आजचे बदली अपडेट्स 2022

 आजचे बदली अपडेट्स (दि  20 /9/2022)


https://ott.mahardd.in/       बदली पोर्टल 

बदलीच्या OTT पोर्टल वर थेट जाण्याकरिता वरील लिंक ला click करू शकता.

(टीप: या ठिकाणी बदली विषयक अभ्यासपूर्ण व  खात्रीशीर माहिती,लेटेस्ट अपडेट्स देण्याच्या प्रयत्न केला जात आहे .तरीही प्रशासनाच्या सूचना अंतिम राहतील.प्रशासनाच्या संपर्कात राहणे.)

आजचे दि  २० सप्टेंबर २०२२ चे बदली अपडेट्स  


मागील व पूर्वीचे  अपडेट्स 
  •  Ott बदली पोर्टलवर Personal लॉगिन केल्यानंतर जे शिक्षक बदलीप्राप्त आहेत,त्यांच्या नावापुढे-Eligible (बदलीपात्र) असे दिसेल.

  • जे शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांच्या नावापुढे-Entitled (बदली अधिकार प्राप्त) असे दिसुन येईल.


  •       Ott Portal वर Login करून खात्री करावी. (पोर्टल चे काम सुरु असल्याने अजून काहींना  दिसत नसेल तर लवकरच दिसेल.)

  •         बदली पोर्टल लॉगीन केल्यानंतर ज्या शिक्षकांच्या नावासमोर ENTITLED (बदली अधिकार प्राप्त) किंवा ELIGIBLE (बदलीस पात्र) असे शब्द दिसत असतील अश्या शिक्षकांनी पोर्टलला भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. तसेच इतर  सर्वच  शिक्षकांनी आपले प्रोफाईल चेक करावे. 
  •   जर प्रोफाईल मध्ये भरलेल्या माहिती मध्ये काही चूक/बदल असेल तर त्वरित वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा .
  • खालील स्क्रीन प्रमाणे ENTITLED (बदली अधिकार प्राप्त) किंवा ELIGIBLE (बदलीस पात्र) असे दिसेल.

पोर्टल सद्यस्थिती 6 सप्टेंबर  २०२२ 





  • ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्या शिक्षकांचे बदल्यांचे आदेश बदली पोर्टल वर स्वताच्या login ला  उपलब्ध झाले आहेत. 

  विषय 

लिंक   

 सर्व जिल्ह्यांची एकत्रित येणारे व जाणारे शिक्षकांची नवीन अपडेटेड यादी 


 download

 

 

 हजर रिपोर्ट 

download

 

 

 कार्य मुक्ती रिपोर्ट 

download

 

 

 इतर दाखले प्रस्ताव   

download

 

 

बदली विवीध कागद पत्रे  

download 

 

 

 

दाखला  

download  

 न्याय प्रविष्ठ 

 download

 

 

विनंती अर्ज 

 download

 

 

 खाते चौकशी 

 download

 

 

 येणे देणे 

download

 

 

 उपशिक्षक पद 

 download

 

 

 पदावनत 

 download

 

 

 

 

जिल्हा निहाय आंतर जिल्हा बदली शिक्षक याद्या

बदली यादी  

 download

 नांदेड 

 download

 

 

भंडारा 

 Download

 

 

 वर्धा 

 download

 

 

 नंदुरबार 

 download

 

 

 कोल्हापूर 

 download

 

 

 सोलापूर 

 download

 

 

 बुलढाणा 

 download

 

 

 सातारा 

 download

 

 

 हिंगोली 

 download

 

 

 परभणी 

 Download

 

 

 जालना 

 download

 

 

 नगर 

 download

 

 

 बीड 

 Download

 

 

रत्नागिरी 

 coming

 

 

 सिंधुदुर्ग 

 download

 

 

 गडचिरोली 

 download

 

 

 वाशीम 

 download

 

 

 धुळे 

 download

 

 

 जळगाव 

 download

 

 

 नाशिक 

 download

 

 

 पालघर 

 download

 

 

 अमरावती 

 download

 

 

 सांगली 

 download

 

 

 चंद्रपूर 

 download

 

 

 

 यवतमाळ 

 download

 

 

औरंगाबाद 

 download

 

 

 उस्मानाबाद 

 download

 

 

 पुणे 

 download

 

 

 रायगड 

 download

 

 

 नागपूर 

 download

 

 

 गोंदिया 

 download

 

 

 अकोला 

 download

 

 

 लातूर 

 download

 

 

 ठाणे 

 download

 

 

 

 

 

 

 

 

  
आंतर जिल्हा बदली 2022 अपडेट-ऑडिट लॉग बाबत 

दि.24/08/2022

  आंतरजिल्हा बदली झालेल्या  शिक्षकाला आपल्या बदलीचा ऑडिट लॉग पोर्टल वर जाऊन पाहता येईल.म्हणजेच त्याला बदली प्रक्रिया कशा प्रकारे पार पडलेली आहे,तेव्हा रिक्त पदांची स्थिती काय होती आणि त्याला त्या पर्यायी राऊंड मध्ये त्याचा पर्याय त्याला का नाही मिळाला याचे निरसन ऑडिट लॉग पाहून होईल.
   हा लॉग आज ११ वाजल्यापासून शिक्षकांना त्यांच्या लॉगिन मध्ये इंटर डिस्ट्रिक्ट टॅब मध्ये ट्रान्स्फर लॉग टॅब क्लिक केल्यावर पाहता येईल.
   तसेच मा.शिक्षणाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आपआपल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा बदलीचा ऑडिट लॉग आपल्या लॉगीनला दिसू शकेल.
  शिक्षकांना व अधिकाऱ्यांना बदली संदर्भात कुठलीही शंका अथवा प्रश्न असतील तर त्यांनी आपले लॉगीन करून बदलीचा ऑडिट लॉग पाहून त्याची पुष्टी करून घ्यावी.
आंतर जिल्हा बदली अर्जानुसार बदली झालेल्या  शिक्षकांना तसेच न झालेल्या शिक्षकांना  त्यांच्या मेल वर बदली झाल्या बाबत / न झाले बाबत खालील प्रमाणे मेल प्राप्त झाले आहेत ते चेक करणे.कोणत्या जिल्ह्यात बदली झाली आहे ते देखील मेल प्राप्त होतील. बदली पोर्टल वर login सुरु झाल असून आपण  अधिक माहिती यादी  पाहायला मिळेल . बदली आदेश हे लवकरच  पोर्टल वर तसेच CEO login वर उपलब्ध झाले आहेत .
  • बदली झाली असेल तर असा मेल येईल .



  • बदली  झालेली नसेल तर असा मेल येईल .




दि २२ ऑगस्ट २०२२
(आज उशिरा CEO login ला बदली जिल्हा निहाय याद्या उपलब्ध होतील  व त्यानंतर त्या सर्वांसाठी उपलब्ध केल्या जातील.)
  • प्रत्येक 50 जिल्हा परिषद शिक्षकांपैकी एकाची त्यांच्या आवडीनुसार नवीन जिल्ह्यात सेवा देण्यासाठी बदली करण्यात आली आहे. (अंदाजे 1,94,850 जिल्हा परिषद शिक्षकांपैकी 2.02% शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.)

  • आंतरजिल्हा बदलीसाठी अर्जदारांपैकी - 11,871 अर्जदारांपैकी 33.21% बदली झाली आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक बदली संख्या आहे - 2019 मध्ये 8.91%, 2018 मध्ये 18.36% आणि 2017 मध्ये 24.56% अर्जदारांचे बदली झालीय .

अखेर आंतरजिल्हा बदलीचा संभ्रम दूर ; ३९४३ बदल्यांवरच ग्रामविकास चे शिक्कामोर्तब ...!

      जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया काल दि.२१ ऑगस्ट रोजी विंसिस या खाजगी कंपनीकडून ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे पार पडली होती.या प्रक्रियेत ३१ तासात ३९४३ शिक्षकांच्या बदल्या ३४ जिल्हा परिषद मधून पूर्ण झाल्याची जिल्हा निहाय आकडेवारी सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.या आकडेवारी बाबत अनेक शिक्षकांनी शंका उपस्थित केल्याने संघटनेकडून बदली झालेल्या आकडेवारी बाबत सत्यता व खातरजमा पळताळून पाहण्यासाठी बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष मा.आयुष प्रसाद व राज्य समन्वयक मा.सचिन ओंबासे साहेब यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ३९४३ शिक्षकांच्या आकडेवरीला दुजोरा दिला.मात्र त्याचवेळी विन्सिस कंपनीचे अधिकारी निलेश देवदास यांनी आम्ही कंपनीकडून कुठलीही अधिकृत व कार्यालयीन प्रमाणित माहिती आंतरजिल्हा बदली विषयी जाहीर केलेली नसून जी माहिती सोशल मीडियावर पसरविल्या गेली ती कंपनीकडून देण्यात आलेली नसून प्रमाणित व अधिकृत नसल्याचे सांगण्यात आले.या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकेने आंतरजिल्हा बदली च्या सत्य आकडेवारी बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

अखेर आज नुकतीच ग्रामविकास विभाग स्तरावर मा.अतिरिक्त मुख्य सचिव यांचेसोबत माजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या माध्यमातून भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली.झालेल्या आंतरजिल्हा बदल्या ह्या मराठी व उर्दू दोन्ही माध्यमाच्या एकत्रित असून ३४ जिल्हा परिषदेची आउटगोइंग अंतिम आकडेवारी ही ३९४३ हिच असल्याचे सांगण्यात आले.मात्र ती कंपनीकडून ऑफिशियली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.झालेल्या बदल्या ह्या साखळी व रिक्त अश्या दोन्ही प्रक्रियेने झाल्याचेही सांगण्यात आले.याबाबत अधिक सविस्तरपणे असे की , प्रत्येक ५० शिक्षकांपैकी एकाची त्यांच्या आवडीनुसार नवीन जिल्ह्यात सेवा देण्यासाठी बदली करण्यात आलेली आहे.अंदाजे १,९४८५९ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी २.०२% शिक्षकांच्या बदल्या या प्रक्रियेत झाल्या आहेत.

आंतरजिल्हा बदलीसाठी एकूण ११ हजार ८७१ शिक्षकांनी ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे अर्ज केले होते . अर्जदारांपैकी ३३.२१% शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.ही आतापर्यंतची सर्वाधिक बदली संख्या असून २०१९ मध्ये झालेल्या तिसऱ्या टप्प्यात  ती ८.९१%  , २०१८ दुसऱ्या टप्प्यात १८.३६% आणि २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात ती २४.५६% इतकी होती.झालेल्या बदल्या ह्या अधिकाधिक शक्य तितक्या करण्यात आलेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अखेर ग्रामविकास विभागाकडून याबाबत स्पष्ट चित्र पुढे आल्याने आंतरजिल्हा बदल्या ह्या ३९४३ इतक्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्व शिक्षक बांधवांचा संभ्रम वेळीच दूर व्हावा या उद्देशाने मंत्रालय स्तरावरील चर्चेतून ही माहितीपर पोस्ट देण्यात येत आहे.

यापूर्वी झालेल्या बदल्यांची आकडेवारी थोडक्यात पुढीलप्रमाणे ,
२०१७ टप्पा १ - एकूण अर्ज २१,९७४ , पैकी बदल्या ५,३९९ , सन २०१८ टप्पा २- एकूण अर्ज १९,३४७ पैकी बदल्या ३,५५३ , सन २०१९ टप्पा ३ - १३,५५८ पैकी बदल्या १,२११ , सन २०२० टप्पा ४ - अर्ज १२,३४७ पैकी बदल्या १,८९० अश्या प्रकारे मागील चार टप्प्यात एकूण १२ हजार ५३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.तर आता यावर्षीच्या २०२२ मध्ये ३,९४३ मिळून आज रोजी पर्यंत १५ हजार ९९६ शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या आहेत.

उपरोक्त माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून ग्रामविकास विभाग स्तरावरून नुकतीच घेण्यात आलेली आहे.आज दि.२२ रोजी दुपारी आंतरजिल्हा बदलीचे आदेश ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीष महाजन साहेब यांचे हस्ते प्रकाशित केली जाणार असून नंतर ती लगेच शिक्षकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हांतर्गत बदली विषयी सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल.

बदली झालेल्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐💐


🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

आपला स्नेही 
महेश ठाकरे
राज्याध्यक्ष
प्रहार शिक्षक संघटना,महा.
📞7745823492

जिल्हा निहाय व Category निहाय बदली आकडेवारी खाली पाहू शकता.




दि २० ऑगस्ट २०२२ 
  • काल मध्यरात्री पासून अंतर जिल्हा बदली चे पोर्टल राउंड रन (सुरु )  झाले असून सोमवार दि २२ ऑगस्ट ला बदली आदेश  बदली पोर्टल वर प्राप्त होतील  .
खालील प्रमाणे राउंड सुरु झालेले आहेत.
NOC पैकी 8 : 1 हस्तांतरित (4 फेऱ्या)
2. संवर्ग-1 : 960 पैकी 575 बदली (10 फेऱ्या)
3. संवर्ग -2 : 4 तास लागतात (अजूनही प्रगतीपथावर आहे)
4. सामान्य: 9k रेकॉर्ड n ते n चेनसह सुमारे 20 तास लागतात..
 OTT सॉफ्टवेअरद्वारे शिक्षकांची बदली केली जात आहे - आत्ता. शिक्षकांच्या बदलीसाठी 48 संगणक असलेली ही यंत्रणा 14 फेऱ्यांमध्ये 31 तास चालणे अपेक्षित आहे.

सर्व जिल्ह्यांना आणि शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा..

 1.  NOC out of 8 : 1 Transferred  (4 Rounds) 
2.  Cadre-1 :  575  Transferred out of 960  (10 Rounds) 
3.  Cadre -2 :  Takes 4 Hours  (Still in progress )
4.  General :   Takes Around 20 Hrs With  9k Recorsd n to n Chains


 Teachers are being transferred by the OTT software - right now. The system consisting of 48 computers is expected to run for 31 hours in 14 rounds to transfer teachers. 

All the best to all districts and to teachers

  • पोर्टल सद्यस्थिती


 सुधारित वेळापत्रक 16-8-2022 

आंतरजिल्हा बदली-सुधारित वेळापत्रक 

  •  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून अर्जांची पडताळणी
      कालावधी-  12 ऑगस्ट  2022 ते  16 ऑगस्ट  2022.

  •  संगणकीय बदली प्रक्रिया
    कालावधी- 17 ऑगस्ट  2022 ते  20 ऑगस्ट  2022.

  • आंतरजिल्हा बदली आदेश निर्गमित करणे
      कालावधी- 21 ऑगस्ट  2022 ते  21 ऑगस्ट  2022.



 सुधारित वेळापत्रक

  •  जिल्हा परिषद शिक्षकांची बिंदुनामावली अपलोड करणे : ०२ ऑगस्ट ते ०३ ऑगस्ट, २०२२

  •  बिंदुनामावली प्रसिद्ध करणे: ०४ ऑगस्ट, २०२२

  •  बिंदुनामावली शिक्षकांना अवलोकन करीता प्रसिद्ध करणे: ०४ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट, २०२२

  •  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी आंतर जिल्हा बदलीकरीता अर्ज करणे: ०५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट,

  •  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अर्ज पडताळणी : १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट, २०२२

  •  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरू: १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट,

  • जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमितः १८ ऑगस्ट, २०२२

  •  पोर्टल सद्यस्थिती 


बदली अपडेट
 ➖➖➖➖➖
शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२

आंतरजिल्हा  बदलीबाबत

दिनांक ११/०८/२०२२

आंतर जिल्हाबदली फॉर्म मुदत व चुकीच्या माहितीबाबत
➖➖➖➖➖➖
 मित्रांनो बदली पोर्टल https://ott.mahardd.in/ वर दिनांक ५ ते ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत आंतरजिल्हा बदली फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होती. आज दिनांक ११/०८/२०२२ सायंकाळी ५ :०० वाजता बदली पोर्टलवर फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे .तशी सूचना लाल रंगात पोर्टलवर दिसते आहे.

 ११ ऑगस्ट २०२२ च्या परिपत्रकानूसार चुकीच्या माहितीच्या आधारे ऑनलाईन फॉर्म भरलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहेत. 

दिनांक १२ ते १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत पडताळणी कार्य पूर्ण करुन बदली फॉर्म सिस्टीम मधून रद्द करण्यात येणार आहेत तसेच कायमस्वरूपी एक वेतनवाढही रोखण्यात येणार आहे .

आपणांस आपल्या ईच्छित जिल्ह्यात स्व-जिल्ह्यात बदलीसाठी शुभेच्छा ! 

➖➖➖➖➖➖➖➖
अजून नवीन माहिती आल्यास तात्काळ कळवले जाईल.

🙏🏻 🙏🏻 🙏🏻

श्री .एस.के.पवार 

शैक्षणिक विचारधारा समूह

मो.9975710451/942034343
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  • आंतर जिल्हा बदलीचे अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे ११ ऑगस्ट, २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपणार आहे. सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज उद्या संध्याकाळी ५ च्या आधी पोर्टल वर भरून घ्यावे. (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा )




बदली अपडेट 
 ➖➖➖➖➖
शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२

आंतरजिल्हा  बदलीबाबत

दिनांक ०९/०८/२०२२

बदली पोर्टलची आजची स्थिती 

        मित्रांनो बदली पोर्टल https://ott.mahardd.in/ वर ९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत आंतरजिल्हा बदली फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार होती.आपण पात्र असूनही जर आजही फॉर्म भरला नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही . बदली पोर्टलवर फॉर्म भरण्याची मुदत दिनांक ११/०८/२०२२ रात्री १२ वाजेपर्यंत वाढली आहे .

          दुसरा महत्त्वाचा मुद्दा आंतर जिल्हा बदली चा जर आपण चुकीचा फॉर्म भरला असेल किंवा चुकीचा संवर्ग निवडला असेल किंवा इतर काही चुकलेले असेल व दुरुस्त करावयाचे असेल तर आपण भरलेला फॉर्म दुरुस्त करण्यासाठी Withdraw करू शकता . सदर फॉर्म बदली फॉर्म भरण्याची शेवटची मुदत दिनांक ११/०८/२०२२ पर्यंत कितीही वेळा फॉर्म पुन्हा भरू शकता.परंतु जर आपल्या काहीच चुका नसतील तर वारंवार फॉर्म भरून विनाकारण सर्व्हरवर लोड आणण्यात अर्थ नाही . तसेच पावसाळी वातावरणामूळे सर्व्हर शेवटच्या दिवशी चालले नाही तर आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे योग्य माहितीसह फॉर्म भरा .आपणांस आपल्या ईच्छित जिल्ह्यात स्व-जिल्ह्यात बदलीसाठी शुभेच्छा !

➖➖➖➖➖➖➖➖
अजून नवीन माहिती आल्यास तात्काळ कळवले जाईल.

🙏🏻 🙏🏻 🙏🏻

श्री .एस.के.पवार 

शैक्षणिक विचारधारा समूह

मो.9975 710 451/9420 343 343

आजची बदली पोर्टल ची स्थिती दि 9/8/2022 


आंतर जिल्हा   बदली फॉर्म भरण्याची  मुदत वाढली असून आपण आता दि ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत फॉर्म भरू शकता. अंतर जिल्हा बदली प्रकिया व आदेश प्राप्त दिनांक देखील थोडी बदललेली आहे .

(बदली पोर्टल च्या  खालील स्क्रीन शॉट मध्ये बदल झालेले वेळापत्रक पहा)


 Withdraw बाबत  महत्वाचे 

         आंतर जिल्हा बदली चा जर आपण चुकीचा फॉर्म भरला असेल किंवा चुकीचा संवर्ग निवडला असेल किंवा इतर काही चुकलेले असेल व दुरुस्त करावयाचे असेल तर आपण भरलेला फॉर्म withdraw करू शकतो. मुदत संपे पर्यंत कितीही वेळा Withdraw करून फॉर्म पुन्हा भरू शकतो .

 (सविस्तर खाली वाचा )




अंतर जिल्हा बदली अर्ज नमुना NOC  


  • NOC बाबत पोर्टल वरील महत्वाची  सूचना 
(खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा .)


  • आंतरजिल्हा बदली अर्ज नमुना संवर्ग १ 
   (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा .)


    • संवर्ग १ निकष खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा .)




  • संवर्ग २ अर्ज  (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा .)



  • संवर्ग २ निकष   (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा .) 


  • सर्वसाधारण अर्ज  (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा .)


आंतर जिल्हा बदली साठी अर्ज भरण्यासाठी बदली पोर्टल वर सुविधा सुरु झाली आहे .Inter District ता tab वर मध्ये  Application form   मध्ये जावून  फॉर्म भरू शकता. (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा )




  •  फॉर्म भरताना खालील सूचना लक्षात ठेवा.

 

  • बदली पोर्टल https://ott.mahardd.in/  वर आजपासून  बदली फार्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. दिनांक ०९/०८/२०२२ रात्री १२ वाजेपर्यंत (चार दिवस ) आपण फॉर्म भरू शकता.यात प्रामुख्याने एन.ओ.सी धारक , संवर्ग १,संवर्ग २ व सर्वसाधारण शिक्षक यांना फॉर्म भरता येतील.
  •  फॉर्म अगोदर पूर्णपणे समजून वाचून घ्या .यापूर्वीच्या पोर्टलवरील सर्वच सूचना आपण वाचल्या, समजून घेतल्या असे गृहित धरून पुढे जावे लागेल .

  •  बदलीधारक शिक्षक केवळ  एकाच संवर्गातून फॉर्म भरू शकतो याचा अर्थ आपण पति - पत्नी आणि एन.ओ.सी धारक असाल तरीही केवळ एकाच संवर्गाचा लाभ मिळेल .

  •  एन.ओ.सी धारक  किंवा संवर्ग १,संवर्ग २  यापैकी आपण कोणत्या श्रेणीत आहोत हे ज्याला त्याला ठरवायचे आहे .

  •  ग्रामविकास विभागाच्या दिनांक १० जून २०२२ च्या निर्देशित पत्रानुसार आपल्याकडे असलेल्या एन.ओ.सी चा क्रमांक यांत नोंदवणे अपरिहार्य आहे .

  •  ज्या जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक घोषित असतील त्या जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्या जिल्ह्यात एकही शिक्षक येऊ शकत नाही.

  •  ज्या जिल्ह्यात रोस्टर शून्य आहे, त्या जिल्ह्यात साखळी पध्दतीने बदल्या होतील .

  •  संवर्ग दोन साठी (प्राथमिक व्यतिरिक्त) दोन्हीही झेड .पी.चा स्वतःचा शालार्थ वा सेवार्थ आयडी व जोडीदाराचे नाव असणे आवश्यक आहे .शाळेचे नाव , यू -डायस क्रमांक बाबत योग्य ते पहा.

  •  प्रत्येक जिल्ह्याच्या रोस्टरची खात्री करूनच घ्या. फॉर्म सबमिट झाल्यावर कोणत्याही पध्दतीने रिटर्न घेता येणार नाही , त्यामूळे काळजीपूर्वक फॉर्म भरा.
     S. K. Pawar, Nagar

अधिक सविस्तर सूचना 



 बदली पोर्टल ची स्थिती दि ४/८/२०२२ (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा )

       बदली पोर्टल मध्ये जावून आपण आंतर जिल्हा बदली च्या tab मध्ये रोस्टर ला click करून आपण जिल्हा व माध्यम निवडून रोस्टर पाहू शकता.स्क्रीन मध्ये कोपर्यात असलेल्या download ला click करून  रोस्टर  download देखील करू शकता. (खालील स्क्रीन शॉट मध्ये पहा )






CURRENT STAGE: INTER DISTRICT TRANSFER

Current 2 Phase Actions Timetable

Upload Approve Roster    
 02/08/2022 to 03/08/2022        
Action In Process

Publish Roster                  
04/08/2022 to 04/08/2022     
  Action In Process

View Roster            
04/08/2022 to 13/08/2022       
 Action In Process

Inter District Application 
06/08/2022 - 09/08/2022
Action Not Started

Process Inter Transfer
10/08/2022 to 12/08/2022
Action Not Started

Generate Inter Transfer Order
13/08/2022 to 13/08/2022
Action Not Started

टीप : वरील वेळापत्रक बदली पोर्टल वर प्रदर्शित झाले आहे. आपण खालील स्क्रीन शॉट मध्ये पाहू शकता. 



  • आंतर जिल्हा बदली संदर्भात वेळापत्रक खाली पहा. आंतर जिल्हा बदली प्रकिया खालील वेळापत्रकानुसार सुरु होईल. प्रत्यक्ष फॉर्म भरणे दि ६ ऑगस्ट २०२२  ते दिनांक ९ ऑगस्ट २०२२ अखेर होईल . सविस्तर वेळापत्रक खाली पहा.


आजचे आंतर जिल्हा  बदली बाबत चे परिपत्रक व वेळापत्रक पहा.

 

       बदली पोर्टल वर login होत असून आपण आपली माहिती पाहू शकता .चेक करू शकता.  तसेच काही नवीन tab add (अंतर जिल्हाबदली, रोस्टर ) झाल्या असून खालील स्क्रीन शॉट मध्ये नवीन बदल व सध्याचे वेळापत्रक पाहू शकता. अंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची दाट शक्यता.

रोस्टर : Teacher can view the Roster medium wise and category wise uploaded by EO.

(Roster not published)

बदली पोर्टल व दि २२ जुलै २०२२ रोजी  दिलेली सूचना 

Inter District Transfer Process will be starting very soon. आंतर जिल्हा बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.

(बदली पोर्टल वर  खालील स्क्रीन शॉट मध्ये सूचना  पाहू शकता) 




आज दि २१ जुलै २०२२ रोजी बदली प्रक्रिया बाबत  झालेल्या VC मधील मार्गदर्शक  सूचना खालील प्रमाणे 



बदली पोर्टल वर सध्या खालील सूचना दिली आहे.

We are under the process of processing for Inter District Transfer and Configuration. System will be unavailable till 17th of July 2022. Once this process is complete the site will be available for Inter district process. For any query regarding your profile please contact to your respective BEO before 15 Jul 2022. आम्ही आंतरजिल्हा बदली आणि कॉन्फिगरेशन प्रक्रियेच्या प्रक्रियेत आहोत. 17 जुलै 2022 पर्यंत प्रणाली अनुपलब्ध असेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आंतरजिल्हा प्रक्रियेसाठी साइट उपलब्ध होईल. तुमच्या प्रोफाइल संबंधी तक्रारी साठी तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिनांक १५ जुलै २०२२ पूर्वी संपर्क साधावा.

खालील स्क्रीन शॉट वर देखील आपण वरील सूचना वर पाहू शकता.




बदल्या बाबत दि ७ जुलै २०२२ ची VC झाली .त्यामधील ठळक मुद्दे

  • प्रत्येक जिल्ह्याची रोस्टर ची अचूक माहिती मेल वरून मागवली.(विलंब टाळण्यासाठी यापूर्वीच सूचना दिल्या होत्या.)
  • ती माहिती कंपनीला देऊन फेज 2(आंतरजिल्हा बदली प्रक्रिया) सुरु करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले.
  • 31 जुलै पर्यन्त मुदत घेतली असल्याने अन्य तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही.
  • जिल्हानंतर्गत बदल्या वेळेत होण्यासाठी यंदा प्रत्येक संवर्गला कालावधी कमी करण्यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याबाबत सांगण्यात आले.
  •  बदल्यांना 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ शक्यता.
  •  BEO ना फोर्स ACCEPTANCE करावे लागेल.
  •  शिक्षक स्तरावरावरुन प्रोफाइल भरण्यासाठी पोर्टल बंद झाले आहे .प्रोफाईल अक्सेप्ट करण्यासाठी, अपिल करण्यासाठी चालु आहे .
  • ज्या शिक्षकांच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर फाइल गेली होती . त्या दुरुस्त्या होवुन येतील तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 
  • ज्या शिक्षकांची दुरुस्ती अभावी किंवा स्वत: होवुन येण केन प्रकारे आपली प्रोफाइल सबमिट करणे राहिले आसेल त्यानी काळजी करु नये .
  • ज्या शिक्षकांचे प्रोफाईल दुरुस्ती अभावी  पेंडींग आहेत त्यांच्या सर्व दुरुस्त्या होवुन गटस्तरावरुन दिनांक ०६-०७-२०२२ ते ०८-०७-२०२२ या कालावधी दरम्यान प्रोफाइल अपडेट करुन व्हेरीफाय केले जातील .
  •  माझा फॉर्म राहिला म्हणुन कोणीही विचलीत होवुन जाऊ नये .
  • जिल्ह्यातील एकही शिक्षक प्रोफाइल अपडेशन - व्हेरीफिकेशन पासुन वंचित ठेवला जाणार नाही .
  • ज्या शिक्षकानी गटशिक्षणाधिकारी स्तरावरुन केलेली दुरुस्ती मान्य नाही म्हणुन अपिल टु इओ केलेले आहे त्या सर्व शिक्षकाना दिलेल्या वेळेत सुनावणीसाठी आवश्यक त्या  पुराव्यासह शिक्षणाधिकारी (प्रा) यांचा दालनामध्ये उपस्थित राहुन आपले म्हणने लेखी व तोंडी  म्हणने मांडावे लागेल व त्याच ठीकाणी आपणास निर्णय दिल्या जाणार आहे व मा. शिक्षणाधिकारी यानी दिलेला निर्णय हा अंतिम आसणार आहे.
  • जिल्ह्यातील आथवा राज्यातील कोणत्याही शिक्षकाविरुध आपणास सार्वजनिक तक्रार करायची असेल तर करु शकता . डिरेक्टरी मध्ये जाउन जिल्हा तालुका व शिक्षकाचे नाव शोधुन कोणत्याही शिक्षकाची प्रोफाइल आपणास पाहता येते. जर  इतरांच्या प्रोफाइल मध्ये काही खोटी माहिती आपणास आढळली तर आपण त्या शिक्षकाच्या प्रोफाइल वर जाउन मा . मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदली पोर्टलमधुनच अपिल (तक्रार) करु शकता. परंतु आपल्याकडे ठोस पुरावे असावे लागतात . पुराव्या अभ्यावी तक्रार केल्यास तक्रारदार दोषी ठरणार आहे .
  •  ज्या शिक्षकांच्या प्रोफाइल गटस्तरावरुन व्हेरीफाय झाल्या आहेत त्या शिक्षकानी आपल्या प्रोफाइल तात्काळ अक्सेप्ट कराव्यात आणि काही गटस्तरावरुन दुरुस्ती केली असेल व आपणास ती मान्य नसेल तर अपिल टु इओ करावे . सर्व माहिती बरोबर आसल्यास तात्काळ अक्सेप्ट करावे .
  • वेळापत्रकाप्रमाणे सर्व काम सुरू आहे .
(माहितीस्तव,वरील माहितीत थोडाफार बदल होवू शकतो .)

 
बदली पोर्टल अपडेट्स

 मुद्दा क्रमांक 10 - Last Transfer Category - ज्यांची सध्याच्या शाळेत अॉनलाईन बदली झाली नसेल मात्र इतर कारणाने (उदा. प्रमोशन, कोर्ट मॅटर, अॉफलाईन आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली, समायोजन किंवा इतर कोणतेही कारण) सध्याची शाळा मिळालेली असेल त्यांनी NA निवडावे.(आजच्या VC मध्ये हे सांगितले आहे. हे मी माझ्या मागील सविस्तर पोस्टमध्ये सांगितलेले आहेच.)
 मुद्दा क्रमांक 11.Last Transfer Type(शेवटचा बदली प्रकार)
ज्यांची जिल्ह्यातल्या जिल्ह्य़ात सध्याच्या शाळेत इतर कारणाने (उदा. प्रमोशन, कोर्ट मॅटर, अॉफलाईन व जिल्हातंर्गत बदली, समायोजन किंवा इतर कोणतेही कारण) सध्याची शाळा मिळालेली असेल त्यांनी  Intra District निवडावे. व अॉफलाईन आंतरजिल्हा बदली झाली असेल त्यांनी Inter District हा पर्याय निवडावा. (आजच्या VC मध्ये हे सांगितले आहे.)
👍👍👍
शिवाजी नवाळे सर
समूह प्रशासक टीम
शिक्षकमित्र नगर समूह

🤝🤝🤝🤝🤝
TEACHER:Submit Profile To BEO 13/06/2022 to 20/06/2022 Action In Process
TEACHER:Appeal To EO   14/06/2022 to 24/06/2022 Action In Process
TEACHER:Final Profile Acceptance  14/06/2022 to 28/06/2022 Action In Process

TEACHER:Social Appeal On Other Teachers   24/06/2022 to 03/07/2022 Action Not Started








प्रोफाईल अपडेट केल्यावर  करताना व केल्यावर महत्वाचे  १६/६/२०२२ 

बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेट कशी कराल ? 14/6/2022
(खास सर्वसामान्य शिक्षकांसाठी)

✍ कृपया सविस्तर पोस्ट करत आहोत.शांतपणे काळजीपूर्वक वाचा आणि प्रोफाईल अपडेट करताना कोणतीही घाई न करता सर्व शंका दूर झाल्यावरच प्रोफाईल अपडेटला सुरुवात करा.शिक्षकांना profile update करण्याची सुविधा दिनांक 13/ 6/ 2022  पासून ते दिनांक 20/ 6/ 2022 पर्यंत आहे.
 
*शिवाजी नवाळे सर*
*समूह प्रशासक टीम*
*शिक्षकमित्र नगर समूह*
मो. नं. 9284726399 / 7758074275
🤝 🤝 🤝 🤝 🤝 

🧿 *प्रथमतः लॉगिन बाबत*

🟣https://ott.mahardd.in/  *या लिंकवरुन आपण मोबाईल किंवा Computer/Laptop यावर लॉगिन करू शकतो. लिंक ओपन केल्यावर ओपन होणाऱ्या पोर्टलवर वरच्या बाजूला इंग्रजी व मराठी अशा दोन भाषा दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला हवी ती भाषा निवडा. लक्षात घ्या की मराठी भाषा निवडली तर सर्व माहिती मराठीतून दिसेल. मात्र आपण मराठी जरी निवडली तरी या पोर्टलवरील सर्व काम इंग्रजीतून करायचे आहे.दुसरी गोष्ट लॉगिन करताना इंग्रजी भाषा असली तरीही लॉगिन झाल्यावर सुद्धा भाषा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.शक्यतो मराठी भाषा निवडा. माहिती पटकन समजण्यासाठी मदत होते.*

🟣 *प्रत्यक्ष लॉगिन🟣
*लिंक मोबाईल मध्ये ओपन केल्यावर किंवा Computer मधील गुगल क्रोम ब्राउझर मध्ये टाकल्यावर ओपन होणाऱ्या पेजवर सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक टाकावा. मोबाईल क्रमांक जर चुकीचा म्हणजे आपण अगोदर रजिस्टर केला आहे तो टाकला नाही तर खाली लाल रंगात No Such User Exists असा मेसेज येतो किंवा काहींच्या बाबतीत बाहेर फेकले जाते.म्हणून आपला योग्य नंबर त्या ठिकाणी टाकावा.*

➡️  *आपला मोबाईल टाकून झाल्यावर त्या खाली "Send OTP" किंवा मराठीतून "ओटीपी पाठवा" या शब्दावर टच केल्यावरच आपल्याला OTP पाठवला जातो. OTP म्हणजे एकप्रकारे आपला One Time Password च आहे हे लक्षात असू द्या. ओटीपीचा कालावधी सुमारे 10 मिनिटे असतो त्यामुळे ओटीपी येण्याची वाट बघा. काही मित्र ओटीपी लवकर आला नाही तर अनेकदा 'Resend OTP" किंवा "पुन्हा पाठवा" यावर बऱ्याच वेळा टच करतात त्यामुळे अनेक ओटीपी येतात आणि कोणता ओटीपी टाकावा याचा प्रॉब्लेम होऊन लॉगिन करताना प्रचंड मनस्ताप होतो. म्हणून ओटीपीची थोडा वेळ प्रतिक्षा करा. ओटीपी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे येतो. कधीकधी ओटीपी मोबाईलवर लवकर येत नाही. जर ओटीपी SMS लवकर आला नाही तर दुसरा पर्याय आपल्या मोबाईल मधील Gmail ओपन करा. त्याठिकाणी inbox मध्ये ओटीपी आला असणार. तो कॉपी करुन आपल्या लॉगिन पेजवर पेस्ट करा किंवा टाईप केला तरी चालतो.*

 ➡️ *याठिकाणी लक्षात घ्या की योग्य ओटीपी टाकल्यावर खाली कॅप्चा म्हणजे इंग्रजी अक्षरे व अंक दिलेले असतात ते बॉक्समध्ये योग्य रितीने लहान मोठी अक्षरे व्यवस्थित बघून टाईप करून घ्या. अक्षरे चुकले तरीही प्रॉब्लेम होतो म्हणून काळजीपूर्वक टाईप करावे. सर्व व्यवस्थित झाले तरच खालील लॉगिन बटन "निळ्या रंगाचे" होते. आता त्या निळ्या रंगाच्या बटनावर टच केले की आपले लॉगिन सक्सेसफुली झाल्याचे पाहायला मिळेल.*

➡️ *Successfully Login  केल्यावर ओपन होणाऱ्या पेजवर आपण इंग्रजी भाषा निवडलेली असेल तर CURRENT STAGE:TEACHER DATA UPDATE असे मोठ्या अक्षरात दिसेल. आणि जर मराठी भाषा निवडलेली असेल तर "सध्याची स्थिती :शिक्षकाची माहिती अद्ययावत होत आहे" असे दिसून येईल.*

➡️ *मोबाईलवरून ओपन केले असेल तर डावीकडे वरच्या कोपर्‍यात आडव्या तीन रेघा दिसतात. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतील त्याचे स्पष्टीकरण आपल्याला नंतरच्या पोस्टमध्ये देणार आहोत. त्यापैकी आपल्याला सध्या Profile (प्रोफाईल) वर टच करायचे आहे.Profile मध्ये दोन भाग आहेत.1.Personal details व 2.Employment details.प्रोफाईलवर टच केल्यावर आपल्याला सर्वप्रथम Personal Details (वैयक्तिक माहिती) हे पेज दिसते. यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही आणि गरजही नाही कारण ही माहिती बरोबर असल्याची खात्री आपण अगोदरच केलेली आहे.*

➡️ *आता खाली उजव्या कोपर्‍यात NEXT(पुढे जा) बटनावर टच करायचे आहे. त्यावर टच केल्यावर आपल्याला Employment Details (नोकरीची माहिती) हे आपल्या प्रोफाईलचे दुसरे पेज दिसत आहे. आपल्याला याच पेजवर काम करायचे आहे हे लक्षात असू द्या.आता खाली दिसत असणाऱ्या एक एक मुद्द्यांची माहिती कशी भरावी किंवा अपडेट करावी ते आपण बघूया.*👇👇

🧿 *मुद्दा क्रमांक 1. Date of Appointment in Zp - ही तारीख All ready तिथे आहे पण ती तारीख नेमकी कोणती याची माहिती पुढीलप्रमाणे - ही तारीख म्हणजेच आपला सलगसेवा दिनांक आहे हे लक्षात घ्या. यामध्ये शिक्षकांनी आपण जिल्हा परिषदेच्या सेवेत ज्या तारखेला हजर झालो आहे ती तारीख बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.(आंतरजिल्हा बदलीने सध्याच्या जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी आपली पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या सेवेत हजर झालेली तारीख आहे की नाही याची खात्री करावी.) ही तारीख बरोबर असेल तर त्यामुद्द्यावर काहीही काम करायची गरज नाही. पण जर ही तारीख योग्य नसेल(चुकलेली असेल) तर या मुद्द्याच्या समोर दिसणाऱ्या टिकमार्कवर ✅ टच करा. टच केल्यावर त्याखाली स्वतंत्र नवीन बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये टच केले की आपल्याला कॅलेंडर ओपन होईल त्यामध्ये वर महिना आणि वर्ष दिसेल त्यावर टच करा व त्यामधून योग्य ते वर्ष, महिना व तारीख निवडा.इथे आपले या मुद्द्याचे काम पूर्ण झाले.* 

🧿 *मुद्दा क्रमांक 2. Cast category(जात प्रवर्ग) - हा पण तिथे उपलब्ध आहे.जर बरोबर नसेल तर समोरच्या ✅ वर टच करा. खाली नवीन बॉक्स बदल करण्यासाठी येईल. त्यामध्ये सुधारित जात प्रवर्ग शेवटी दिसणाऱ्या बाणावर टच करून निवडा. (Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.)*

🧿 *मुद्दा क्रमांक 3. Appointment category(नियुक्ती प्रवर्ग) तिथे आहेच. तो जर योग्य नसेल तर समोरच्या ✅ वर टच करा. खाली नवीन बॉक्समध्ये शेवटी - ड्रॉप डाउन लिस्ट मधून योग्य तो प्रवर्ग सिलेक्ट करावा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 4. Current district joining date(सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्य़ात रूजू झाल्याची तारीख) - ही पण तारीख तिथे आहे. तिचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे - आपण सध्याच्या जिल्ह्य़ात ज्या तारखेला सेवेत हजर झालो आहे ती तारीख आहे की नाही याची खात्री करावी. (आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी सध्याच्या जिल्ह्यात हजर झाल्याची तारीख टाकावी.) जर तारखेचा बदल असेल तर मुद्दा क्रमांक एक प्रमाणे तारीख बदलण्याची कार्यवाही करावी.*

🧿 *मुद्दा क्रमांक 5.Udise  code of current School(सध्या कार्यरत असणाऱ्या शाळेचा युडायस नंबर) - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बदल असल्यास समोरच्या ✅ टच करून करावा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 6.Current School joining date(सध्याच्या शाळेतील हजर तारीख) - ही तारीख मात्र तिथे दिसणार नाही ती आपल्याला भरायची आहे. त्यासाठी या मुद्द्याच्या समोर दिसणाऱ्या टिकमार्कवर ✅ टच करा. टच केल्यावर त्याखाली स्वतंत्र नवीन बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये टच केले की आपल्याला कॅलेंडर ओपन होईल त्यामध्ये वर महिना आणि वर्ष दिसेल त्यावर टच करा व त्यामधून योग्य ते वर्ष, महिना व तारीख निवडा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 7.Current teacher type(सध्याचा शिक्षक प्रकार) - हाही तिथे उपलब्ध आहे. जर बदल असल्यास समोरच्या ✅ वर टच करा. HM/ Graduate /  Under graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 8.Teaching subtype(शिक्षक उपप्रकार) - जर उपाध्यापक असाल तर NA ठेवा. पदवीधर असाल तर  त्यांनी भाषा/ गणित -विज्ञान /समाजशास्त्र यापैकी एक आपल्यापदवीधर शिक्षक नियुक्ती पत्रात नमूद असलेला विषय सिलेक्ट करावा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 9. Teaching Medium(शिकवण्याचे माध्यम) - यामध्ये आपल्या शाळेचे योग्य ते माध्यम (Marathi/ Urdu) असल्याची खात्री करा. बदल असल्यास योग्य तो बदल करा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 10.Last Transfer Category(शेवटचा बदली प्रवर्ग) - हा तिथे उपलब्ध नाही तो आपल्याला भरायचा आहे.समोरच्या ✅ वर टच करून खालील बॉक्समध्ये टच केले की तुम्हाला*
*Cadre-1(संवर्ग 1)*
*Cadre - 2(संवर्ग 2)*
*Entitled - बदली अधिकारप्राप्त)*
*Eligible - बदलीपात्र संवर्ग 4*
 *NA*
*हे पर्याय दिसतील.*
*यामध्ये आपण काय निवडावे ते खालीलप्रमाणे बघा.*
*27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार आपली अॉनलाईन जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा अॉनलाईन बदली झालेली असेल त्यांनी Cadre 1,Cadre 2,Entitled, Eligible यापैकीच एक आपल्याला लागू होणारा मुद्दा निवडावा.*

*ज्यांची आजतागायत कधीच बदली झालेली नाही, तसेच ज्यांची 2017 चा जी आर येण्यापूर्वी अॉफलाईन बदली झालेली असेल, प्रमोशन किंवा इतर कोणत्याही कारणाने शाळा बदल झालेला असेल त्यांनी NA पर्याय निवडा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 11.Last Transfer Type(शेवटचा बदली प्रकार) - हाही आपल्याला भरायचा आहे. यामध्ये समोरच्या ✅ वर टच करा. खाली येणाऱ्या बॉक्समध्ये टच केल्यावर आपल्याला.*
*1.Inter District (आंतरजिल्हा बदली)*
*2.Intra District (जिल्हातंर्गत बदली)*
*3.NA-(लागू नाही)*                 
*यापैकी जो योग्य पर्याय आपणास लागू असेल तर तो पर्याय निवडावा*

🧿 *मुद्दा क्रमांक 12. Have You Work Continuously In Non Difficult Area(मागील 10 वर्षात तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रात सलग काम केले आहे?) जर तुमची एकूण सेवा 10 वर्षापेक्षा जास्त आणि सध्याच्या शाळेत 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली असेल अशाच शिक्षकांना हा मुद्दा भरण्यासाठी ओपन होईल हे लक्षात असू द्या.सध्याच्या शाळेत 5 वर्षापेक्षा कमी सेवा असणाऱ्यांना हा मुद्दा ओपन होणार नाही. यामध्ये Yes/No यापैकी तुम्हाला लागू होईल तो मुद्दा निवडा.*

🧿 *मुद्दा क्रमांक 13.Have you been suspended in last10 years?आपण मागील 10 वर्षात निलंबित झाले असल्यास Yes नमूद करावे, नसेल तर NO आहे तसेच ठेवावे.*

➡️ *सर्व माहिती भरून झाल्यावर खालील डाव्या कोपर्‍यात Save बटणावर टच करा. जर सर्व रकाने भरले गेले याची खात्री झाल्यावर खालील उजव्या कोपर्‍यातील Next (पुढे जा) बटनावर टच करा. आता आपल्याला Profile Preview (प्रोफाईल पूर्वावलोकन) दिसेल. त्यामध्ये आपण बदल केलेला सर्व डाटा दिसेल तो काळजीपूर्वक तपासा. सोबतच वरच्या बाजूला उजव्या कोपर्‍यात खालील दिशेला टोक असलेला बाण दिसेल त्यावर टच केले की आपल्याला आपण भरलेल्या माहितीची pdf डाऊनलोड होईल. तिची प्रिंट काढून पण खात्री करता येईल. डाटा योग्य भरल्याची खात्री केल्यावर आता खाली Submit बटन आहे त्यावर टच करा. आता तुमची माहिती Verify करण्यासाठी BEO Login ला गेली आहे. याठिकाणी प्रोफाईल अपडेटचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे.*

✍️ *BEO नी प्रोफाईल Verify केल्यावर ते पुन्हा शिक्षकांकडे Accept करण्यासाठी पाठवतील.शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यावर प्रोफाईल अपडेटचे काम पूर्ण होईल*. 

*शिवाजी नवाळे सर*
*समूह प्रशासक टीम*
*शिक्षकमित्र नगर समूह*
मो. नं. 9284726399 / 7758074275 

शिक्षक बदली प्रक्रिया 2022  

TEACHER PROFILE UPDATES

LAST TRANSFER CATEGORY या मेनुमध्ये फक्त NA हे OPTION समाविष्ट केल्यामुळे ज्यांची मागील शेवटची बदली ही CADRE 1,CADRE 2,ENTITLED अथवा ELIGIBLE यापैकी झाली नसेल म्हणचे पदोन्नती,दरजोन्नती,मा.न्यायालायमुळे,समायोजनमुळे अथवा अन्य कारणामुळे झाली असेल अश्या शिक्षकांनी LAST TRANSFER CATEGORY मध्ये NA हे OPTION निवडावे.ज्यांची कोणत्याही प्रकारे बदली झाली नसेल म्हणचे नवीन नियुक्ती असेल,नोकरीस लागले तेव्हापासून आहे त्याच ठिकाणी कार्यरत असतील तर त्यांनीहि NA हे OPTION निवडावे.

 ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वाचे आजचे अपडेट  

1) बदली पोर्टलवर कोणत्याही शिक्षकाने  आपली बदली माहिती फायनल सबमिट करायची गडबड करू नये. खात्री करूनच प्रोफाईल सबमिट करावी .

२) प्रत्येकाने पोर्टलवर लॉगिन करुन पान क्रमांक ०१ वरील माहिती बरोबर आहे का पाहुन घ्यावी व काही तफावत असेल तर तालुका  बदली कक्षाला त्वरित आपली योग्य माहिती द्यावी .

Last Transfer Category :

1) Cadre 1- संवर्ग 1 मधुन
2) Cadre 2- संवर्ग 2 मधुन
3) Entitled - संवर्ग -3 अवघड मधुन
4) Eligible- संवर्ग -4 बदलीपात्र ,रॅंडम विस्थापित मधुन

5) Other - समायोजन ,प्रमोशन ,कोर्ट मॅटरउळे बदली , येणकेण प्रकारे बदली *( हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला  येणार आहे)

5) NA- प्रथम नेमणुक दिनांकापासुन पासुन याच शाळेत आहेत .  लागू नाही

Last Transfer Type :

1) Inter District- आंतर जिल्हा बदली
(एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )

2) Intra District- जिल्हा अंतर्गत बदली
( जिल्ह्याच्या आत मध्येच बदली)
3) Other - वरील १ व २  प्रकार सोडुन 
समायोजन ,प्रमोशन ,कोर्ट मॅटरमुळे बदली , येणकेण प्रकारे बदली ( हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला  येणार आहे)

3) NA - प्रथम नेमणुक दिनांकापासुन याच शाळेत आहेत  लागू नाही.

सर्वांसाठी बदली बाबत महत्वाचे 

सर्व शिक्षकांनी बदली प्रक्रियेसाठी जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे...तो आपला Login ID म्हणून बदली पोर्टल वर login करून नमुद करून send OTP या बटणावर Clik करावे.

असे केल्यानंतर त्याच मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे आलेला OTP नमुद करावा...व CAPTCHA code टाकून लॉगीन करावे. याचवेळी आपल्या ई-मेल वर देखील सारखाच OTP प्राप्त होईल.

 टिप :- OTP चा SMS / Email येण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी लागू शकतो.
कृपया घाई-घाईने अनेकवेळा OTP जनरेट करू नये.
तसेच आलेला OTP आपणांस 10 मिनिटांच्या आत नमूद करावा लागेल.

महत्वाचे :- जर आपणास मोबाईल क्रमांकाने लॉगीन होत नसेल...किंवा OTP चा SMS अथवा Email प्राप्त होत नसेल...तर तात्काळ आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशि संपर्क करा.  

तथापि, आपले लॉगिन यशस्वी झाल्यास...

मुख्य पानावर दिसून येत असलेले वेळापत्रक तसेच सर्व सूचना, शासननिर्णय काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

त्यानंतर...प्रत्येकाने आपल्या मोबाईल screen वरील डाव्या बाजूकडील वरच्या कोपऱ्यात असलेल्या Options मध्ये जाऊन Profile या बटणास Click करून समोर दिसत असलेली Personal Details  संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.आणि खालच्या बाजूला असलेल्या NEXT या बटणावर Clik करावे.

वरील Personal Details च्या माहिती मध्ये काही तफावत असल्यास आजच आपल्या तालुका बदली नियंत्रण कक्षास संपर्क करून असलेला बदल कळवावा. 

यानंतर आपल्या व्यावसायिक माहितीचे (Employment Details) Page open होईल.

सदरील पानावरील दिसून येणारी संपूर्ण प्रशासकीय माहिती आणि संदर्भातील दिनांक इत्यादी माहिती अत्यंत कटाक्षाने पडताळून घ्यावी.

पैकी आपल्या सेवा कागदपत्रानुसार..ज्या मुद्द्याची माहिती चुकीची आहे... त्याची नोंद स्वतः कडे ठेवावी.

आज रोजी त्यामध्ये आपणांस कसलाही बदल करता येणार नाही. 
सदरील नमूद Employment Details च्या माहितीमध्ये...दिनांकांमध्ये काही चुक-तफावत असेल तर...आपले गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सूचनेनुसार तसेच दिलेल्या कालावधी मध्येच आवश्यक त्या कागदपत्रासह बदली नियंत्रण कक्षात संपर्क करावा अथवा आपले लॉगिनवर प्रत्यक्ष दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर बदलाची कार्यवाही करावी.

तूर्तास आपणांस केवळ आपले बदली पोर्टल लॉगिन यशस्वी होत आहे.. Personal Details मधील माहिती अचूक असल्याबाबतच खात्री करावयाची आहे.

बदली प्रक्रियेचा Phase 1 या टप्प्यामध्ये शिक्षकांनी त्यांची  प्रोफाईल भरण्यासाठी 13 जून ते 20 जून हा कालावधी दिलेला आहे त्यामुळे आपणास 13 जून नंतरच आपले Employment details मध्ये माहिती अद्यावत करून गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन ला फॉरवर्ड करता येईल.
करीता वरील सूचनेनुसार सर्वांनीच आज केवळ आपले लॉगिन करून फक्त बघावे.

About Employment Details


Your Employment Information is editable only once.

Note these details cannot be edited after this attempt. It is expected that the accuracy of data is 100% verified. The rules applied for your transfer will be based on the data that you provide in your employment details.

If the data that you provide is wrong, it would result in incorrect transfer due to the provisioning of incorrect or invalid data.

Although this data will be verified by the BEO the accuracy and its acceptance still lie With the teacher.

Before submitting your data review the details carefully.

  1. For the fields which you agree you should keep them as Correct

    (Green Color)

  2. For the Fields which you do not agree you should mark them Incorrect.

    (Red Color)


About Personal Details

Your Personal Details are not editable. Note these details have been matched with your Shalarth Data and these are pre-verified by your BEO. These cannot be changed by anyone during the whole process of the transfer.


बदली विषयक काही महत्वाच्या मुद्यांची माहिती 

  • जेव्हा शिक्षक पहिल्यांदा पोर्टल वर लॉग इन करतात तेव्हा काय होते ?


पहिल्यांदा पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, शिक्षक प्रथम समोर एक संदेश पाहू शकतो जो त्याला स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा शिक्षक प्रोफाइल टॅबवर क्लिक करतो, तेव्हा शिक्षकाला महत्त्वाच्या नोट्स दिसू शकतात ज्या शिक्षकाने स्वीकारल्या पाहिजेत.

  • शिक्षकाला त्याचा/तिचा प्रोफाइल डेटा कुठे मिळेल ?

शिक्षकाने बदली पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, डाव्या मेनूमधून प्रोफाईलवर क्लिक केल्यावर तो त्याचे प्रोफाईल पाहू शकतो आणि ते संपादित करू शकतो.

  • शिक्षकाची प्रोफाईल मधील माहिती बरोबर किंवा पूर्ण नसल्यास अपडेट कशी करावी ?

शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, शिक्षक डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक करू शकतात, ते अपडेट करू शकतात आणि मंजुरीसाठी तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात.
  • शिक्षकांच्या प्रोफाइलचे स्वरूप काय आहे ?

शिक्षकाचे प्रोफाइल 2 पृष्ठांमध्ये विभागलेले आहे (फॉर्म):

1. कर्मचार्‍यांचे तपशील - शिक्षकाची वैयक्तिक माहिती (ही माहिती बदलता येणार नाही)

2.नोकरी तपशील - शिक्षकांचे नोकरी-संबंधित तपशील (शिक्षक या फील्डमध्ये बदल करू शकतात)

  • शिक्षक शिक्षकाच्या प्रोफाइलमध्ये शिक्षण अधिकाऱ्याने ने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास काय करावे ?

गट शिक्षण अधिकाऱ्याने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास शिक्षक शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात.
  • शिक्षक त्याचे प्रोफाइल किती वेळा बदलू शकतात?

गट शिक्षण अधिकाऱ्याला प्रोफाइल पाठवण्यापूर्वी शिक्षक फक्त एकदाच फील्ड बदलू शकतात. त्यानंतर, शिक्षक फक्त अपीलसाठी शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात, परंतु त्यानंतर प्रोफाइल बदलू शकत नाहीत.

  • शिक्षण अधिकाऱ्याने प्रोफाइल बदलल्यानंतर शिक्षक त्यांचे प्रोफाइल बदलू शकतात का ?

नाही. प्रोफाईल केवळ शिक्षण अधिकाऱ्याच्या पुनरावलोकनानंतर केवळ 'वाचनीय' मोडमध्ये उपलब्ध आहे.

अडचण आल्यास ईमेल द्वारा संपर्क साधा -


Disclaimer- सदर ची माहिती शिक्षकांना अतिशय उपयुक्त म्हणून या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. शासनाचे अधिकृत मेसेज पत्र आल्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करावी . सदर माहिती संदर्भात कुणाची हरकत असेल तर संपर्क करा.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. पर्सनल डिटेल्स मध्ये आधार नंबर दिसत नाही. मार्गदर्शन मिळावे

    उत्तर द्याहटवा
  2. otp येत नाही काय करावे लागेल मो

    उत्तर द्याहटवा
  3. Personal details मध्ये नावाची स्पेलिंग चूकिची आहे
    का करावे लागते

    उत्तर द्याहटवा
  4. माझी एकाच सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत सलग 11 वर्षे सेवा झाली आहे मात्र पोर्टलवर माहिती भरताना नजरचुकीने सर्वसाधारण क्षेत्रातील कालावधी 10 वर्षे विचारल्यावर "नाही " असे नमुद केल्या गेले, दुरुस्ती कशी करता येईल

    उत्तर द्याहटवा
  5. आंतर जिल्हा बदली असेल तर
    Last Transfer Category
    मध्ये काय निवडावे?
    संवर्ग : 1/2/3/4 /Other/NA

    उत्तर द्याहटवा
  6. सध्याची शाळा दुर्गम व यापूर्वीची शाळा पण दुर्गम असेल तर Last Transfer Category काय निवडावे

    उत्तर द्याहटवा
  7. समुपदेशन बसली साठी कोणते ऑप्शन निवडा.cadre or other

    उत्तर द्याहटवा
  8. जर माहिती भरताना चुकीची भरली गेली आणि ती बदलायची असल्यास काय करावे?

    उत्तर द्याहटवा
  9. कोर्ट मॅटर ने समुपदेशनातून जिल्ह्यातच बदली झाली असेल तर (Inter district,Intra district,NA)यापैकी कोणता पर्याय निवडावा.

    उत्तर द्याहटवा
  10. कृपया Profile Accept झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल याची ही माहिती मिळावी.

    उत्तर द्याहटवा
  11. पटकन लक्षात येईल अशा सहज सुलभ भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .