शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.२

 


शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. २ 

         शाळा सुरु झाल्यानंतर विदर्भामध्ये दि २९ जून रोजी तर इतर सर्व जिल्ह्यामध्ये दि १५ जून रोजी एकाच दिवशी शाळापूर्व तयारी दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करावयाचे आहे.

शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे....

 

 1. जिल्ह्यातील जि. प. , म.न.पा. व न. पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी मनपा मनपा व आयसीडीएस विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणे बाबत चे नियोजन पर्यवेक्षीय अधिकारी व शाळांना कळवावे. 

2. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे चार तासांचा असावा.

 3. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी. 

4. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ला प्रवेशित सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक/ दोन दिवस मेळाव्याबाबत  वस्ती गावस्तरावर प्रभात फेरी ,दवंडी देऊन ,समाज माध्यमांचा उपयोग करून, तसेच पोस्टर्स लावून, जनजागृती करण्यात यावी व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे. 

5. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर दुसऱ्या मेळाव्याच्या रकान्यात करण्यात याव्यात. सदर सात स्टॉल्स पुढील प्रमाणे 1. नोंदणी (रजिस्ट्रेशन) 2. शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू  विकास) 3. बौद्धिक विकास 4. सामाजिक आणि भावनात्मक विकास 5. भाषा विकास 6. गणन पूर्वतयारी 7. पालकांना मार्गदर्शन.

6. शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक दोन चे  आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्राचार्य डायट व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी मनपा, नपा यांच्या बैठकांचे आयोजन करावे.

 7. गटशिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख तसेच गट अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक दोन चे नियोजन करावे.

 8. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांची मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळा स्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

 9. मेळावा संदर्भातील फोटो, व्हिडिओ इत्यादी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करत असताना  #shalapurvtayariabhiyan2022 या # tag  चा उपयोग करावा, तसेच मेळाव्यास संदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी http://www.facebook.com/Mahascert च्या फेसबुक पेजला tag करण्यात यावे.

 10. शाळा स्तरावरील दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्या स्तरावर गुगल लिंक द्वारे संकलित करण्यात यावी.

 11. शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 ची माहिती संकलित करून मेळावा झाल्यानंतर पुढील आठ दिवसात देऊ जिल्ह्यातील जि प, मनपा, नपा च्या सर्व शाळांची एकत्रित माहिती बाल विकास विभागाचे एक्सेल शीट मध्ये सादर करावे माहिती संकल्पना करिता राज्य स्तरावरून कोणतीही अन्य लिंक देण्यात येणार नाही. 

12. शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक दोन चे आयोजन सुव्यवस्थितरित्या व्हावे याकरिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य नियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात. 

13. शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी निमंत्रित करावे. 

14. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळा पूर्वतयारीची जोडणी शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमशी /विद्या प्रवेश मोड्यूलशी करावी.

15 मेळावे आयोजित करत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे.

दि २ जून २०२२ चे परिपत्रक पहा व download

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .