क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार)

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार 

(राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) 



 



राज्य पुरस्कार शासन निर्णय दि २८ जून २०२२ नुसार........

           राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत यापूर्वी चा दिनांक 21 जुलै 2016 चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार या नव्या नावाने राबवण्यास शासन मान्यता देत आहे.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अटी व निकष पुढीलप्रमाणे राहतील.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रस्तावासाठी आवश्यक अटी

 1.शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.

2 मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नाम निर्देशनासाठी सादर केलेली पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.

 3 शिक्षक, मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान दहा वर्षे आवश्यक.

 4 शिक्षकाचे, मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.

 5 विभागीय चौकशी सुरू नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र. 

6 शिक्षकांनी केलेल्या लगतच्या पाच वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्य सर्व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल.

 7 प्रतिनियुक्ती वरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत. 

8 शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असली बाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

(पुरस्काराचे सविस्तर निकष ,स्तर निहाय गुण व कमाल गुण तक्ता सर्वात खाली तळात पहा.) 

             क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी पुढील प्रमाणे प्रवर्ग, पुरस्कार संख्या व जिल्हा निवड समितीकडून राज्य निवड समितीकडे शिफारसी सहप्राप्त करून घ्यावयाची शिक्षकांची संख्या प्रस्तावित करण्यात येत आहे.


      जिल्हा निवड समितीचे गठन 
 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना / निकषानुसार जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्ह्यातून गुणाानुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय निवड होणाऱ्या प्रवर्गनिहाय पात्र शिक्षकांची शिफारस राज्य निवड समितीकडे करण्याकरता जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती गठित करण्यात यावी.
 जिल्हा निवड समितीचे रचना.....


           राज्य निवड समितीचे गठण 
          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी जिल्हा निवड समितीकडून जिल्ह्यातून प्रवर्गनिहाय गुणा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय शिफारस पात्र शिक्षकांना राज्य निवड समिती प्रत्यक्ष मुलाखतीस प्राचारण करणे. अस्तित्वात असलेल्या निकषानुसार ऑनलाइन पडताळणी व छाननी करून शिक्षकांची अंतिम निवड करताना शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक दर्जा तसेच सामाजिक समता ,स्त्री पुरुष समानता याबाबत संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, राष्ट्रीय दृष्टीकोनाबाबत विचार व कार्य उपक्रम राज्य निवड समितीने विचारात घ्यावेत. सदर शिफारसी व शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास पाठवावा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रक्रियेसाठी निवड करण्याकरता राज्यस्तरावर पुढील प्रमाणे राज्य निवड समिती गठित करण्यात यावी.


           क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराची निवड प्रक्रिया शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांची कडून राबवली जाईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रक्रियेसाठी निवड करण्याकरता ऑनलाइन प्रक्रिया राबवण्याची तांत्रिक जबाबदारी शिक्षण आयुक्त कार्यालयातील , संचलनालयातील  गव्हर्नर सेलची राहील.
         शिक्षकांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यास प्रस्ताव  करण्यात यावेत. राज्य निवड समितीची बैठक घेण्यापूर्वी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शिक्षकांनी सादर केलेली प्रमाणपत्रे संबंधित शिक्षणाधिकारी यांची कडून प्रामाणिक करून घ्यावीत व त्यानंतर ती राज्य निवड समिती पुढे ठेवावीत. सन 2022-23 चे वर्ष हे शैक्षणिक गुणवत्ता वर्ष वृद्धी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक नामांकन करणाऱ्या शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी लागणारा दृष्टिकोन अर्जातून मांडावा व समितीने त्याची माहिती शासनास अवगत करावी. प्रतिवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया वेळापत्रक सर्व  साधारणपणे खालील प्रमाणे राहील.

राज्य पुरस्कारासाठी निकष निहाय व स्तर निहाय गुण दान तक्ता व संपूर्ण शासन निर्णय खाली पाहू शकता.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.