पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची
शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. १८/०८/२०२२ ते दि. २८/०८/२०२२ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
(शाळांना आक्षेप नोंदवण्याची सोय शाळा login (click Here) मध्ये दिलेली आहे.)
रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च
प्राथमिक (पाचवी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
(आठवी) या परीक्षेची इयत्तानिहाय पेपरनिहाय अंतरिम
(तात्पुरती) उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर या
परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, पालक, शाळा
आणि क्षत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध
करण्यात येत आहे.
अंतरिम उत्तर सूचीवरील आक्षेप
नोंदवण्याची कार्यपद्धती
1. सदर अंतरिम उत्तर
सूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन
परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन स्वरूपात
करता येईल.
2. सदर ऑनलाईन निवेदन
पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरता
त्यांच्या लॉगिन मध्ये objection On Question Paper
& Interim Answer Key या हेडिंग खाली
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
3. त्रुटी आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन
भरण्याकरता दिनांक 18 -8-2022 ते 28-8-2022
रोजी पर्यंत मुदत देण्यात
येत आहे.
4. दिनांक 28-8-2022 नंतर त्रुटी
आक्षेपाबाबतची निवेदन स्वीकारले जाणार नाही.
5. उपरोक्त ऑनलाईन निवेदन शिवाय इतर
कोणत्याही प्रकारे टपाल ,समक्ष अथवा ईमेलद्वारे
प्राप्त त्रुटी आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार
केला जाणार नाही.
6. उपरोक्त नुसार विहित
मुदती प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना
वैयक्तिकरित्या उत्तर पाठवले जाणार नाही.
7. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन
निवेदनावर संबंधित विषय तज्ञांची अभिप्राय
घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर
येतावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाईन
आवेदन पत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती
दुरुस्ती करणे करिता कार्यपद्धती
१. विद्यार्थ्यांच्या
ऑनलाईन आवेदन पत्रातील माहितीत व शाळा
माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव-वडिलांचे
नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी
दिनांक 18-8 2022 ते 28-8-2022 रोजी पर्यंत
शाळांच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध
करून देण्यात आलेले आहे.
2. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त इतर कोणत्याही
पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत विविध
मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला
जाणार नाही.
अधिक माहिती परिषदेच्या खालील प्रसिद्धी पत्रकात पाहू शकता.
Jayesh shinde
उत्तर द्याहटवाSamarth kailas makhar
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .