वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत परिपत्रक दि १५ जुलै २०२२

 


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत परिपत्रक दि १५ जुलै २०२२

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत दि १५ जुलै २०२२ रोजी आलेल्या परिपत्रकानुसार......

           वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2021- 22 दिनांक एक जून 2022 पासून राज्यातील खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक ,माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासाठी ऑनलाइन स्वरूपात यशस्वीरित्या सुरू आहे.

             राज्यात एकूण 94541 प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंद नाव नोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक 14 जुलै 2022 रोजी पर्यंत 52 हजार 551 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाली असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित  प्रशिक्षनार्थिनी  आपले प्रशिक्षण दिनांक 31 जुलै 2022 पूर्वी पूर्ण करावे.

         तथापि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेलमध्ये असणाऱ्या दुरुस्त्या प्रशिक्षण गट व प्रकार यामध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरू झाले आहे. अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू झालेल्या दिनांकापासून पुढील 45 दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मार्फत सेवा अद्यावतीकरण या क्रांती या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवसात कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक 25 जुलै 2022 पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरू असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता खालील परिपत्रक दि १५ जुलै २०२२ वाचा.


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .