जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन वाढीचे लाभ देण्याबाबत परिपत्रक दि १ जुलै २०२२

 


जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन वाढीचे लाभ देण्याबाबत परिपत्रक 

दि १ जुलै २०२२

       महाराष्ट्र शासनाचे उपसचिव का. ग. वळवी साहेब यांनी  दिनांक १ जुलै 2022 रोजी परिपत्रक  निर्गमित केले असून या परिपत्रकानुसार......

         जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार योजना ही जिल्हा परिषदेच्या स्तरावरून राबवली जात  होती. सदर योजना राबवण्यासाठी शिफारसी करताना काळजीपूर्वक शिफारशी न करता काही शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल असतानाही त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जात होती. त्यामुळे ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रक क्रमांक क्र संकीर्ण  1000 प्रकरण 3241 / 15 दिनांक 12/ 12/ 2000 रोजी या संदर्भात एकत्रित मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. या परिपत्रकात पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतन देण्याची तरतूद करण्यात आली, परंतु आगाऊ वेतन वाढ देण्यासाठी होणारा खर्च ग्रामविकास विभागामार्फत देण्याची तरतूद नसून जिल्हा परिषदांनी त्यांच्या पूर्वीप्रमाणेच स्वनिधीतून खर्च करावा अशी स्पष्ट तरतूद होती.

           सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीत शासनाने आगाऊ वेतन वाढ देण्याची योजना बंद केली. त्यामुळे ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रक संकीर्ण 2018 प्रकरण 181 आस्था 14 दिनांक 4/9/2018 व शासन शुद्धिपत्रक 2018 प्रकरण 181 आस्थापना 14 दिनांक 4 .2. 20 नुसार जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देण्याची योजना रद्द केली आहे. परिणामी अनेक शिक्षकांनी मान्य उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. माननीय उच्च न्यायालयाने अशा याचिकांवर 2018 पूर्वीच्या जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षकांना आगाऊ वेतन वाढीचा लाभ देण्याचा निर्णय अनेक या ठिकाण प्रकरणी दिला आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने नाशिक जिल्हा परिषदेची संबंधित रिट याचिका 8818/ 2018 प्रकरणी दिलेल्या आदेशाविरुद्ध जिल्हा परिषदेमार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19730/ 2021 दाखल केली होती. सदरची विशेष अनुमती याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १३/४ / 2022 रोजी फेटाळली आहे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे या द्वारे सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात येत आहे की जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीपासून आगाऊ वेतन वाढ देण्यासाठीचा खर्च जिल्हा परिषद स्वनिधीतून केला जात होता. त्यामुळे दिनांक 4 /9 /18 पर्यंतच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन वाढ देण्याची कार्यवाही जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील उपलब्ध निधीतून करावी.

खालील परिपत्रक अधिक माहिती करिता पहा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.