बदली परिपत्रक दि १४ जुलै २०२२, अर्थ व स्पष्ठीकरण

 


बदली परिपत्रक दि १४ जुलै २०२२ 

अर्थ व स्पष्ठीकरण

 

           महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार साहेब यांनी दिनांक 14 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना एक परिपत्रक काढून सुचित केले आहे की......          

  2.जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदला या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत दिनांक 7 /४/ 2021 च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित केले आहे. त्यास अनुसरून सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत तसेच आंतरजिल्हा मधल्या ऑनलाइन पद्धतीने करावयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

 3. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्या करता आपल्या अधिपत्याखालील शिक्षकांचे रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेण्याबाबत संदर्भातील पत्रांमुळे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरची बिंदू नामावली अद्यावत करून ती अपलोड केली नसल्यामुळे सन 2022 मध्ये करावयाच्या बदल्यांना विलंब होत आहे. सन 2022 मध्ये होणाऱ्या बदलांकरिता अद्यावत  बिंदू नामावली अपलोड करण्याची दिनांक 17 जुलै  2022 पर्यंत मुदत आहे. त्यामुळे या दिनांकापर्यंत बिंदू नामावली  शासनाच्या संकेतस्थळावर, शासनाच्या बदली पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक्य आहे. सन 2022-23 या वर्षातील शिक्षकांच्या बदल्या अद्यापही झाल्या नसल्यामुळे शिक्षकांची अगोदरच नाराजी आहे. तसेच शाळा सुरू झाला असल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांकरिता आणखी विलंब करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक 10- 6 -2022 च्या पत्रातील परिच्छेद क्रमांक दोन मधील मुद्दा क्रमांक तीन मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे दिनांक 17 जुलै  2022 पर्यंत जी जिल्हा परिषद कार्यालय बिंदू नामावली अपलोड करणार नाहीत त्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या शून्य समजून बदल्यांबाबतची कार्यवाही करण्यात येईल. अशा जिल्हा परिषदांमध्ये आंतरजिल्हा बदल्यांबाबतच्या दिनांक ७/४/2021 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 2.5 मधील तरतुदीनुसार शिक्षकांची बदली साखळी पद्धतीने होईल याची नोंद घ्यावी. अशी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यामुळे काही न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील.

            तसेच यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील 23- 6 -2022 च्या पत्रांवरील दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे अद्यावत स्वाक्षरीत बिंदू नामावली विन्सेस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना दिनांक 17- 7 -2000 पूर्वी उपलब्ध करून द्यावी.

4.काही जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती बदली पोर्टलवर अद्यावत झालेली नसल्याची बाब मी विन्सेस सॉफ्टवेअर कंपनीने शासनाच्या निदर्शनास आणलेली आहे तरी अशा शिक्षकांची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी बदली पोर्टलवर अद्यावत करण्याची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दिनांक 17 सात 2022 पूर्वी करावी.

5. काही शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबत मान्य न्यायालयाने आदेश दिली असल्यास अशाप्रकरणी मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासन निर्णय क्रमांक 6-७/४/२०२१ मधील परिषद 5.7 प्रमाणे प्रथम कार्यवाही करावी.

दि १४ जुलै २०२२ चे बदली विषयक महत्वाचे परिपत्रक खाली पाहू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.