आंतर जिल्हा बदली चुकीची माहिती भरल्यास कारवाई बाबत परिपत्रक दि ११ ऑगस्ट २०२२ अर्थ व स्पष्टीकरण

 आंतर जिल्हा बदली चुकीची माहिती भरल्यास कारवाई बाबत परिपत्रक दि ११ ऑगस्ट २०२२

अर्थ व स्पष्टीकरण 


कारवाईबाबत दि १८ ऑगस्ट २०२२ चे परिपत्रक download साठी येथे click करा.

(खालील दि ११ ऑगस्ट च्या परिपत्रका प्रमाणेच वरील दि १८ ऑगस्ट २०२२ च्या परिपत्रकामध्ये कारवाईची माहिती दिली आहे.)


ग्राम  विकास विभागाचे उप  सचिव श्री. का. गो . वळवी साहेब यांच्या दि ११ ऑगस्ट २०२२ च्या परिपत्रकानुसार....... 

               जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांसाठी दिनांक ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या /विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी) वेळोवेळी शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेली आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ठरवण्यात आलेले धोरण व त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना स्वयं स्पष्ट असून सदर धोरणातील तरतुदीप्रमाणे ऑनलाइन प्रणालीमार्फत अर्ज सादर करण्यासंदर्भात शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

           जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग एक शिक्षक यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेल्या अशा शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णता खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती भरून अर्ज करणे अपेक्षित आहे. शिक्षकीपेशा हा उदात्त पेशा असल्यामुळे व भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने अशा जबाबदार व्यक्तींकडून अर्ज भरताना जाणीवपूर्वक चुकीची व खोटी प्रमाणपत्रे कागदपत्रे माहिती सादर केली जाणे अपेक्षित नाही.

            तथापि काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आहेत अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे जर अर्ज भरल्यास व त्या आधारे काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा स्वरूपाच्या तक्रारीची विहित वेळेत  चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. सबब वरील बाबी विचारात घेऊन आता.....

 खालील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

         अ ) जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग एक शिक्षक या संवर्गात वर्ग सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी. अशी पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम टप्प्याटप्प्याने 12, 13  व 14 ऑगस्ट 2022 या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे. 

       ब ) पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल त्यांना अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा. दि  28- 6 -2016 च्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धती अनुसरून संबंधित शिक्षकाची एक वेतन वाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी. मात्र बदलल्या संदर्भात ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकांस नव्याने अर्ज भरण्याची मुभा असणार नाही.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.