घरोघरी तिरंगा (हर घर झंडा / हर घर तिरंगा ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022

 घरोघरी तिरंगा (हर घर झंडा / हर घर तिरंगा ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022


         महत्वाचे 
  • 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीमेअंतर्गत शाळांनी दररोज सकाळी ध्वजारोहण करून ध्वजसंहितेच्या नियमानुसार दररोज सायंकाळी पुन्हा ध्वज उतरवायचा आहे.
  • घरोघरी ध्वजारोहण करताना 13 ऑगस्ट ला सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर तो ध्वज 15 ऑगस्ट ला सायंकाळी उतरवायचा आहे.

         महाराष्ट्र शासनाच्या  ग्रामविकास विभागाने  दि २४ जुलै २०२२  रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार....  

          भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती ठेवत राहाव्यात. स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम ठेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022  या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने खालील  संदर्भीय पत्र क्रमांक दोन व तीन अन्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत. या संदर्भात दिनांक 17 जुलै 2022 रोजी मान्य केंद्रीय गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशातील सर्व राज्यांच्या मा. मुख्यमंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती. त्यामध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमाबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे आहेत.

 1.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय निमशासकीय खाजगीय आस्थापना सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रद्वारा ध्वजाची उभारणी स्वयं स्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.

 2. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवायची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधीत्व संहिता पाळावी लागेल.

3. राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून केवळ तिरंगा झेंडा उपलब्ध होणार असून त्यासोबत काठी मिळणार नाही. काठीची व्यवस्था स्थानिक स्तरावर करावयाची आहे. 4.घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना व नियमावली बाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी, स्थानिक स्तरावर माहिती ,शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेऊन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या, लोकल केबल, रेडिओ चॅनल, सोशल मीडिया, होर्डिंग, बॅनर इत्यादी मार्फत प्रचार प्रसिद्धी करावी.

        घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनाच्या https://mahaamrut.org/Downloads.aspx या वेबसाईटवर आयसी साहित्य उपलब्ध असून या लिंक वरून click करून माहिती शिक्षण व संवाद साहित्य डाऊनलोड करावे व त्याचा यथोचित उपयोग करावा.

        तसेच  राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेले झेंडे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर पुढे झेंडे गाव स्तरापर्यंत वितरणाची जबाबदारी, कार्यक्रम झाल्यानंतर विक्री झालेले झेंडे यांचा निधी एकत्रिकरण व विक्री न झालेल्या झेंड्यांची माहिती व झेंडे संकलनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांची कडे देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील झेंड्यांची मागणी स्थानिक स्तरावर उपलब्ध तयार झेंडे व केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या झेंडे यांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत झेंडा पोहोचेल याचे सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी.

         या संदर्भात काही शंका असल्यास आपण राज्य नोडल  अधिकारी आजादी का अमृत महोत्सव ग्रामविकास व पंचायत राज विभाग डॉ राजाराम दिघे (९८७०२१७२९५ ) व  त्यांचे सहकारी श्री प्रफुल्ल रंगारी व श्री अनंता मुद्गले यांचेशी यांच्याशी थेट संपर्क करू शकता. या उपक्रमासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई यांना  ई-मेल वर पाठवण्यात यावा.

  • ग्राम विकास विभागाचे दि २४ जुलै चे परिपत्रक सविस्तर माहिती साठी खाली  पहा . खालील परिपत्रका मध्ये सविस्तर सूचना व मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत .

  • घरोघरी तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्य योजना घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत आवश्यक्य झेंड्यांची संख्या
  •  शहरी भागातील घरांची व आवश्यक्य तिरंगा संस्था, संख्या, घरोघरी तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्य योजना
  •  भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून कळविण्यात आलेले काही तिरंगा पुरवठादारांचे संपर्क 
  • घरोघरी तिरंगा कार्यक्रम उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्य योजना जिल्हास्तरीय कार्यान्वयन समिती 
  • घरोघरी तिरंगा कार्यक्रम नियोजन तिरंगा तयार करण्याबाबत निर्देश,
  •  तिरंगा फडकवण्याबाबतचे नियम
  •  घरोघरी तिरंगा कार्यक्रमाबाबत माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी दिनांक 17 सात 2022 च्या व्हिडिओ कॉन्फरन्स मधील दिलेल्या सूचना 
  • तिरंगा घरोघरी तिरंगा कार्यक्रमाबाबत जिल्ह्याची जबाबदारी 
  • घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी आय सी उपक्रम 
  • तिरंगा उपक्रम प्रभावी योजना साठी देण्यात आलेला निधी
  •  घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत विशेष ग्रामसभा आयोजन करिता सुविधा 
  • माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे राज्यातील लोकप्रतिनिधींना द्यावयाची पत्र
  •  केंद्र सरकारकडे तिरंगा ध्वजाची मागणी
  •  तिरंगा मागणी पुरवठा माहितीसाठी ऑनलाइन प्रणाली 
  • विविध इमारती तिरंगा लाइटिंग रोषणाही करण्याचे नियोजित नियोजन
  •  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा 20 जुलै 2022 चा शासन निर्णय
वरील मुद्यांची माहिती सविस्तर खालील परिपत्रकामध्ये पहा.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.