मिशन झिरो ड्रॉप आऊट MISSION ZERO DROPOUT

 


मिशन झिरो ड्रॉप आऊट (MISSION ZERO DROPOUT) 

            शासनाने शालाबाह्य अनियमित व  स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप राबवणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 23 जून 2022 रोजी पारित केला आहे. या शासन निर्णयानुसार सर्वेक्षणात दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करून त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू ठेवणे व बालकांची गळती शून्यावर आणणे हा या मिशनचा प्रमुख उद्देश आहे. बालकांना शालाबाह्य होण्यापासून रोखण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आउट दिनांक 5 जून 5 जुलै तेवीस जुलै 2022 या कालावधीत व्यापक स्वरूपात राबवण्यात यावी. राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल ,ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे मिशन राबवण्यास शासन मान्यता देत आहे.
        मिशन झिरो ड्रॉप आउट ची कार्यपद्धती 
             कोविड-19 संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबाचे स्थलांतर झालेली असून तीन ते 18 वयोगटातील अनेक बालके शालाबाह्य झाल्याची दिसून येत आहे. अशा बालकांना शाळा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सदरची मिशन सुरू करण्यात येत आहे.
 1. मिशन झिरो ड्रॉप आउट  मध्ये बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत, नपा, मनपा मधील जन्ममृत्यू अभिलेखांमधील नोंदणीचा वापर करणे.
2. कुटुंब सर्वेक्षण करणे.
3. तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहिती या मिशनमध्ये घेण्यात येईल.
  मूळ वस्तीतून अन्य वस्ती स्थलांतर होणारी बालके.
 अन्यवस्थेतून शाळा वस्ती स्थलांतरित होऊन येणारी बालके.
 4. शालाबाह्य अनियमित बालके यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कार्यवाही करावी.
 5. सदरची मिशन झिरो ड्रॉप आउट मोहीम वस्ती, वाडी, गाव ,वॉर्ड या स्तरावर पूर्ण करण्यात यावी. या अंतर्गत ग्राम स्तरावरील समितीने प्रत्येक घरी जाऊन गावातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होईल याची काळजी घ्यावी. एकही मूळ शाळाबाह्य आढळून आल्यास गाव स्तरावरील समिती पालक व गावकऱ्यांच्या सहभागाने विशेष मोहीम नोंदणी मोहीम राबवून त्या बालकास त्याच्या वयानुरूप वर्गांमध्ये दाखल करावे. सदर मोहीम ढोल ताशांच्या गजरात दिंडी स्वरूपात राबवणे.
 6. शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला व बालविकास बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण व नागरी यांच्याकडून गाव, केंद्र, बीट ,विभाग व शाळा स्तरानुसार नियोजन करण्यात तयार करून घेण्यात यावे, तसेच सर्वेक्षण करणारी अधिकारी कर्मचारी यांची यादी बनवण्यात यावी.
 7. शिक्षणाधिकारी प्राथमिक ,माध्यमिक जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेल्या कर्मचारी यादीनुसार विषय व जबाबदारी वाटप करून संबंधिता संबंधितांना आदेशित करण्यात यावे.
 8. मिशन झिरो ड्रॉप या सर्वेक्षणातून प्राप्त होणारी सांख्यिकी माहिती जलद गतीने एकत्रित करण्यास्तवही राज्यस्तरावर शिक्षण संचालक यांनी ऑनलाइन लिंक तयार करून ती माहिती संकलनाची जबाबदारी असणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वेक्षणापूर्वी पोहोचवावी. 9. विषय व जबाबदाऱ्या निश्चित केल्यानंतर आदेशित केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. सदर प्रशिक्षणामध्ये शोध मोहिमेचा मुख्य हेतू प्रपत्र करण्याबाबत व करावयाच्या कार्यवाही बाबत माहिती देण्यात यावी.
 10. क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी जबाबदार अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या तारखेप्रमाणे प्रत्यक्षात मोहिमेस सुरुवात करून दैनिक अहवाल सादर करावा.
 11. सर्वेक्षण मोहिमेचा अहवाल गट पातळीवरील अधिकारी यांनी आपल्या मॉडल जिल्हा निवडला अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
 12. मिशन झिरो ड्रॉप मोहिमेत 18 वर्षे वयोमया मर्यादेपर्यंतच्या दिव्यांग बालकांचा समावेश करण्यात यावा. 
 13. या सर्वेक्षणामध्ये महिला व बालविकास विभागाच्या 10 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार गटित सर्व स्तरावरील बाल संरक्षण समितीची ही जबाबदारी राहील.
      मिशन झिरो ड्रॉप आऊट कोठे करावे?
            या सर्वेक्षणात दिनांक 5 जुलै  ते 20 जुलै 2022 या कालावधीमध्ये शालाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक ,रेल्वे स्थानक ,सार्वजनिक ठिकाणी ,बाजारतळ, वीट भट्ट्या ,दगडखाने ,साखर कारखाने, बाल मजूर तसेच स्थलांतरित कुटुंबांमधून करण्यात याव्यात. तसेच मागास वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व खेडी, गाव ,वाडी, तांडे, पाडे व शेत मळ्यात जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शालाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात यावा. महिला बालविकास अंतर्गत बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था यांमधील बालकांचाही या मिशनमध्ये समावेश करण्यात यावा. एक ही शाळाबाह्य स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावी.



  कालावधी
 मिशन झिरो ड्रॉप आऊट  दिनांक ५ जुलै तेवीस जुलै 2022 या 15 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात यावे.
     मिशन झिरो ड्रॉप आऊट  कार्यवाही
       मिशन झिरो ड्रॉप अंमलबजावणी मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मॉडेल अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर या मिशन विषयी बैठकींची आयोजन करून मिशन विषयीची कार्यवाही स्पष्ट करावी. प्रत्यक्ष मिशन सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी बैठकांची आयोजन करावे.


         मिशन झिरो ड्रॉप आऊट अंबलबजावणी

              १. मिशन झिरो ड्रॉप प्रभावी होण्याकरता विविध स्तरावर समिता गटीत करण्यात आले आहेत. त्यानुसार मिशनची अंमलबजावणी करण्यात यावी. परिशिष्ट एक मध्ये समित्या दिलेला आहेत. 
२. शालाबाह्य अनिमित्त स्थलांतरित मुलांची गाव निहाय यादी संकरित करून शाळा निहाय जनरल रजिस्टर तसेच विद्यार्थी हजेरीपत्रक व गाव पणजीका पडताळणी करून अद्यावत करणे.
३. शालाबाह्य अनिमित्त स्थलांतरित बालकांना शाळेत दाखल करून घेणे, तसेच २०/७ /2022 अखेर दाखल करून घेऊन दाखल झालेल्या बालकांची माहिती शिक्षणाधिकारी यांना संचालक यांना देणे.
 ४. मिशन झिरो ड्रॉप आऊट मधील मुलांची नोंद घेण्याकरता अ, ब, क, ड प्रपत्र सोबत देण्यात येत आहे. त्यातील योग्य त्या प्रपत्रात शाळाबाह्य अनिमित्त स्थलांतरित बालकांची नोंद घेण्यात यावी. जे शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. अशा मालकांना विशेष प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात यावी व ही माहिती संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून वयानुरूप दाखल मुलांसाठी अध्ययन सुविधा पुरवण्यास मदत होईल.
         मिशन झिरो ड्रॉपआऊट  विषयी व्यापक जनप्रबोधन 
            राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत मिशनची माहिती सुलभ्रित्या पोहोचावी यासाठी खालील पद्धतीने मिशन बाबतचे व्यापक जनप्रबोधन प्रत्येक स्तरावरील समितीने करावे. त्याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये अंतर्गत समता विभागाच्या मदतीने शालाबाह्य मुलांसाठी काम करणारे बाल रक्षक यांनी आजपर्यंत या चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेली आहे. त्यांनाही या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे संस्थेतील सर्व अधिकारी यांनीही या मिशनमध्ये आपला सहभाग नोंदवावा.
१. स्थानिक दूरदर्शन आकाशवाणी वृत्तपत्रे तसेच इतर प्रसार माध्यमाद्वारे मिशन झिरो ड्रॉप आऊट मिशन बाबत व्यापक प्रमाणात उद्बोधन करून नागरिक पालक स्वयंसेवी संस्था युवक मंडळी यांना सहभागी करून घेण्यात यावे. 
२. स्थानिक कलाकार आणि नामांकित व्यक्तीमार्फत मिशन बाबत प्रत्यक्ष संवाद घडवून आणावा. हे काम गाव तालुका जिल्हा पातळीवरील समित्यांनी करावे. यासाठी विविध स्वयंसेवी संस्था दानशूर संस्था, दानशूर नागरिका आणि शालाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून या मिशनच्या प्रचार प्रसारासाठी प्रायोजक प्रायोजक तत्त्वाची आवाहन करण्यात यावे.
 ३. सदर मोहिमेचा प्रसार मोहिमेच्या प्रारंभपूर्वी दिनांक 5 जुलै 2022 पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याद्वारे विविध संस्था संघटना व स्वयंसेवी संस्था यांना याबाबतचा जनप्रसार व्यापक प्रमाणात करण्याबाबत आवाहन करण्यात यावे.
 ४. राज्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती यांचा गाव पातळीवरील शोध मोहीम आणि गृहभेटी यामध्ये संपूर्ण सहभाग घ्यावा.
 5. पंचायत समिती सभापतीसह पंचायत समिती सदस्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांमधून या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे.
 6. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ,शिक्षण सभापतीसह, सर्व पदाधिकारी ,जिल्हा परिषद सदस्य यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील मिशन झिरो ड्रॉप मध्ये सहभागासाठी विनंती करावी.
 7. मिशन झिरो ड्रॉप आउट करिता आवश्यक्य असलेली प्रपंचांची नमुने संचालक प्राथमिक यांनी सर्व जिल्हास्तरावरील प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावे.


मिशन झिरो ड्रॉपआऊट बाबत सविस्तर शासन निर्णय वाचा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.