बदली परिपत्रक दि १९ सप्टेंबर २०२२ अर्थ व स्पष्टीकरण

 बदली परिपत्रक दि १९ सप्टेंबर २०२२  अर्थ व स्पष्टीकरण 


      आज दि १९ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उपसचिव मा. श्री.  का. गो. वळवी यांनी बदली संदर्भात परिपत्रक निर्गमित केले आहे . या परिपत्रकानुसार............         

            जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे आंतरजिल्हा बदल्यांबाबत दिनांक 22 -8 -2022 रोजी आदेश निर्गमित झाल्याने प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे. सदर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक 5 -9- 2022 पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबत संदर्भातील दिनांक 30 -8- 20122 च्या पत्रांमुळे सूचना देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून सुरू असेलच.

           आता जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे जिल्हांतर्गत बदलांबाबतची कार्यवाही सुरू करावयाची आहे. त्याकरिता दिनांक 31- 8- 2022 पर्यंत सेवानिवृत्त / निधन किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदी त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन बदली प्रणालीवर अद्यावत करण्यात यावा.

          दिनांक 31- 8 -2022 पर्यंतची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर अद्यावत केल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हांतर्गत बदलांबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय आतील तरतुदीनुसार समायोजनाने पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी .जेणेकरून एका जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती होणार नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही विना व्यत्यय पार पाडली जाईल याची कृपया दक्षता घ्यावी ही विनंती.

अधिक माहिती करिता दि १९ सप्टेंबर २०२२ चे बदली परिपत्रक पहा व वाचा. 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.