राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना
शासनाने दि ६ फेब्रुवारी २०२४ रोजी शुद्धिपत्रक GR काढून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना खालील सुधारणांसह नियमित राबवण्यात येणार आहे .
इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला / मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच, या योजनेंतर्गत प्रस्ताव निकाली काढण्यासाठी संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आली आहे. संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयामध्ये परि.७, ८, ९ (४), ९ (५) व ९ (६) मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.७ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.
संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.८ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.
वरील समिती समोर इयत्ता १ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या मुला / मुलींकरीता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/ शिक्षण निरीक्षण, (योजना), बृहन्मुंबई यांची राहील.
संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९(१) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.
पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव ३ प्रतीत (विवरणपत्र - अ) संबंधित मुख्याध्यापकांमार्फत इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुला / मुलींकरीता शिक्षणाधिकारी, (योजना) /शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांच्या कडे दाखल करावा. सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी, (योजना) / शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीपुढे बैठकीच्या वेळी सादर करावी.
संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९(४) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.
समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी, (योजना) / शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हफ्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ७ दिवसात जमा करावे.संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९(५) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/ शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून घोषित करण्यात येत आहे.संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (६) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील. शिक्षण संचालक (योजना) यांनी ह्या योजनेची योग्य ती प्रसिद्धी करावी, वेळोवेळी सर्व संबंधितांचा आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा.
शासनाने दि २१ जून २०२२ रोजी GR काढून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना खालील सुधारणांसह नियमित राबवण्यात येणार आहे .
१. शासन निर्णय क्रमांक पी आर ई 2011 प्रकरण क्रमांक २४९ प्रा शि -१ अशी दिनांक 1 आक्टोंबर 2013 अन्वये राबवण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना खालील सुधारणा सह राबवण्यात यावी.
२. सदरची योजना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुला मुलींना लागू राहील.
3 सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात जखमी झाल्यास अनुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करायचे कागदपत्रे खालील तक्तामध्ये पाहू शकता.(तक्ता व अर्ज शेवटी पहा )
4 विद्यार्थ्याच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक /माध्यमिक/ शिक्षण निरीक्षण यांची राहील.
5 या योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश राहणार नाही.
१. आत्महत्येचा प्रयत्न करणे.
2.आत्महत्या किंवा जाणून पूर्वक स्वतःला जखमी करणे.
3.गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याची उल्लंघन करताना झालेला अपघात.
4.आम्ही पदार्थ त्यांच्या अंमलाखाली असताना झालेल्या अपघात
5. नैसर्गिक मृत्यू
6. मोटार शर्यतीतील अपघात
6 या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा करावीत.
1 विद्यार्थ्याचे आई
२. विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास वडील
3. विद्यार्थ्यांची आई वडील हायात नसल्यास अठरा वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक
7. या योजनेतील प्रस्ताव निकाली करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात येत आहे.
8. समितीने इयत्ता पहिली ते आठवी, नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला मुलीं करता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील. बृहन्मुंबई शहरा करता संबंधित शिक्षण निरीक्षण यांनी प्रस्तावाची छाननी करून समितीसमोर सादर करावेत.
9.योजनेची कार्यपद्धती व संबंधितांची कर्तव्य व जबाबदाऱ्या
1 पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तीन प्रतीत संबंधित मुख्याध्यापक मार्फत इयत्ता पहिली ते आठवी नववी ते बारावी पर्यंतच्या मुला मुलींनी करता अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे. मात्र बृहन्मुंबई शहरा करता सदर प्रस्ताव संबंधित विभागा विभागाचे शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण यांचेकडे संबंधित पालकांनी दाखल करावे. सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षखाती समिती पुढे निरीक्षक यांनी बैठकीच्या वेळी सादर करावी.
2 सदर समितीची बैठक आवश्यकतेप्रमाणे महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी.
3 या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. समितीने प्रस्ताव नाकारल्यास संबंधित पालकांना लेखी स्वरूपात कारणांसह कळवावे.
4 समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांचे रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, शिक्षण निरीक्षक यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापका मार्फत एका हप्त्यात धनादेशाद्वारे विद्यार्थ्यांच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सात दिवसात जमा करावे.
5 या योजनेच्या अंमलबजावणी करिता आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, शिक्षण निरीक्षक यांना आहरक व संवीकरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
6 या योजनेची प्रभावी अंमलबजावणी बजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या योजनेची योग्य शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या योजनेची योग्य ती प्रसिद्धी करावी. वेळोवेळी सर्व संबंधितांचा आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा.
10 या योजनेखाली येणारा खर्च लेखाशीर्ष २२००, सर्वसाधारण शिक्षण 80, सर्वसाधारण ८०० इतर खर्च पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना सहा ,दोन राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना 31 सहाय्यक अनुदान येईल. सागणी क्र ई २ या लेखा शीर्षाखाली त्या त्या वर्षाच्या उपलब्ध अनुदानातून भागवण्यात यावा.
11 सदर आदेश नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 198 /1471 दिनांक 31 -5 -22 तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 2 -6- 22 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
खालील GR मध्ये सविस्तर सूचना,तक्ता अर्ज पाहू शकता.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .