- सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करताना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचन साहित्य (तीस मिनिटे) चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे दोन ते तीन तास) चाचणी सोडवणे, स्वाध्याय पूर्ण करणे (दोन तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरवण्यात आलेला आहे.
- स्वाध्याय अपलोड करत असताना सदर स्वाध्याय वर प्रशिक्षणार्थ्यांनी आपले नाव, रजिस्ट्रेशन नंबर, शाळेचे नाव, यु डायस क्रमांक व स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्यक राहील. प्रशिक्षणार्थी यांचे स्वाध्याय लिहून पूर्ण झाली असतील त्या वेळेसच स्टार्ट वर क्लिक करून प्रशिक्षण प्रणालीवर ऑनलाईन स्वाध्याय नोंदवावा. विहित वेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थी यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
- प्रशिक्षण मध्ये घटकांवर आधारित चाचणी सोडवण्यासाठी देखील विहित वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे विहित वेळ मध्येच सदरची चाचणी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- तसेच चाचणीही घटकनिहाय असल्याने एका घटकाची चाचणी सोडवल्यानंतर प्रणालीवर Proceed To Next Section वर क्लिक करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व घटकांवरील चाचणी सोडवून झाल्याशिवाय Finish Test वर क्लिक करू नये. अन्यथा प्रशिक्षणार्थ्यांची चाचणी बंद होऊन प्रशिक्षणार्थी यास सदरच्या प्रशिक्षणाची चाचणी पुन्हा देणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी.
- स्वाध्याय व चाचणी सोडवत असताना घ्यावयाची आवश्य काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विशद करण्यात आलेली आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावयाची आहे.
- सर्व मोड्यूल निहाय (घटकनिहाय) चाचण्या मिळून एकूण 40 टक्के गुण प्रशिक्षणार्थ्यांना प्राप्त करणे अनिवार्य राहील, तरच संबंधित प्रशिक्षणार्थी यास प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.
- प्रशिक्षणार्थी यांनी प्रणालीवर व्यतीत केलेला वेळ व प्रशिक्षण कार्यक्रमाची वेळ, एकूण कालावधी पाहिलेले व वाचलेले अध्ययन साहित्य पूर्ण केलेले स्वाध्याय, चाचणी मधील प्राप्त गुण इत्यादी या सर्वांचे मूल्यमापन केले जाणार आहे व त्यानंतरच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावयाची आहे. प्रशिक्षणार्थ्यांचे स्वाध्याय हे प्रकाशित केले जाऊ शकतात याचीही नोंद घ्यावी.
- प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थी यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीमध्ये उपरोक्त बाबी पूर्ण केल्यावरच डाऊनलोड करता येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थी याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी/ इंग्रजी) असेल तसेच व तेच नाव प्रशिक्षणार्थींच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठीमध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये प्रोफाइल मधील नाव हे फर्स्ट नेम या ठिकाणी आपली अचूक पूर्ण नाव मराठीमध्येच नोंदवावे. तसेच लास्ट नेम मध्ये उपलब्ध असणारा क्रमांक हा प्रशिक्षणार्थी यास नोंदणी नोंदणी क्रमांक असणार आहे. सदरच्या नोंदणी क्रमांक मध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी कोणताही बदल करू नये याची नोंद घ्यावी.
- सदर च्या प्रशिक्षणास सुरुवात करणे घटक सोडवणे चाचणी व स्वाध्याय सोडवणे प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी अधिकृत मार्गदर्शन पर व्हिडीओ आपण पाहू शकता.
- तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल, डेस्कटॉप) तसेच आपणास प्राप्त ईमेल मध्ये देखील सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी च्या मार्गदर्शन पर व्हिडिओचा लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
- कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांनी अथवा शिक्षकांनी सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी व स्वाध्यायाची संबंधित व्हिडिओ ,पीडीएफ आपल्या ब्लॉग किंवा यूट्यूब चैनल ला चॅनेलवर अथवा इतर समाज माध्यमावर व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, वेबसाईट इत्यादी वर प्रकाशित प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील याची माहिती सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी
- सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना व महत्त्वपूर्ण बाबी या सर्व केवळ परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळ उपलब्ध करून देण्यात येतील.
- येथील सदरची ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केली म्हणजे संबंधित शिक्षक, प्राचार्य हे वरिष्ठ वेतन निवड श्रेणी साठी पात्र ठरतील असे नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
- प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षण संबंधी काही अडचण किंवा शंका समाधानासाठी दिनांक 2 जून ते १ जुलै २०२2 या कालावधीत सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.. सदरच्या ऑनलाईन मिटिंगचा आयडी व पास कोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा इमेल करू नये.
- तसेच प्रशिक्षणाबाबत तेथील काही शंका अथवा प्रशिक्षण प्रकार बदल, ई-मेल बदल अथवा इतर अनुषंगिक बदल याबाबत आवशक्य तक्रार निवारणासाठी आवश्यक फॉर्म व सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक 3 जून दोन हजार बावीस पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
- ज्या शिक्षक मुख्याध्यापक ,प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक यांनी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली नाही त्यांना सदर प्रशिक्षणासाठी नव्याने नाव नोंदणी बाबत या कार्यालयामार्फत लवकरच सूचना निर्गमित करण्यात येतील.
अधिकृत व्हिडीओ
- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची सुरुवात कशी करावी ?
- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे ?
- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय कसा सोडवावा ?
- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी चाचणी कशी सोडवावी ?
- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण अभिप्राय कसा द्यावा ?
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे ? संपूर्ण मार्गदर्शन
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण संदर्भात दि ३ जून २०२२ ची अधिकृत सूचना
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दि. ०२ जुन २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्यावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापरकर्त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षणार्थी यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
विकास गरड
उपसंचालक (आय. टी व प्रसारमाध्यम व समन्वय )
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
शालार्थ ID नसल्यास त्याजागी काय लिहावे हे सांगणे कारण तिथे इतर options दिले नाहीत
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .