वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण, कालावधी, प्रमाणपत्र व इतर महत्त्वपूर्ण सूचना बाबत

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 


अत्यंत महत्वाचे- ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत...!!!
        
          सद्यस्थितीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 
           सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी.

आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.  
              उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी  उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. 
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
दुरुस्ती प्रक्रिया
 
     
अ. क्र.विषय तपशील
 
कार्यवाहीचा दिनांक
१.प्रशिक्षणार्थी माहिती दुरुस्ती प्रक्रिया२१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२
२.प्राप्त माहितीनुसार आवश्यक पडताळणी प्रक्रिया०१.११.२०२२ ते ०३.११.२०२२
३.अंतिम माहिती इन्फोसिस प्रशिक्षण प्रणालीस सादर करणे व प्रणालीवर अद्ययावत करणे.०४.११.२०२२ ते १०.११.२०२२
४.प्रशिक्षणार्थी यांचे दुरुस्तीनुसारचे प्रशिक्षण सुरु१२.११.२०२२ पासून
अधिक माहिती करिता खालील परिपत्रक पहा.


ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
  • प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.



 वरील लिंकवर क्लिक करा आणि आपली माहिती भरा . खालील माहिती लक्षात ठेवा.प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळेल.

  1. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
  2. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
    • नोंदणी क्रमांक
    • इंग्रजी मधील आपले नाव
    • मोबाईल क्रमांक
    • ईमेल
    • प्रशिक्षण गट
    • आपले मराठीतील नाव
    • शाळेचे नाव
    • जिल्हा
    • तालुका
  3. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
  4. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कालावधी व महत्त्वपूर्ण सूचना बाबत

 मा. शिक्षण संचालक महाराष्ट्र  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे  यांनी दि १५ जून रोजी परिपत्रक काढून खालील सूचना दिल्या आहेत .
                  वरिष्ठ व निवड श्रेणीत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले आहे . सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य प्राध्यापक नोंदणी यांनी नोंदणी केली असून सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक 3 दिनांक 1-6-2022 च्या पत्रान्वये सदरची प्रशिक्षणाचे दिनांक 1 जून२०२२ पासून सुरू करण्यात आलेले आहे, तथापि दिनांक 1 जून 2022 च्या पत्रान्वये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थी यांना तीस दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता तथापि सद्यस्थितीमध्ये सदरच्या प्रशिक्षणसाठीचा कालावधी हा 45 दिवसांचा करण्यात येत आहे. यानुसार प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कोर्सला प्रथम लॉगिन झाल्यापासून 45 दिवसांमध्ये सदरचा कोर्स प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.
 अध्याप  प्रशिक्षण सुरू नाही अशा प्रशिक्षणार्थी बाबतीत  प्रशिक्षण प्रकार व इतर तपशील दुरुस्तीबाबत 

  • खालील दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपला ईमेल आयडी चुकीचा नोंदवला आहे, स्वतःच्या चुकीने प्रशिक्षण प्रकार अथवा प्रशिक्षण गट बदल झालेला आहे व त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झालेले नाही अशाच केवळ प्रशिक्षणार्थ्यां नी  दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी सुरळीत प्रशिक्षण सुरू आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या तपशिलात कोणतीही दुरुस्ती दुरुस्ती करू नये.
  •  प्रशिक्षणार्थींच्या ईमेल प्रशिक्षण गट प्रशिक्षण प्रकार या दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण पोर्टलवर दुरुस्ती नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया या tab  वर  क्लिक करून आवश्यक ती दुरुस्ती करता येईल. click here 
  •  उपरोक्त दुरुस्ती करण्याची सुविधा ही रविवार दिनांक 19 जून २०२२  रोजी रात्री ठीक 8 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थींच्या तपशिला बाबतीत कोणतीही दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.
  •  प्रशिक्षणाच्या सर्व महत्त्वाचे अपडेट्स सूचना तक्रार निवारण सुविधा ही केवळ प्रशिक्षण या प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
 स्वाध्यायाबाबत महत्त्वाच्या सूचना 
  • प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याला आपल्या प्रशिक्षणामध्ये दिलेला स्वाध्याय सांगितलेल्या स्वरूपामध्ये (पीडीएफ/व्हिडिओ /पीपीटी) तयार करून सदर स्वाध्यायाचा  फोल्डर आपल्या स्वतःच्या गुगल ड्राईव्ह/ one ड्राईव्ह ला अपलोड करून या फोल्डर ची लिंक get लिंक  या पर्यायावर क्लिक करून Restrict मध्ये एनी वन with लिंक या पर्यायाची निवड करून सदरची लिंक अभिप्राय यामध्ये देण्यात आलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये पेस्ट करावी.
  •  प्रशिक्षणार्थी घटकनिहाय देण्यात आलेला स्वाध्याय आपल्या भाषेतून लिहू शकतात तसेच स्वाध्याय बाबतच्या आवश्यक ती सर्व सूचना प्रशिक्षण प्रणालीवर देखील देण्यात आलेल्या आहेत.
 वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत टेलिग्राम चॅनेल
 
           वरिष्ठ वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने इन्फोसिस सप्रिंगबोर्ड या प्रणालीवर सुरू करण्यात आलेले आहे. याबाबतच्या सूचना वेळोवेळी ई-मेल ,पत्र या वेबसाईटद्वारे आपणास दिल्या जातात तथापि अधिक माध्यमांद्वारे सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचता यावे सूचना जाव्यात यासाठी सदर प्रशिक्षणाचे अधिकृत टेलिग्राम चैनल तयार करण्यात येत आहे प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीसाठी खालील टेलिग्राम चैनल ला जॉईन होऊ शकतात.

         दैनिक शंकासमाधान सत्र मीटिंग तपशील 
                 या कार्यालयामार्फत दिनांक 1 जून २०२२ पासून सकाळी ११ ते १२  या वेळी मध्ये प्रशिक्षणार्थी यांचे साठी ऑनलाईन सभेच्या माध्यमातून दैनिक शंकासमाधान व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जात आहे. सदरच्या ऑनलाइन सभेमध्ये कमाल 1000 व्यक्ती सहभागी होण्याची क्षमता आहे. तरी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत काही समस्या अथवा अडचणी असतील तर त्यांनी खालील तपशिलाचा वापर करून सदरच्या सत्रास  जॉईन होण्यास होऊ शकतात. झूम लिंक 

Meeting ID  87296660474
Passcode    SCERT

मा.संचालक SCERT यांचे दि १५ जून २०२२ चे परिपत्रक
 

सौजन्य-SCERT Pune
Tags

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. नमस्कार सर,माझे प्रशिक्षण प्रकार येत नाही, कृपया मार्गदर्शन करा.

    उत्तर द्याहटवा
  2. मी वारंवार ज्वाइन होण्याचा प्रयत्न केला पण ते इनव्हँलिड पासवर्ड आँर युझर आडी असे दाखवत आहे तरी काय करू शकतो यावर मार्गदर्शन व्हावे. गजानन ज्ञानदेराव कासमपूरे शाळा पेढी पं.स. भातकुली जिल्हा अमरावती

    उत्तर द्याहटवा
  3. Site is a down for critical upgrade असा msg मला 2जून पासून येत आहे..प्रशिक्षण सुरू झाले नाही...सौ सुनिता प्रभाकर चौधरी, जि प शाळा बिलाडी,ता.जि.धुळे..रजिस्टर no 2001952

    उत्तर द्याहटवा
  4. ज्याना दि १/७/२२ला वरीष्ठ श्रेणी करिता प्रशिक्षण करावयाचे प्रवेश प्रक्रिया फाॕर्म अर्ज onlin भरणे केव्हा सुरु होणार आहे.मी प्रशांत चाणेकर श्री समंतभद्र प्राथमिक मराठी शाळा कारंजा येथे १/७/१९९पासुन कार्यरत आहे.मला १/७/२०१०तेदि १/७/२२ ला मुख्याध्यापक पदावर १२वर्षे पूर्ण झालीत मला त्यापदावरील वरीष्ठवेतन श्रेणी लागू करण्यासाठी सदर वरील प्रशिक्षण पूर्ण फाॕर्म भरायचा आहे.माहिती कळवावी.

    उत्तर द्याहटवा
  5. मला 01 जून 2022 रोजी सहशिक्षक पदावर 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. निवड श्रेणी साठी प्रशिक्षण फॉर्म कधी आणि कसा भरता येईल. कृपया मार्गदर्शन करावे .

    उत्तर द्याहटवा
  6. सर माझे दुरस्ती करावयाचे राहिले आहे आता करता येईल काय ?

    उत्तर द्याहटवा
  7. मी प्रशिक्षण पूर्ण केले असून एक्साम दिली आहे स्वाध्याय लिंक ही apload केलीय .पण अजून प्रमाणपत्र आहे नाहीये

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .