Student Portal मध्ये Student Request कशी पाठवावी ?
- प्रथमतः स्टुडंट पोर्टलला जावून यु-डायस, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागेल. खालील स्क्रीन पहा .
- एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्याला Request पाठवण्यासाठी ट्रान्सफर या टॅब मध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट याला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन पहा .
- ट्रान्सफर रिक्वेस्ट ला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. खालील स्क्रीन पहा .
- वर search by येथे सर्च बाय Udise स्कूल नेम हे सिलेक्ट करावे लागेल. प्रीवियस स्कूल यु-डायस याच्यामध्ये ज्या शाळेला रिक्वेस्ट पाठवायचे आहे त्या शाळेचा यु-डायस नंबर टाकून बाहेर मोकळ्या क्लिक करावे लागेल. (ट्रान्सफर रिक्वेस्ट हि नेहमी नव्या किंवा सध्याच्या शाळेने जुन्या किंवा पूर्वीच्या शाळेस पाठवायची असते.) क्लिक केल्यानंतर प्रिव्हियस स्कूल नेम याच्यामध्ये जुन्या शाळेचे नाव त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव व यु-डायस नंबर दिसेल. खात्री केल्यानंतर ज्या वर्गात तो विद्यार्थी शिकत आहे . तो वर्ग सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर फाईंडला क्लिक करावे लागेल.खालील स्क्रीन पहा .
- आपल्यासमोर अशा पद्धतीने त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. ज्या विद्यार्थ्यांला रिक्वेस्ट पाठवायचे आहे, त्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या सुरुवातीला चेक बॉक्स आहे. त्या बॉक्स मध्ये क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन पहा .
- चेक बॉक्सला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याच्या नावापुढील माहिती भरायची टॅब ओपन होतील. विद्यार्थी नावापुढे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची सध्याची इयत्ता निवडावा लागेल. स्ट्रीम Not Applicable निवडावी लागेल. डिव्हिजन निवडावी लागेल. त्या विद्यार्थ्यांचा सध्याच्या नवीन शाळेतील जनरल रजिस्टर नंबर टाकून त्यापुढे डेट ऑफ ऍडमिशन सिलेक्ट करावे लागेल. डेट ऑफ ऍडमिशन टाकावी . त्यानंतर सेंड रिक्वेस्ट ला क्लिक करावे लागेल.खालील स्क्रीन पहा .
- सेंड रिक्वेस्ट ला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने खात्री करा असा मेसेज येईल. त्या ठिकाणी खात्री असेल तर ओके म्हणावे लागेल.
- ओके म्हटल्यानंतर स्टुडन्ट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली असा मेसेज आल्यावर ok ला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन पहा .
- जर शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्या असेल तर शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आपणास वरील पद्धतीनेच पण अटॅच रिक्वेस्ट या टॅबमधून पाठवावे लागेल. खालील स्क्रीन पहा .
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .