भरणे पूर्वी खालील १५ मार्च ची पोस्ट / माहिती एकदा आवश्य वाचून घ्या.)

 दि 15 मार्च २०२3 चे अपडेट्स 
   
बदली अर्ज:अवघड क्षेत्र

अवघड क्षेत्रासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकाना शाळांचा  पसंतीक्रम भरण्यासाठी  ott.mahardd.in या बदली पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
बदली अर्ज करण्याचा कालावधी 
 दिनांक १४-०३-२०२३ ते  १७-०३-२०२3

पसंतीक्रम भरताना कोणती काळजी घ्यावी. कोणती पूर्वतयारी करावी ? कोणत्या मुद्यांचा विचार करावा ?
  • प्रथम login वरून आपणास दिसणाऱ्या शाळांची तालुका निहाय यादी कच्ची लिहून ठेवावी व त्यावर विचार करावा.
  • शाळांचे पसंतीक्रम अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक भरावेत.
  • अवघड क्षेत्रातील शाळांची माहितीगार व अनुभवी शिक्षकांकडून खात्रीशीर माहिती घ्यावी.
  • नकाशा ,गुगल maps चा वापर करावा.
  • या राउंड मध्ये १०० % आपणास अवघड क्षेत्राची शाळा मिळणार आहे पण ती बर्यापैकी मिळावी म्हणून शिक्षकांनी आपले क्रम वाया जाणार नाहीत यासाठी काळजी घेवून जास्तीत जास्त पसंतीक्रम अभ्यासपूर्वक , विचारपूर्वक भरावेत. (सेवाजेष्ठता पाहून किती शाळा भराव्या याचा विचार करून भरा.)
  •  आपण कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 30 पसंतिक्रम भरू शकता. 
  • बदली पोर्टल वरून ज्यांनी फॉर्म सबमिट केले आहेत त्यांचे पसंतीक्रम पाहून आपल्या पसंतीक्रमात योग्य बदल करू शकता .क्रम बदल किंवा खालीवर करू शकता, पण जास्त वेळ फॉर्म सबमिट करायचा ठेवणे,अंतिम दिवसाची व मुदतीची वाट पाहणे योग्य नाही किंवा विनाकारण रिस्क घेवू नका. फॉर्म submit करावयाचा राहिल्यास सिस्टीम आपणास कोणतीही शाळा देईल. (बदली पोर्टल ला login केल्या नंतर intra मध्ये  lists tab  मध्ये जावून Difficult Area Applications मध्ये आपणास हव्या त्या शिक्षकाचे नाव open करावे लागेल. त्याने फॉर्म submit केला  असेल तरच त्याचा पसंतीक्रम दिसेल. )
  • शक्य झाल्यास पहिल्या काही शाळा प्रत्यक्ष पाहून याव्यात.(विशेष करून महिलांनी )
  • udise नंबर वरून गुगल वरून त्या शाळेचा पट व इतर माहिती मिळवावी.
  • पसंतीक्रम भरल्यानंतर फॉर्म submit करायला विसरू नये.
  • सेवा जेष्ठता विचारात घेऊन पसंतीक्रम निश्चित करावा.
  • मुदत संपे पर्यंत कितीही वेळा फॉर्म Withdraw करू शकता. व पुन्हा भरू शकता.
  • अंतिम मुदत 17 मार्च 2023 रात्री 12 पर्यंत.
  • सर्वाना बर्यापैकी सोयीची शाळा मिळावी यासाठी शुभेच्छा.

अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षकांनी पसंतीक्रम कसा भरावा ? या संदर्भात बदली पोर्टलचा आलेला व्हिडीओ खाली आवश्य पहा.



 


दि 6 मार्च २०२3 चे अपडेट्स

  • बदली सन २०२२ करिता  शेवटचा टप्पा म्हणजे अवघड क्षेत्रासाठी फेरीची प्रक्रिया सुरु झालेली आहे .
  • संवर्ग ०१ मधील पात्र शिक्षकाना होकार / नकार देण्याची सुविधा दिनांक ०६-०३-२०२३ ते ०८-०३-२०२३ या कालावधीमध्ये सुरु आहे.
  • अवघड क्षेत्रातील बदली साठी पात्र शिक्षकांची यादी प्रत्येक शिक्षकाच्या लॉगिनला  उपलब्ध करुन दिलेली आहे . 
  •  यादीतील एकुण  शिक्षकापैकी जे शिक्षक संवर्ग ०१ मध्ये आहेत त्या शिक्षकाना  बदली पोर्टलवर बदलीतुन सुट घ्यायची असेल तर YES आणि बदलीतुन सुट नको असेल तर No म्हणून अर्ज सबमिट करावा.मुदत संपेपर्यंत अर्ज आपण कीही वेळा withdrow करू शकतो.
  •  ही सुविधा दि.08/03/2023 अखेरीस रात्री 11.59 मिनिटांपर्यंत सदर सुविधा उपलब्ध असेल. 
  • संवर्ग १ मधील असे सर्व शिक्षक की ज्यांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा १० वर्षापेक्षा जास्त झाली आहे अशा सर्व शिक्षकांनी (53+ व वय ५३ वर्षापेक्षा कमी असणारे संवर्ग १ मधील सर्व शिक्षक)अवघड क्षेत्रात जाण्यापासून वाचण्यासाठी होकार/नकार द्यावाच लागेल.
  • यापूर्वी चालू बदली प्रक्रियेत नकार दिला असेल किंवा बदली झाली असेल तर काही करायची गरज नाही. पण तरीही एकदा यादी व login चेक करून खात्री करावी.
आजपासून अवघड क्षेत्रातील रिक्त भरणेसाठी संवर्ग १ मधील शिक्षकांना होकार अथवा नकार देणेसाठी पोर्टल सुरु झाले आहे.

होकार अथवा नकार कोणाला द्यावा लागेल ?  

सर्वसाधारण क्षेत्रात ज्याची सलग सेवा १० वर्षापेक्षा जास्त झाली आहे असे जिल्ह्यातील संवर्ग १ मधील वास्तव सेवाज्येष्ठ सर्व शिक्षक .... त्यामध्ये 

१) संवर्ग १ मध्ये असूनही यापूर्वी अनावधानाने होकार/नकार द्यायचा राहुन गेला आहे असे सर्व शिक्षक.

२) संवर्ग १ मध्ये असून शाळेवर ३ वर्षे पूर्ण न झाल्याने होकार/नकार देता आला नाही असे सर्व शिक्षक.

३) संवर्ग १ मध्ये असून यापूर्वी होकार दिला होता परंतु बदली अर्ज भरला नाही किंवा अर्ज भरूनही मागितलेली शाळा मिळाली नाही असे सर्व शिक्षक.

४) संवर्ग १ मधून यावर्षी बदली झाली आहे किंवा नकार दिला आहे त्या शिक्षकांनी काहीही करायची आवश्यकता नाही. तरीही खात्री करण्यासाठी एकदा यादी व पोर्टल व करणे. 

लक्षात ठेवा.... 

नकार द्यायचा असेल तर :-
मला बदलीतून सुट हवी आहे - Yes ( होय)

आणि

होकार द्यायचा असेल तर-
मला बदलीतून सुट हवी आहे - No ( नाही )

हे पर्याय काळजीपूर्वक निवडावे.

अवघड क्षेत्र फेरी संवर्ग १ मधील शिक्षकांनी अर्ज कसे भरावेत ? होकार नकार व  याबाबतचा बदली पोर्टलचा अधिकृत व्हिडीओ खाली एकदा पाहून घ्या.


 दि 2 मार्च २०२3 चे अपडेट्स
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याबाबत महत्वाचे व संदिग्ध मुद्दे 

 
 
दि १० फेब्रुवारी २०२3 चे अपडेट्स
      विस्थापित राउंड बदली प्रकीयेसाठी फॉर्म/पसंतीक्रम भरणे सुरु झाले असून अंतिम मुदत  दिनांक दि ११ फेब्रुवारी पोर्टल च्या सुचणे नुसार आहे.
विस्थापित फॉर्म कसे भरावेत? विस्थापित बदली  बदली प्रक्रिया कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील पोर्टल चा अधिकृत व्हिडीओ पहा.


बदली चालू वेळापत्रक 


बदली पोर्टल अपडेट WITHDRAW 

            विस्थापित फेरी मध्ये   ज्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट केला असेल व आपणास फॉर्म मध्ये काही बदल करावयाचा असल्यास  बदली पोर्टलवर शिक्षकांना फॉर्म WITHDRAW  सुविधा दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक झाली असल्यास किंवा आपणास प्राधान्यक्रम बदल करावयाचा असल्यास फॉर्म  WITHDRAW  करून  बदल करू शकतात.

दि 7 फेब्रुवारी  २०२3 चे अपडेट्स
          
संवर्ग 4  च्या अपडेटेड बदली याद्या  जाहीर झाल्या असून आपण आपणास मिळालेली शाळा खालील लिंक वरून UDISE नंबर टाकून  पाहू शकता.   



NOTE

We have completed all the list generation of PDF and Alignment and Corrections with Right Labels 
Logins have been Enabled for all EO and CEO Once you download confirm we will open teacher login


संवर्ग 4 बदली अपडेट
      बदली प्रक्रियेबाबत रात्री 3 वाजता Vinsys कडुन खालीलप्रमाणे सुचना प्राप्त

👇🏻👇🏻

    बदली याद्या अपडेटेशनचे काम पुर्ण झालेले आहे. सर्व जिल्ह्रांचे EO & Ceo लाॅगिन सक्रिय करण्यात आलेले आहे. लवकरच जिल्हास्तरावरुन यादी प्रकाशित होतील व त्यानंतर लगेच शिक्षक लाॅगिनही सुरु केले जाईल.

दि २5 जानेवारी २०२3 चे अपडेट्स

प्रश्न तुमचे,उत्तर आमचे ? 
संवर्ग ४ बाबत बदली पोर्टल चे अधिकृत शंका समाधान 


Phase-3 जिल्हांतर्गत बदली 

मा.अवर सचिव,ग्रामविकास विभाग यांच्या दि.23.01.2023 च्या सुधारित वेळापत्रकानुसार...

सध्या सुरू असलेले टप्पे

बदलीपात्र (संवर्ग 4) शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे 

जबाबदार यंत्रणा-शिक्षक.

कालावधी-दि. 21.01.2023 ते 26.01.2023 (6 दिवस)

अधिकृत चालू वेळापत्रक पहा 


बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम कसा भरावा ? 
बदली पोर्टल चा अधिकृत व्हिडीओ 

 

बदलीपात्र (संवर्ग ४ ) शिक्षकांनी  प्राधान्यक्रम कसा भरावा ?


➡️ वरील लिंक वर क्लिक  करावे. क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.

➡️ डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे.

➡️ त्यातील application form वर क्लिक करावे.

➡️  application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती स्क्रीनवर दिसेल त्यावर 
शिक्षकाचे नाव
आडनाव 
शाळेचा यु डायस नंबर 
शिक्षकाचा शालार्थ आयडी 
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.

➡️ वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही.

➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल
पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर

➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल.

➡️ याचाच अर्थ बदली  पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या शाळांपैकी 30 प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे. 

➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down  मधून शाळा निवडावी.
 
➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील
किती मंजूर पदे
किती कार्यरत पदे
शाळेतील रिक्त पदे  
समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे 
बदली पात्र शिक्षकांची पदे
ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील
➡️ Add tab  वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल.

➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add  केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.

➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या  tab वर  क्लिक करून  save करावी.

 ➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून  do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.

➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences  वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save  करावी.

➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे. त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा. आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.व आपण विस्थापित होवू शकता.

➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल. तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️ संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल. तसेच आपल्या login वर देखील pdf उपलब्ध आहे.

➡️ तसेच आपणास आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही बदल करायचं असल्यास आपण आपला फॉर्म मुदतीपूर्वी withdraw करू शकता व पुन्हा भरू शकता.

 दि 15 जानेवारी २०२3 चे अपडेट्स
       शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 3.2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे बदली अधिकारपात्र शिक्षकांना 30 पर्याय देणे आवश्यक होते  13 जानेवारी 2023 च्या आर.डी.डी.  ने काढलेल्या पत्रा नुसार ही 30 पर्यायांची अट शिथिल करण्यात येऊन बदली अधिकारपात्र शिक्षकांना बदली हवी असेल तर पसंतिक्रमात किमान 1 (कमाल ३० ) पर्याय देण्याचे बंधन ठेवण्यात आलेले आहे . ज्या शिक्षकांनी या आधी आपले विकल्प पोर्टलवर सबमिट केलेले आहेत ते शिक्षक आपले पसंतिक्रम दिलेले अर्ज मागे(विड्रॉ) घेऊन परत आपले अर्ज किमान 1 (कमाल ३० ) विकल्प देऊन पोर्टलवर सबमिट करू शकतात . बदली अधिकारपात्र शिक्षकांना आपले पसंतिक्रम पोर्टल वर सबमिट करण्याची मुदत एक दिवासाने वाढवून दिलेली आहे . बदली अधिकार पात्र शिक्षक आपले पसंतिक्रम 15 जानेवारी 2023 पर्यन्त सबमीट करू शकतील.

टीप:मागितलेल्या पर्यायांपैकी शाळा मिळाली नाही तर बदली अधिकार प्राप्त शिक्षक विस्थापित होणार नाहीत. आहे त्याच शाळेत राहतील.

 दि 11 जानेवारी २०२3 चे अपडेट्स
 
बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना दि. 10 ते 15 जानेवारी दरम्यान बदली फॉर्म भरता येतील.  दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.

➡️ मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.

➡️ 16 ते 19 जाने. दरम्यान प्रक्रिया राबवून 19 जानेवारी ला बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर होतील.


➡️ सद्य परिस्थितीत बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्याच जागा दाखवल्या जातील.


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पोर्टलवर बदली करिता पसंतीक्रम दिला आणि त्यांच्या सेवाजेष्ठतेने व त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली तरच बदली होईल. त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळांना न मिळाल्यास त्यांची बदली होणार नाही ते आहे त्या शाळेवर राहतील.


संवर्ग ३ चे बदली अर्ज कसे भरावेत या संदर्भातील बदली पोर्टल चा अधिकृत व्हिडीओ पहा.


 
 दि 22 डिसेंबर  २०२२ चे अपडेट्स

कोण कोणत्या जागा मागू शकतो ? IMP

  •   CADRE 1 व ENTITLED ह्या शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील.(No Clear Vacancy)
 
  • CADRE 2 व ELIGIBLE शिक्षकांना रिक्त जागा तसेच बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील.(Clear as well as Eligible) 
        (बदली पात्र बाबत फॉर्म भरतानावेळची परिस्थिती पाहून सविस्तर पोस्ट केली जाईल.)

शिक्षक संवर्ग स्पष्टीकरण 

1. Cadre-1-संवर्ग 1

2. Cadre-2 -संवर्ग 2

3.  Entitled-बदली अधिकार
                     _प्राप्त शिक्षक

4.  Eligible- बदलीपात्र
                     शिक्षक

बदली पोर्टल अपडेट WITHDRAW 

            विशेष संवर्ग  भाग 1 मधून ज्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट केला असेल व आपणास फॉर्म मध्ये काही बदल करावयाचा असल्यास  बदली पोर्टलवर शिक्षकांना फॉर्म WITHDRAW  सुविधा दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक झाली असल्यास किंवा आपणास प्राधान्यक्रम बदल करावयाचा असल्यास फॉर्म  WITHDRAW   करून  बदल करू शकतात. 
 दि 21 डिसेंबर  २०२२ चे अपडेट्स
संवर्ग-1 मध्ये बदलीची विनंती करण्यासाठी फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षकांसाठी माहिती.

21/12/2022 ते 24/12/2022 संवर्ग-1 शिक्षक प्राधान्यक्रम भरू शकतात.

संवर्ग-1 साठी पसंतीक्रम अनिवार्य नाही जर त्यांनी पसंतीक्रम भरला नाही तर त्यांची संवर्ग-1 मध्ये बदली होणार नाही,  जर ते शिक्षक बदलीसाठी पात्र असतील आणि त्यांचे नाव बदलीपात्र यादीत असेल तर त्यांची बदलीपात्र फेरी दरम्यान बदली केली जाईल. 

संवर्ग-1 शिक्षकाला बदली करायची असेल तर त्याला किमान 1 प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम देऊ शकतात. जर त्याने कोणतेही प्राधान्यक्रम दिले नाही तर त्याला फॉर्म सबमिट करता येणार नाही. 

संवर्ग-1 मध्ये 30 पसंती क्रमाची कोणतीही सक्ती नाही.
शिक्षक आपला प्राधान्यक्रम जतन (Save) करू शकतात परंतु सबमिट करण्यास विसरू नका अन्यथा तुमचा फॉर्म बदली प्रणालीद्वारे विचारात घेतला जाणार नाही. 

एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्ममध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही. 

संवर्ग-1 शिक्षक बदलीसाठी फक्त शाळा निवडू शकतात जिथे बदली पात्र शिक्षक उपलब्ध असतील.

संवर्ग-1 शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहे ती शाळा पसंतिक्रमात निवडू शकत नाहीत. 

संवर्ग-1 शिक्षकाने जर फॉर्म, मला संवर्ग-1 अंतर्गत बदली नको असे निवडून सबमिट केला असेल,  तर त्यांनी बदली प्रक्रियेतून सूट घेतल्या मुळे त्यांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली जाणार नाही.

संवर्ग-1 साठी पसंतीक्रम भरण्यासाठी दिलेल्या तारखा संपल्यानंतर, शिक्षक, बदली व्यवस्थापन प्रणालीमध्ये कोणतेही प्राधान्यक्रम बदलू किंवा सबमिट करू शकणार नाहीत.

संवर्ग-1 फॉर्म सबमिट करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यांच्या पसंती क्रमाची पडताळणी करावी आणि त्यांनी भरलेला प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करावी. 

विशेष सूचना :- Vinsys च्या नवीन सूचनेनुसार जर संवर्ग-1 शिक्षकाने प्रदान केलेल्या प्राधान्य क्रमानुसार बदली मिळाली नाही तर त्याची या संवर्ग-1  फेरीत बदली होणार नाही, परंतु जर तो शिक्षक बदली पात्र शिक्षक असण्याची शक्यता आहे तर मात्र बदली पात्र शिक्षकांच्या फेरीत त्याची बदली होणार आहे.अशा शिक्षकाने बदली पात्र फेरीत परत प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

संवर्ग-1  शिक्षकांनी फॉर्म भरण्यापूर्वी व्हिडिओ ट्युटोरियल https://www.youtube.com/watch?v=i5_CAYxt3PE&feature=youtu.be 

पहावे आणि काही शंका असल्यास कोणत्याही स्पष्टीकरणासाठी नोडल कार्यालयाशी संपर्क साधावा. 

शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी असेल आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी अडचण टाळण्यासाठी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत उशीर करू नये,  आम्ही सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळेत भरावेत. 

पोर्टल वर वापरला जाणारा ओटीपी ईमेलवर आणि तसेच शिक्षकांच्या मोबाइलवर पाठवले जातात, जर तुमचा ओटीपी तुमच्या इनबॉक्समध्ये दिसत नसेल तर तुमचा जंक ईमेल तपासायला विसरू नका. 

तुमची  बदली तुमच्या हातात आहे योग्य वेळ द्या आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या आणि त्यानंतरच तुमचे प्राधान्यक्रम सबमिट करा.


संवर्ग १ चा फॉर्म कसा भरावा याचा बदली पोर्टल चा अधिकृत व्हिडीओ 



 दि 12 डिसेंबर  २०२२ चे अपडेट्स
Appeal To CEO कसे करावे ?

                  जर आपणास प्रसिद्ध झालेल्या बदलीपात्र/बदली अधिकार पात्र/संवर्ग 1 व 2 यादीवर आक्षेप घ्यायचा असेल तसेच profile मध्ये एखादी दुरुस्ती करायची असेल किंवा EO यांनी अपिलवर दिलेला निर्णय मान्य नसेल तर Appeal To CO खालीलप्रमाणे करावे.


1) profile ला नोंदवलेल्या मोबाईल नंबरने वरील बदली पोर्टलला लॉगिन करावे.
2) लॉगिन झाल्यानंतर डावीकडील Intra District यावर क्लीक करून List open करावी
3)List open केल्यावर ज्या संवर्गात आपणास Appeal करायचे आहे. (ENTITLED/ELIGIBLE/CADRE 1/CADRE 2) त्या संवर्गाच्या List वर क्लीक करावे.
4) याठिकाणी आपणास Appeal To CO हे option दिसेल त्यावर क्लीक करून Accept  वर क्लीक करावे.
5) आक्षेप विषय व त्याविषयी अधिक माहिती लिहून आक्षेपबाबत अर्ज व पुरावा UPLOAD करावा (2 MB पेक्षा कमी PDF UPLOAD करावी) आणि Appeal send to CO करावे.
Appeal To CO ही कार्यवाही दि.11/12/13 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करायची आहे.

6) यानंतर आपणास दिलेल्या वेळापत्रकानुसार मा.CEO कार्यालयाकडून आक्षेप/Appeal निकाली काढणेबाबत कळवले जाईल.


APPEAL TO CEO करणेबाबत सूचना 
  • शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या बदली पोर्टल लॉगिनला प्राप्त सर्व आक्षेप/अपील वरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून सर्व Case Closed करण्यात आलेल्या आहेत.
  • यासंदर्भातील स्पष्टीकरण OTT पोर्टल लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरील कार्यवाहीबाबत संबंधित कर्मचारी हे असहमत असल्यास ते CEO लॉगिन ला विहित वेळेत ऑनलाईन Appeal करू शकणार आहेत.

  •  ज्या शिक्षकांना शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी दिलेला निर्णय मान्य नाही किंवा ज्यांना पुन्हा आपल्या शिक्षक PROFILE बाबत अपील करायचे आहे,अश्या  शिक्षकांनी 11,12 व 13 डिसेंबर 2022 रोजी आपल्या लॉगिनवरून APPEAL TO CEO करावे.
        नंतर मा.CEO साहेब शिक्षकांनी केलेल्या अपिलवर योग्य तो निर्णय देतील.
        मा.CEO साहेब यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल.


 अपडेट व चालू वेळापत्रक , पोर्टल सद्यस्थिती 


दि 1 डिसेंबर  २०२२ चे अपडेट्स

अपील कसे करावे?
       
नवीन वेळापत्रकाप्रमाणे आपणांस दिनांक 30 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर 2022 पर्यंत बदली यादी संदर्भात आक्षेप घ्यायचे आहेत .
जर आपणास प्रसिद्ध झालेल्या बदलीपात्र/बदली अधिकार पात्र/संवर्ग 1 व 2 यादीवर आक्षेप घ्यायचा असेल किंवा profile मध्ये एखादी दुरुस्ती करायची असेल तर Appeal To Eo खालीलप्रमाणे करावे.

https://ott.mahardd.in या वेबसाईटवर जावून लॉगीन व्हावे.

1) profile ला नोंदवलेल्या मोबाईल नंबरने वरील बदली पोर्टलला लॉगिन करावे

2) लॉगिन झाल्यानंतर डावीकडील Intra District यावर क्लीक करून List open करावी .

3) List open केल्यावर ज्या संवर्गात आपणास Appeal करायचे आहे त्या संवर्गाच्या List वर क्लीक करावे .

4) याठिकाणी आपणास Appeal To EO हे option दिसेल त्यावर क्लीक करून Accept  वर क्लीक करावे .

5) आक्षेप विषय व त्याविषयी अधिक माहिती लिहून आक्षेपबाबत जर पुरावा द्यायचा असेल तर 2 MB पेक्षा कमी PDF UPLOAD करावी आणि Appeal send to EO करावे.

6) यानंतर आपणास दिलेल्या वेळापत्रकानुसार EO कार्यालयाकडून आक्षेप/Appeal बाबत कळवले जाईल.
  • अपील कसे करावे ? याचा बदली पोर्टल चा व्हिडीओ देखील अधिक माहिती साठी पाहू शकता.
          संवर्ग निहाय अपडेट बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त तसेच संवर्ग १ व संवर्ग २ च्या नवीन अपडेटेड याद्या बदली पोर्टल वर जाहीर झाल्या असून याद्या आपण download करू शकता व आक्षेप असेल तर आक्षेत घेवू शकता.
  •  याद्या download करण्यासाठी प्रथम बदली पोर्टल ला login करा . login केल्यावर intra district tab मध्ये list या tab मध्ये जा. त्या ठिकाणी आपणास संवर्ग निहाय ४ tab दिसतील. आपणास ज्या संवर्गाची यादी download करावयाची आहे , त्या tab ला click करा. खालील स्क्रीन मध्ये पहा.

  • आपणास हव्या त्या tab ला click केल्यास   खालील प्रमाणे यादी दिसेल .download करण्यासाठी pdf किंवा Excel ला click करून आपण सदर यादी download करू शकता. खालील स्क्रीन मध्ये पहा.

  •  जर आपणास आक्षेप असेल तर आपण Appeal to Eo ला click करून अपील करू शकता ,पण त्यासाठी आपणास  पुरावे असणे आवश्यक आहे. त्या साठी लेखी अर्ज व पुरावे ची pdf व खालील माहिती appeal tab वरून सबमिट करावी लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.


  • पोर्टल सद्यस्थिती व चालू वेळापत्रक 


दि 22 नोव्हेंबर  २०२२ चे अपडेट्स

🍁 Phase-3 जिल्हांतर्गत बदली 🍁

मा.अवर सचिव,ग्रामविकास यांच्या दि.18.11.2022 च्या सुधारित वेळापत्रकानुसार Phase-3 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही एकूण 28 टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे.

सध्या सुरू असलेले टप्पे-

📌 टप्पा क्र.3-विशेष संवर्ग भाग-1 आणि विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म रद्द करणे.

●जबाबदार यंत्रणा-मुख्य कार्यकारी अधिकारी.

●कालावधी-दि.22.11.2022 ते 24.11.2022

      दि. 18.11.2022 ते 21.11.2022 या टप्प्यात विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत.
     या टप्प्यात फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या फॉर्मची प्रिंट व त्यासोबत आपापल्या संवर्गानुसार लागू असलेले पुरावे जोडून पडताळणीसाठी आपापल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दिनांक 22.11.2022 पर्यंत जमा करावेत.या फॉर्मची व पुराव्यांची गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समितीमार्फत पडताळणी होईल.

●या पडताळणीनंतर खालील प्रकारचे फॉर्म CEO लॉगिनवरुन Reject (रद्द) केले जातील.
1.पडताळणीत अवैध ठरलेले फॉर्म.
2.पुरावे सादर न करु शकलेल्या शिक्षकांचे फॉर्म.
3.चुकून फॉर्म भरल्यानंतर अनावधानाने दिलेल्या मुदतीत Withdraw करावयाचे राहिलेले फॉर्म संबंधित शिक्षकांच्या विनंती अर्जावरून Reject केले जातील.

●या टप्प्यात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी Reject (रद्द) केलेल्या शिक्षकांचे फॉर्म पुन्हा पोर्टलवर स्वीकारले जाणार नाहीत.

●हा टप्पा संपल्यानंतर दिनांक 25.11.2022 रोजी शिक्षणाधिकारी लॉगिनवरून विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 शिक्षकांच्या याद्या जाहीर/प्रसिद्ध करण्यात येतील.
       

बदली व पोर्टल मदत केंद्र-बार्शी
श्री.दत्तात्रय पाटील-9421874085
श्री.मोहन पवार-9423993146
 दि 19 नोव्हेंबर  २०२२ चे अपडेट्स   
बदली पोर्टल सुरु झाले असून संवर्ग १ व संवर्ग २ चे अर्ज भरणे (होकार / नकार ) सुरु झालेले आहे. (कालावधी-दि.18.11.2022 ते 21.11.2022)
(फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व माहिती आवश्य वाचा.)
संवर्ग १ होकार / नकार बाबत अत्यंत महत्वाचे

  • संवर्ग १ चा अर्ज भरताना ज्यांना संवर्ग १ मधून बदली करून घ्यायची आहे त्यांनी I should be Exempted from Transfer? ( मला बदलीतून सूट मिळावी) या रकाण्यात NO नोंदवायचे आहे.

  • संवर्ग १ चे जे शिक्षक बदलीपात्र आहेत (सध्याच्या क्षेत्रात १० वर्ष व सध्याच्या शाळेत ५ वर्ष) परंतू त्यांना बदली नको आहे त्यांनी या रकाण्यात YES नोंदवायचे आहे.
संवर्ग १ मधील पोर्टल वर असणारे मुद्दे खाली पहा.



संवर्ग २ मध्ये बदली पोर्टल वर असणारे मुद्दे खाली पहा.


संवर्ग १ व २ चे फॉर्म कसे भरावेत या संदर्भात बदली पोर्टल चा आलेला खालील  व्हिडीओ एकदा आवश्य पहा.



Phase-3 जिल्हांतर्गत बदली संवर्ग १ व २ होकार नकार बाबत 
 

मा.अवर सचिव,ग्रामविकास यांच्या दि.18.11.2022 च्या सुधारित वेळापत्रकानुसार Phase-3 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही एकूण 28 टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे.

सध्या सुरू असलेले टप्पे-

📌 टप्पा क्र.1-रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे-

●जबाबदार यंत्रणा-मुख्य कार्यकारी अधिकारी.

●कालावधी-दि.18.11.2022 ते 18.11.2022.

📌 टप्पा क्र.2-विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म भरणे.

●जबाबदार यंत्रणा-शिक्षक.

●कालावधी-दि.18.11.2022 ते 21.11.2022

                या टप्प्यात विशेष संवर्ग 1 व 2 च्या शिक्षकांनी आपापली सेवाविषयक माहिती व बदली पाहिजे किंवा नको एव्हढीच माहिती म्हणजेच बदलीसाठी होकार किंवा नकार भरायचा आहे.प्रशासनाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर व आपला अर्ज पात्र ठरल्यानंतर 30 शाळांचे प्राधान्यक्रम विशेष संवर्ग 1 साठी सुधारित वेळापत्रकाच्या 10 व्या टप्प्यात आणि विशेष संवर्ग 2 साठी 13 व्या टप्प्यात भरावयाचे आहेत.

❓ फॉर्म कोणी भरावे..?

■■ विशेष संवर्ग भाग-1 ■■

●जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीतील विशेष संवर्ग-1 च्या ज्या शिक्षकांना बदली हवी आहे, त्यांनी बदलीसाठी होकाराचा फॉर्म भरावा.ज्यांना बदली नको आहे, त्यांनी बदलीतून सूट मिळण्यासाठी नकाराचा फॉर्म भरावा.

●जे शिक्षक वरील बदलीपात्र यादीत नाहीत,परंतु दिनांक 07.04.2021 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.8.1 ते 1.8.20 नुसार विशेष संवर्ग 1 साठी पात्र आहेत,त्यांना बदली हवी असेल तर त्यांनी होकाराचा फॉर्म भरावा.

● संवर्ग 1 मधून बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही.(G.R. मुद्दा क्र.4.2.7)

📢 विशेष संवर्ग भाग-1 साठी महत्वाच्या बाबी-

1.विशेष संवर्ग 1 शिक्षकांना बदलीसाठी दोनच मार्ग उपलब्ध असतील.

●एक-बदलीतून सूट मागणे (नकार देणे)
●दोन-बदलीपात्र शिक्षकांना खो देणे.

●संवर्ग 1 मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवर (Clear Vacancy) बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.2.6) ही तरतूद बदली अभ्यास गटाने विशिष्ट हेतू समोर ठेवून केली आहे.

●विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. बदलीतून सूट घेणे म्हणजेच बदलीसाठी नकार देणे हा सुद्धा विशेष संवर्ग 1 अंतर्गत घेतलेला "लाभच" आहे याची जाणीव ठेवावी.

●बदलीसाठी नकार देणारा बदलीपात्र विशेष संवर्ग 1 मधील शिक्षक हा जोपर्यंत त्याची बदली होणार नाही, तोपर्यंत दरवर्षी बदलीपात्रच राहणार आहे. अशा शिक्षकांना दरवर्षी बदली प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे.

2.विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरणाऱ्या 1.8.1 ते 1.8.20 मधील शिक्षकांना आपापल्या संवर्गानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. (G.R. मुद्दा क्.4.2.8)

●पडताळणीमध्ये अर्ज अपात्र ठरला तर संबंधित शिक्षकांचा अर्ज CEO लॉगिन वरून रद्द केला जाईल व चुकीची माहिती भरल्याबद्दल एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. (शासन निर्णय दि. 28.06.2018 व उपसचिव ग्रामविकास यांचे पत्र दि.11.08.2022)

3.विशेष संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांबद्दल बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास,त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येईल. अशी पडताळणी केल्यानंतर शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करतील. (G.R. मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5)

4.दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या लाभांचा इतरांनी जाणीवपूर्वक फायदा घेतल्यास, त्यांच्यावर RPWD Act 1995 व RPWD Act 2016 मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.
■■ विशेष संवर्ग भाग-2 ■■

●पती-पत्नी यांच्या सध्याच्या कार्यरत कार्यालयांमध्ये 30 कि.मी. पेक्षा जास्त अंतर असेल तर दोघांपैकी ज्यांना बदली हवी आहे, ते विशेष संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू शकतात.शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 नुसार प्राधान्यक्रमाने संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या होतील.

● विशेष संवर्ग 2 मधून बदली झाल्यानंतर पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.3.6)

📢 विशेष संवर्ग भाग-2 साठी महत्त्वाच्या बाबी-

1.विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना जोडीदाराच्या कार्यालयाच्या 30 कि.मी. परिघातील सर्व उपलब्ध जागांपैकी 30 पर्याय निवडला येतील.

2.30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.30 कि.मी.अंतराचा दाखला हा "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग" या सक्षम अधिकाऱ्यांचाच ग्राह्य धरला जाईल.(G.R.मुद्दा क्र.4.3.5)
     इतर कोणताही अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.
3.अर्ज पडताळणीमध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास त्यांचा अर्ज CEO लॉगिनवरून रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर शासन निर्णय दि .28.06.2018 व उपसचिव, ग्रामविकास यांच्या दि.11.08.2022 च्या पत्रानुसार कारवाई होईल.

4.बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास व खोटी माहिती भरून बदली झाल्याचे आढळल्यास G.R.मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5 मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करतील.


बदली व पोर्टल मदत केंद्र-बार्शी
श्री.दत्तात्रय पाटील-9421874085
श्री.मोहन पवार-9423993146


 आज दि 11 नोव्हेंबर  २०२२ चे अपडेट्स
          जिल्हांतर्गत बदलीसाठीच्या बदलीपात्र शिक्षक,बदली अधिकारप्राप्त शिक्षक याद्या व्हिन्सीस कडुन राज्यातील सर्व मा.EO लाॅगिनवर उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.सदर याद्या लवकरच  शिक्षकांसाठी प्रदर्शित होतील.लवकरच बदली बाबतचे अपडेट नवीन वेळापत्रक शासनस्तरावरुन निर्गमित होण्याची शक्यता आहे. 
पोर्टल सद्यस्थिती


     
 दि 5 नोव्हेंबर  २०२२ चे अपडेट्स 



  •  काल झालेल्या VC नुसार, सद्या 31/12/22 पर्यंत सेवानिवृत्त, कालच्या  तारखेपर्यंत निधन झालेले, यांना system मधून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  • यानंतर BEO/EO Login वरुन Sanction, working & Compulsary vacancy update करणे आहे.
  •  यानंतर eligible व entitled ची यादी व रीक्त पदे, समानीकरणात रिक्त पदे प्रसिद्ध केले जाईल.
  •  त्या नंतर लगेच संवर्ग 1/2 साठी माहिती भरणे सुरू होईल.
          बदली पोर्टल ची सद्यस्थिती खालील स्क्रीन मध्ये पहा.



आज दि 31 ऑक्टोबर २०२२

बदली प्रक्रिया ब्रेकिंग -बदली पोर्टल अपडेट

बदली पोर्टल सुरू झाले आहे . फक्त CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे. त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील,5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होण्याची शक्यता. 
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत VC संपन्न...



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आज दि 2६ सप्टेंबर २०२२ 

बदली पोर्टल वर खालील प्रमाणे सूचना दिलेली आहे . त्यामुळे लवकरच बदली प्रक्रिया सुरु होईल. 

In preparation of starting Intra District Transfer Process soon. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्याच्या तयारीत.

(आपण खालील स्क्रीन शॉट मध्ये पोर्टल वर दिलेली सूचना पाहू शकता .)



बदली पोर्टल  (विन्सीस ) चा आलेल्या मेल मध्येही जिल्हांतर्गत बदली लवकरच (उद्या) सुरु होईल असे सांगितले आहे. आपण बदली पोर्टल / विन्सीस चा आलेला मेल खालील स्क्रीन शॉट मध्ये पाहू शकता.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.