आनंददायी अभ्यासक्रम Happiess Curriculum

 


आनंददायी अभ्यासक्रम  (Happiess Curriculum)

                   विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागृत जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्य वृत्ती नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2022 23 पासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय  परिपाठात हॅपिनेस करिक्युलम अर्थात आनंदायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय दिनांक 29 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. सदर उपक्रमाबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.....
   उद्देश
 
1) विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
2) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्य विकसित करणे.
3) शालेय स्तरावर ताण-तणावाची व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवले. 
4) विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे. 
5) विद्यार्थ्यांमध्ये स्व ची जाणीव विकसित करणे. 
6) विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे. 
7) विद्यार्थ्यांना समस्या निराकरण करण्यास सक्षम बनवणे.
8) विद्यार्थ्यांमधील शिकण्याविषयीची भीतीने राष्ट्रीय इत्यादी दूर करणे.
      HTML
 आनंददायी अभ्यासक्रमाचे स्वरूप 

        विद्यार्थ्यांनी स्वतः मधील आनंदाला समजणे, तो अनुभवणे व तो आनंद मिळवता येणे, यासाठी या पाठ्यक्रमात पुढील चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

 1. सजगता
 2. कथा / गोष्ट
 3. कृती 
 4. अभिव्यक्ती 
 5. छंद 
उपरोक्त घटकांचे साप्ताहिक नियोजन खालील प्रमाणे असेल.

 1. सोमवार - सजगता 
 2. मंगळवार ,बुधवार- गोष्ट/ कथा
 3. गुरुवार ,शुक्रवार- कृती 
 4. शनिवार- अभिव्यक्ती,छंद 
        शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील 35 मिनिटांमध्ये आनंदाने करावयाच्या  शिक्षणाच्या विविध कृतींचे नमुने देण्यात आले आहेत. या घटकांमध्ये शिक्षकांना खालील प्रमाणे अथवा काही नव्याने विविध आनंददायी कृतींचा समावेश करता येईल.

   

  आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी रूपरेषा व मार्गदर्शक सूचना

 1. प्रत्येक दिवशी दिलेल्या साप्ताहिक नियोजनानुसार शालेय परिपाठ नंतरच्या पहिल्या तासिकेला आनंददायी कृतीस सर्वसाधारण 35 मिनिटांच्या असतील. शालेय स्तरावर दररोजच्या प्रति तासिकेमधून पाच मिनिटांचा कालावधी कमी करून सदर 35 मिनिटांचा कालावधी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील आनंददायी कृतीसाठी उपलब्ध करून घेता येईल. या आनंदाने कृतींची सुरुवात माईंड फुलनेस कृतीने म्हणजेच वर्तमानात सतर्क व सचित राहण्याच्या कृतींनी करावयाची आहे.
 2. आनंदायी कृतींची सुरुवात दोन ते तीन मिनिटे चेक इन म्हणजे श्वासावर लक्ष देण्याची कृती करून केली जावी. आनंदा ची  ही कृतींची समाप्ती दोन ते तीन मिनिटे चेक आउट म्हणजे विद्यार्थ्यांनी डोळे मिटून शांत बसून तासिकेच्या निष्कर्षावर चिंतन करणे या कृतीने केली जावी. चेकइन व चेक आउट या कृती दररोज करणे अपेक्षित आहे. 
3. शिक्षकांनी शालेय परिपाठामध्ये घ्यावयाच्या विविध आनंदायी कृतींचे कालावधी, उद्देश, कृतीची टप्पे, चर्चेसाठी प्रश्न, या क्रमाने व निकषानुसार लेखन करावी. 
4. शिक्षकांनी सदर लेखन करत असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट, समज, भाषिक समृद्धी, परिसर ज्ञान, याचा विचार करून सजगता कथा ,कृती व अभिव्यक्ती या घटकांचे विस्तारित स्वरूपात लेखन करावे. प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र आनंददायी प्रेरक उपक्रमांचा समावेश करावा.
मूल्यमापन 

       सदर अभ्यासक्रमाचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन केले जाणार नाही. त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच सदर अभ्यासक्रमासाठी कोणतेही गुणदान असणार नाही. विद्यार्थी किती आनंदी राहतो, किती आनंदाने उत्साहाने अभ्यास करतो, आनंदाने कृतीमध्ये कसा सहभागी होतो, यावरून अनोपचारिक रित्या त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा प्रवास हा सर्वार्थाने वेगळा असतो हे तत्व येथे विचारत विचारात घेतले जाणार आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .