जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया परिपत्रक दि ८ सप्टेंबर २०२२ अर्थ व स्पष्टीकरण

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया परिपत्रक दि ८ सप्टेंबर २०२२  अर्थ व स्पष्टीकरण
 



            जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व  आंतरजिल्हा बदल्यांसाठी दिनांक 7 एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय नुसार सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत ( बदलीस पात्र असलेल्या, विशेष संवर्ग भाग एक मधील, विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्हा जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेली आहेत.

      शासनाच्या   दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेला सुधारित धोरणानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलांची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षक अभ्यास गटात समवेत VC द्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्द्यांसंदर्भात खालील प्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात येत आहेत.

  •           अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाबाबत

            संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन ,पदस्थापना सदर ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना दिनांक 10- 6 -2022 च्या शासनपत्रांवर देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत  दिनांक १० -६ -२०२२  च्या पत्रातील सूचनांप्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

  •  आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती बाबत

             सन 2022 या वर्षात जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक 5 सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे शासनाकडील दिनांक 30 ऑगस्ट 2022 च्या पत्रांमुळे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळवले आहे, तथापि कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करताना प्रचलित धोरणानुसार दहा टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना ही सदर पत्रात नमूद आहे. त्यामुळे सण 2022 या वर्षात जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शासनाकडील दिनांक 30- 8 -2022 च्या पत्रातील सूचना प्रमाणे कार्यवाही करावी.

  •      सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमाबाबत 

        जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भातील शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील 4.5 टप्पा क्रमांक 5 मध्ये बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती नमूद आहे. त्यानुसार अशा शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक चार ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य आहे. असा पसंती क्रम देताना त्यांना अवघड /सर्वसाधारण क्षेत्रातील जागांचा पसंती क्रम देण्याची मुभा आहे.

  •      क्षेत्र वाढीमुळे नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांबाबत,बंद शाळांबाबत

        महानगरपालिका, नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांसह सेवा हस्तांतरित करण्याबाबत पुणे व ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालयात विविध रेट याचिका दाखल केलेले आहेत. सदर याचिकांमध्ये ग्रामविकास विभागाकडे दिनांक 20 सात 1999 व दिनांक 25 -7 -2019 रोजी चे दोन्ही शासन निर्णय आजही अस्तित्वात असल्याचा तसेच त्यातील तरतुदी विसंगत परस्परविरोधी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून सदर याचिका मा न्यायालयात प्रलंबित आहेत. महानगरपालिका, नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या सेवेसह हस्तांतरित करण्याबाबतचा मुद्दा सदर याचिकांमध्ये न्यायप्रविष्ठ असून अशा प्रकरणी मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करणे आवश्यक्य आहे. त्यामुळे अशा शाळांतील शिक्षकांच्या बदलीबाबत करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाच्या दिनांक 12- 8 -2022 च्या पत्रांने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व ठाणे यांना कळविण्यात आले आहे. राज्यातील अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी अशाच प्रकारच्या याचिका मा न्यायालयात दाखल केला असल्यास त्या प्रकरणी देखील शासनाच्या मुक्त दिनांक 12 -8 -22 च्या पत्रातील निर्देशाप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. जेणेकरून मान्य न्यायालयाच्या आदेशाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही.

5.   समानीकरणाबाबत 

       जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसंदर्भातील शासन निर्णय क्रमांक ७  एप्रिल 2021 मधील परिशिष्ट 2.3 मध्ये शाळा निहाय रिक्त जागा घोषित करण्याबाबतची तरतूद नमूद असून परिशिष्ट 4.1 टप्पा क्रमांक एक मध्ये याबाबतची कार्यपद्धती नमूद आहे. समानीकरण बाबत सदर शासन निर्णयातील  तरतुदीनुसार कार्यवाही करावी.

6.     नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरित झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांक बाबत

        असे शिक्षक सध्या कार्यरत असलेल्या नवनिर्मित जिल्हा यापूर्वीच्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता त्या जिल्हा परिषदेत त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक हा नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरित झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक म्हणून नमूद करावा.

          शासनाच्या संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदली संदर्भातील शासनाचे सुधारित धोरण त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना तसेच वरील स्पष्टीकरणात्मक सूचना विचारात घेऊन विहित मुदतीत आवश्यक्य ती कार्यवाही करावी ही विनंती.

दि ८ सप्टेंबर चे परिपत्रक खाली अधिक माहिती करिता पाहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.