हर घर झंडा / हर घर तिरंगा / घरोघरी तिरंगा (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ) 2022

 

हर घर झंडा / हर घर तिरंगा/ घरोघरी तिरंगा  (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव) 2022



        भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती ठेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 (केंद्राच्या नवीन सूचनेनुसार व  ग्राम विकास विभागाच्या २4 जुलै च्या परिपत्रकानुसार दि १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट ) या कालावधीमध्ये देशभरात 'हर घर झंडा' हा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे.राज्य शासनाचे या संदर्भात GR दि २० जून २०२२ रोजी पारित केला आहे.  हर घर झंडा या उपक्रमाचे नाव केंद्र शासनाच्या सूचनेनुसार व दि ३० जून २०२२  च्या GR नुसार 'हर घर मे तिरंगा' ( घरोघरी तिरंगा) असे करण्यात आले आहे.   
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना एकत्रित रित्या खालील प्रमाणे देण्यात येत आहेत.
1. सर्व शासकीय निम शासकीय यंत्रणांनी प्रसारमाध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी.
2. दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक शासकीय ,निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे.
3. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन उभारणीसाठी त्यांना प्रेरित करावे.
4. सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.
 5. केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचने नुसार  भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कापलेल्या किंवा विणलेल्या लोकर सुती सिल्क खादी कापडापासून बनवलेला असेल या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज  हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत ,पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादी कापडापासून बनवलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. 6. संगीतातून ही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येत येईल. 
7. हर घर झंडा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी.
8. या उपक्रमामध्ये राज्य, देशातील, प्रदेशातील सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्यावी.
9. राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होणे बाबत खात्री संबंधित यंत्रणांनी करावी.
10. ऑनलाइन ऑफलाईन राष्ट्रध्वज विक्री केंद्र राज्याने उपलब्ध करून द्यावे.
11. भारतीय दिवस संहितेची पालन व्हावी व जाणते अजानते  पणे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करावी.
12. हर घर झंडा या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे छायाचित्रे ,चित्रफिती ध्वनी  मुद्रण इत्यादी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in  संकेतस्थळावर अपलोड करावे.
13. नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत रुची  निर्माण करण्यासाठी वेबसाईट, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात यावा.
14. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त  धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरिकांची निगडित यंत्रणांचा वापर करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा. याबाबतचा मार्गदर्शक कृती आराखडा सोबत परिशिष्ट मध्ये दर्शवण्यात आला आहे.
 कृती आराखडा : शाळा आणि महाविद्यालय 
  • शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत जाणीव जागृती करणे. सदर योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा.
  •  राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने, शिबिरे चर्चासत्रची आयोजन करावे.
  • #hargharjhanda या हॅश tag खाली समाज माध्यमांवर छायाचित्रे  प्रसारित करावीत. राज्य ,जिल्हा, शाळेचा उल्लेख करून सोशल मीडियावर फोटो शेअर करावेत.
  •  पालकांचा सहभाग सर्व पालकांना सहभागी होण्यासाठी विशेष दैनंदिन सूचना पत्रे पत्रके वितरीत करावीत.
  •  पालक शिक्षक सभा हर घर झंडा विषयी माहिती देण्यासाठी पालक शिक्षक सभांचे आयोजन करावे.
अधिक माहिती करिता खालील शासन निर्णय वाचा. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.