विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांची स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर मध्ये इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.
1. शाळेच्या परिसरातील (वयोगट 6 ते 14 वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची शाळेत प्रवेश झाली असल्याची खात्री करण्यात यावी.
2. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळा पूर्वतयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा. निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावी.
3. नजीकच्या परिसरातील दगडखाणी, वीट भट्टी, बांधकामाची स्थळ, उद्याने, बाजारपेठा पद पद ,सिग्नल, कुटिरोद्योग कामगार वस्त्या यासारख्या ठिकाणांची सर्वेक्षण करण्यात यावे .
4. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तीला किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन प्रबोधन करावे.
5. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक इत्यादी ची व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे .
6. मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळी पर्यंत आणण्या बाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांच्याशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना, सेतू अभ्यासक्रम इत्यादी विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.
7. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी .
8. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक व स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांची सहकार्य घेण्यात यावे.
9. तसेच दि 7 जून २०१३ व ९ जून २०१५ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
अधिक माहितीसाठी शाळा प्रवेशोत्सावाच्या संदर्भात शिक्षण आयुक्तांचे आलेले पत्र वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .