अल्पसंख्यांक प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती, Minority Pri Matric Scholarship 2022

अल्पसंख्यांक प्रि  मॅट्रिक शिष्यवृत्ती २०२२, Minority Pri Matric scholarship 2022


(अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म वरील लिंक वरून भरू शकता.)

                 अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून सुरू आहे. सन 2022-23 या वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या https://scholarships.gov.in/ संकेतस्थळावरून अर्ज भरावयाचे आहेत.
               शिष्यवृत्ती पात्रतेच्या अटी व शर्ती
  •        इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय निमशासकीय खाजगी अनुदानित विनाअनुदानित कायम विनार्दानीत व स्वयं अर्थ साहाय्यक स्वयं अर्थ सहाय्यक शासन मान्यताप्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. 
  • अर्जदार मागील अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. (फक्त पहिली साठी गुणांची अट नाही )
  •  पालकाचे कुटुंबाचे ( एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.
  •  पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली असणे आवश्यक्य आहे.
  •  एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
  •  अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरावी.
  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. 
  • एकूण पात्र विद्यार्थ्यापैकी 30% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे.
  •  विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वस्तीगृहात राहत असतील अथवा राज्य शासनाच्या वस्तीगृहात राहत असतील, केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वस्तीग्रहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात.
  •  तसेच वस्तीग्रह मध्ये भरलेले शुल्काच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
  •  धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र
  •  उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •  गुणपत्रक
  •  आधार कार्ड / आधार नोंदणी / पावती 
  • विद्यार्थ्याचा फोटो
  •  बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत
                 

               शाळेसाठी सर्वसाधारण सूचना 
  •               शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे वर्ग निहाय , वर्ष निहाय किमान पाच वर्ष जतन करून ठेवावे.
  •  ज्या शाळा बंद झालेले आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेत शासनाची मान्यता आहे परंतु वर्गास मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारू नयेत. तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गांमधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज रिजेक्ट किंवा फेक मार्क करावे.
  •  शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांची अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत. तसेच विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहे. याची खात्री करावी. शाळा स्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जावरील माहिती यामध्ये तपावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थ्यास संधी देऊनी माहिती चुकीची बनल्यास रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा बनावट अर्ज आढळल्यास अर्ज फेक मार्क करण्यात यावा. 
  • शाळेचे मुख्याध्यापक व नोडील ऑफिसर यांची आधारनुसार माहिती एनएसपी 2.0 या पोर्टल वरती भरण्यात यावी. सन 2015-16 पासून शिष्यवृत्तीचे वितरण केंद्र शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे करण्यात येत आहे. सन 21-22 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सण 22-23 करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक्य आहे.
  • नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांस भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याचे  दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.
  • विद्यार्थ्याचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेच्या असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयीकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल. 
  • इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाची अर्ज एन एस पी पोर्टल या पोर्टलवर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेची मुख्याध्यापकाची राहील. हे अर्ज भरण्याची सुविधा मायनॉरिटी अफेयर्स डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. 
  • अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो दोन पाल्यांसाठीच वापरता येईल ऑनलाइन अर्ज भरताना अडचण आल्यास वेबसाईटच्या होमपेज वरील फ्रिक्वेंटली आज रिक्वेस्टर्स चा वापर करावा. इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास विद्यार्थ्या शिष्यवृत्ती रक्कम रुपये 1000 ते 10000 शासनाद्वारे दिली जाईल. अधिक माहितीसाठी आपल्या शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयास संपर्क करावा.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .