बदली परिपत्रक दि १५ जुलै २०२२, अर्थ व स्पष्टीकरण



 बदली परिपत्रक दि १५ जुलै २०२२ 

अर्थ व स्पष्टीकरण 

दिनांक १५ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाचे उप सचिव श्री का. गो. वळवी साहेब यांनी बदली विषयक परिपत्रक काढले आहे.त्या परिपत्रकानुसार .....

             जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक  कार्यवाही करण्याबाबत बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग १  मधील ,विशेष  संवर्ग भाग दोन, मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी वेळोवेळी आपणास शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेली आहेत. तथापि काही जिल्हा परिषदांकडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये शिक्षकांची आडनाव नमूद नसल्याची बाब विन्सेस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

            जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत धोरणातील तरतुदीनुसार एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास व त्यांची सेवा जेष्ठता तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांची आडनाव नमूद असणे आवश्यक आहे. सबब सदर प्रणालीमध्ये आडनाव नमूद न केलेल्या सर्व शिक्षकांना त्यांची आडनावे आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रथम्याने नमूद करण्याबाबत कळविण्यात यावे. व त्याप्रमाणे प्राथम्याने दुरुस्ती करण्यात घ्यावी. सदर प्रणालीमध्ये आडनावे नमूद न करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी इंग्रजी अध्याक्षारा  प्रमाणे आडनावानुसार प्राधान्यक्रम मिळाला नाही तर त्या संबंधित शिक्षक जबाबदार राहील ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.