नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणी बाबत...2022-2023

 


नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणी बाबत...2022-2023

         covid-19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे 
 झालेला अध्ययन नुकसान  भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक 
गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेली KRA उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने
 साध्य करण्यासाठी व सन २०२२ -२०२३  या शैक्षणिक वर्षामध्ये 
शैक्षणिक उपक्रमांची उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी
 करणे महत्त्वाचे ठरत आहे. या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्तेचा 
निश्चिती टप्पा संपादित करण्याच्या हेतूने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी 
वर्ष सन २०२२- २०२३  अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक 
उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात 
येत आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता वृध्दि वर्ष सन २०२२ -२०२३ अंतर्गत
 महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम
 सन 2022 23 या शैक्षणिक 
वर्षामध्ये शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करणे. सर्व 
विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांची 
अध्ययन वृद्धी करण्यासाठी राज्य स्तरावरून शैक्षणिक 
उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी साठी मार्गदर्शन
 करणे यावर भर देण्यात येणार आहे. या शैक्षणिक उपक्रमांचा 
अंमलबजावणीसाठी समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शैक्षणिक व 
संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयास आवश्यक निधी
 उपलब्ध करून देण्यात येईल. या शैक्षणिक उपक्रमांचा 
प्रभावी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन आढावा 
समिती द्वारे उपक्रमांची मूल्यमापन याद्वारे राज्यात शैक्षणिक 
गुणवत्ता वृद्धीसाठी प्रेरक वातावरण निर्मिती करून यंत्रणेतील
 सर्व घटकांच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता समृद्धी वर्ष 
22 अंतर्गत पुढील प्रमाणे महत्त्वपूर्ण आणि विशेष शैक्षणिक
 उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
1. झिरो ड्रॉप आऊट मिशन 
               covid-19 संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे 
स्थलांतर झालेली असून तीन ते 18 वयोगटातील असंख्य 
बालके शालाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. अशा बालकांना
 शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी आणि 
शालाबाह्य निर्मित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या 
प्रवाहात दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आउट
 राबविण्यात यावी. राज्यस्तरावरून मार्च 2021 व त्यापूर्वी
 वेळोवेळी शाळाबाह्य मुलांसाठी केलेल्या सर्वेक्षणांमधून
 अपेक्षित माहिती प्राप्त झालेली असून शंभर टक्के
 बालके शाळेत दाखल झालेली दिसून येत नाहीत किंवा
 काही बालके प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याआधीच 
शाळा सोडताना दिसून येत आहेत. कोरोना महामारी 
चा प्रादुर्भाव आहे नंतर प्रथमच सर्वेक्षण हाती घेण्यात 
येत असून सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के 
उपस्थिती आवश्यक आहे. यासाठी बालकांना शालाबाह्य
 होण्यापासून रोखण्यासाठी मिशन झिरो  दिनांक
 पाच जुलै 23 जुलै २०२२ या कालावधीत 
व्यापक स्वरुपात राबविण्यात यावे.
2. पुनर्रचित सेतू अभ्यास 
          शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये 
शालेय कामकाजाची 30 दिवस व दोन चाचण्या अशा
 स्वरूपाचा सेतू अभ्यास परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर 
उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सामान्य विज्ञान, 
भाषा, सामाजिक शास्त्र आणि गणित या विषयासाठी
 कृती आधारित सेतू अभ्यास विकसित करण्यात 
आलेल्या असून या आधारे विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या 
अध्ययन निष्पत्ती संपादित करण्यावर भर देण्यात यावा.
 या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून 
विद्यार्थ्यांची संपादणूक वृद्धी साध्य करण्यास मदत होणार आहे.
३. शाळापूर्व तयारी मिळावे 
                 राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, 
नगरपालिका, च्या सर्व शाळांमध्ये जून 2022 मध्ये इयत्ता
 पहिली प्रविष्ट होणाऱ्या बालकांची शिक्षक ,अंगणवाडी
 सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांच्या मदतीने 
शाळापूर्व तयारी करणे इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल 
पात्र बालकांची 100% पटनोंदणी होण्याच्या दृष्टीने 
पूर्वतयारी करणे आणि इयत्ता पहिलीच्या वर्गात 
बालकांची संक्रमण घडवून आणण्यास मदत 
करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळापूर्व तयारी 
मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. पहिलीला 
दाखल पात्र सर्व बालके व त्यांचे पालक यांची 
शाळेतले पहिले पाऊल पुस्तिका कृतीपत्रिका व 
आयडिया काड्या साहित्याच्या आधारे बालकांची 
शाळापूर्व तयारी करून घेण्याची कार्यवाही शाळा 
स्तरावर करण्यात यावी सदर उपक्रमांतर्गत शारीरिक
 विकास व स्नायू विकास बौद्धिक विकास सामाजिक 
आणि भावनात्मक विकास भाषाविकास गणं पूर्वतयारी 
पालकांना मार्गदर्शन याद्वारे बालकांची 
शाळापूर्व तयारी करण्यात यावी.
४.पायाभूत भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य 
विकसन कार्यक्रम (निपून भारत मिशन)
                 निपून भारत अभियानांतर्गत पायाभूत
 साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम देशातील प्रत्येक
 मूळ शैक्षणिक वर्ष 26-27 पर्यंत इयत्ता तिसरी च्या 
अखेरीस आवशक्य पायाभूत साक्षरता आणि संख्या
 ज्ञान प्राप्त करेल याबाबतची खात्री करण्यासाठी 
सुरू करण्यात आलेली आहे. या सोबतच जी मुले
 इयत्ता चौथी आणि पाचवी या वर्गात आहेत आणि 
ज्यांनी सदर पायाभूत कौशल्य प्राप्त केली नाहीत
 त्यांना आवशक्य क्षमता प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक
 शिक्षक मार्गदर्शन आणि सहाय्य सहाध्यायी कडून
 मदत आणि वयानुरूप व पूरक श्रेणीबद्ध अध्ययन
 साहित्य पुरवून पुरवण्यात येणार आहे यामध्ये 
राज्यातील पूर्वप्राथमिक सर ते इयत्ता पाचवी वर्गापर्यंत
 च्या 100% विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि 
संख्याज्ञान क्षमता विकसित होण्यासाठी शिक्षण 
मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार
 विविध प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य
 शिक्षक अध्यापन मार्गदर्शिका इत्यादी साहित्याची निर्मिती
 करण्यात यावी ही त्यामध्ये 
प्रत्येक मुलाने भाषा आणि गणित या विषयाच्या 
खालील पायाभूत क्षमता संपादित करण्यावर भर 
देण्यात यावा कुटुंब व परिसरातील भाषा वापरातून
 मौखिक भाषेचा विकास शाळापूर्व स्तरावरील प्रारंभिक
 भाषा आणि साक्षरता यांच्या विकासासाठी शालेय 
भाषेची योग्य अभिव्यक्ती सह प्रकटीकरण आणि 
त्यासोबत चांगले श्रवण व आकलन कौशल्य मुद्रित 
आणि दोन्ही विषयक जागरुकता विकसित करणे 
म महत्वाचे आहे राज्यातील पूर्वप्राथमिक इयत्ता 
पाचवी पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या पायाभूत 
भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य क्षमता 
विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक
 सूचनेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी
 अध्ययन साहित्य निर्मिती करण्यात यावी तसेच शिक्षक
 पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासाठी
 वेळोवेळी उपक्रम विषय एक मार्गदर्शक सूचना 
निर्गमित करण्यात याव्यात त्यामध्ये प्रत्येक मुलाने
 भाषा आणि गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता 
संपादित करण्यावर भर देण्यात यावा.
इयत्ता पाचवी पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या पायाभूत
 भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य क्षमता विकसित
 होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 
विविध प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अध्ययन 
साहित्य निर्मिती करण्यात यावी तसेच शिक्षक पालक 
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या साठी वेळोवेळी 
उपक्रम विषयक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात त्यामध्ये प्रत्येक मुलाने भाषा आणि गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता संपादित 
करण्यावर भर देण्यात यावा.
५.इयत्ता पहिली विद्या प्रवेश: शाळा पूर्वतयारी कार्यक्रम 
अंमलबजावणी
               इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी 
निपून भारत अभियान अंतर्गत सन बावीस-तेवीस या 
शैक्षणिक वर्षात सुरुवातीस तीन महिने कालावधी 
असणारा खेळ व कृती यावर आधारित विद्या प्रवेश
 शाळापूर्व तयारी कार्यक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात 
यावा यासाठी शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृती पुस्तिका
 हे साहित्य विकसित करण्यात यावे व शिक्षकांची ही 
उद्बोधन घेण्यात यावे या कार्यक्रमाची राज्यातील सर्व 
शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
६.नियमित मूल्यमापन योजना 
                प्रत्येक विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विशिष्ट
 पाठ्य घटकाचे अध्ययन अध्यापन झाल्यानंतर 
विद्यार्थ्यांना किती प्रमाणात साध्य झाल्या यासाठी 
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमितपणे मागवा घेण्याच्या
 आणि गरजेवर आधारित अध्ययनास मदत करण्याचा
 उद्देशाने नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू 
करण्यात याव्यात सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची
 ठराविक कालावधीने चाचणी घेण्यात यावी व त्या
 आधारे विद्यार्थ्यांनी कोणत्या अध्य निष्पत्ती साध्य केल्या
 व कोणत्या दिन निष्पत्ती साध्य होण्यामध्ये अडचणी 
आल्या याची सद्यस्थिती घेऊन घेऊन या माहितीच्या 
आधारे शिक्षक पालक यांना मुलाची अध्ययनातील 
प्रगती व शिकण्यातील अडचणीचा विचार करून वर्गात 
जपणांमध्ये अध्ययन अनुभवांची रचना करण्यास यावी 
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण 
यंत्रणेतील सर्व पर्यवेक्षीय 
अधिकारी यांचे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी शैक्षणिक
 सहाय्य घेण्यात यावी.
७.आनंदायी अभ्यासक्रम
               शालेय जीवनात आनंद या अभ्यासक्रमाच्या
 माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणातील अभिरुची वाढवणे
 गळतीचे प्रमाण कमी करणे विद्यार्थ्यांची मानसिक 
स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक 
भावनिक संभाषण समस्या निराकरण तसेच 
ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य
 विकसित करणे इत्यादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 
आनंददायी कृतीचे नियोजनाबाबत राज्यस्तरावर
 मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात यामध्ये 
विद्यार्थ्यांनी स्वतः मधून आनंदाला समजणे तो 
अनुभव नाही व तो आनंद मिळवता येणे यासाठी 
या पाठ्यक्रमात सज्जता कथा आकृती अभिव्यक्ती
 या चार घटकांचा समावेश करण्यात यावा या 
घटकांचे साप्ताहिक नियोजन सोमवार मंगळवार
 बुधवार कथा गुरुवार शुक्रवार कृती शनिवार 
अभिव्यक्ती असे स्वरूप असावे सदर अभ्यासक्रमात 
विद विद्यार्थ्यांचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन
 न करता अनौपचारिकरीत्या मूल्यांकन करावे.
८.शिक्षक विदेश आणि राज्य अभ्यास दौरा 
              राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता 
वाढवण्यासाठी देशाबाहेरील शैक्षणिक दृष्ट्या 
पक्रमशील व प्रगत देश आणि भारतातील 
शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर शाळांमधील उपक्रमशील 
व प्रयोगशील शाळा शैक्षणिक संस्था प्रशिक्षण 
कार्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक
 प्रयोगांचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे या 
अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध 
राज्य देशांचा अभ्यास जरा ही योजना राबविण्यात
 यावी शाळा प्रगत करण्यामध्ये आणि शालेय 
गुणवत्ता विकासनासाठी उत्कृष्ट कामकाज 
करणाऱ्या शिक्षकांनी अधिकारी यांना प्रोत्साहन
 देण्यासाठी शिक्षक आणि अधिकारी यांची विहित 
पद्धतीने निवड करून प्रगत राज्य आणि विदेशातील
 नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्याची 
संधी देण्यात यावी.
९.पुरक अध्ययन साहित्याचा वापर
               विद्यार्थ्यांच्या देण्यासाठी छापील स्वरूपात
 पूरक अध्ययन साहित्य राज्यस्तरावर विकसित 
करण्यात यावे यामध्ये वयानुरूप प्रवेशित मुलांसाठी 
विद्यार्थी मित्र पुस्तिका इयत्ता पहिली ते पाचवीच्या 
विद्यार्थ्यांसाठी भाषा व गणित विषयासाठी कार्यपुस्तिका 
विद्या प्रवेश शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृती पत्रिका
 पहिले पाऊल पुस्तिका कृतिपुस्तिका व आयडिया 
काढ इत्यादीचा समावेश करण्यात यावा या पूरक
 खाद्य साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन आणि विषय निहाय अध्ययन निष्पत्ती संपादणूक विकसित होण्यास मदत होईल.
१०.शाळा सुशोभीकरण स्वच्छता व अध्ययन समृद्धी व शालेय परिसर
                 सलग दोन वर्षांच्या कालावधीत नियमितपणे
 शाळा सुरू झाल्या नसल्याने यावर्षी नियमितपणे वर्ग 
सुरू झाल्यानंतर शाळेमध्ये नव्याने चैतन्य आणि आनंददायी
 वातावरण निर्माण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची 
आवश्यकता आहे घर आणि गरम परिसरा नंतर शाळेशी 
विद्यार्थ्यांची नाळ घट्टपणे जोडलेली असते आपल्या शाळेची
 वर्गाची आपुलकी आणि जवळीक निर्माण व्हावी या दृष्टीने
 विद्यार्थ्यांना गटानुसार शालेय भेटीवर कपडे आणि इतर
 शालेय परिसराची स्वच्छता सुशोभीकरणाचे 
जबाबदारी देणे यासारख्या उपक्रमांचे आयोजन 
करण्यात यावे यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थी आणि शालेय
 व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मदतीने 
वर्गखोल्या प्रयोगशाळा आणि शाळेचा इतर 
परिसर हा विषयातील संकल्पनांवर आधारित 
आकृत्या चेन्नई संबोध दर्शवणाऱ्या बोलक्या 
भिंती पोस्टर फलक लेखन करून सुशोभित 
करण्यात यावा वर्गामध्ये आणि वर्गा बाहेरील 
विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी मिळावी या दृष्टीने
 नावीन्यपूर्ण व कलात्मक उपक्रमांची आखणी करून अंमलबजावणी करावी.
१1.मिलाप 
               आजच्या विद्यार्थ्यांचा पुढे भविष्यात 
येणारे तंत्रज्ञानातील बदल जागतिकीकरणाचे 
अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे 
जाण्यासाठी लागणारे 21 व्या शतकातील तंत्रज्ञान 
आणि जीवन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे 
आहे याच उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ही
 योजना भविष्यात सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या
 दृष्टीने अमलात आणली आहे या योजनेअंतर्गत 
शिक्षणाची उद्योगाची सांगड घालून विद्यार्थ्यांना करियर 
डेवलपमेंट असे विविध पर्याय आणि उद्योग उद्योग त्यांच्या
 मानसिकतेचा विकास करण्याची उपक्रम 
हाती घेण्यात यावे.
१२.शिक्षण दूत 
               शासकीय शाळांमध्ये शिक्षण 
घेऊन विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन
 करणारे विद्यार्थी हेच दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचे खरे 
दूत आहेत असे कुणी विद्यार्थी जिल्ह्याचे शिक्षण दूत 
म्हणून काम करतील जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या 
हस्ते त्यांचा सत्कार करण्यात यावा.
         
वरील सर्व शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी 
खालील प्रमाणे करण्यात यावी.
 एक. आयुक्त शिक्षण पुणे या उपक्रमासाठी नोडल 
अधिकारी म्हणून काम पाहतील. या उपक्रमांतर्गत
 राबवण्यात येत असलेल्या प्रत्येक उपक्रमाच्या
 अंमलबजावणीसाठी आवश्यक ते मार्गदर्शक 
सूचना व कालबद्ध कार्यक्रम आयुक्त आणि सर्व 
अंमलबजावणी यंत्रणा कमी करावा.
 दोन सर्व शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी अंमलबजावणी
 राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण 
परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
 परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत करावी. 
तीन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे मधील 
प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता, विषय 
सहाय्यक ,शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक 
उच्च माध्यमिक ,शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी, 
गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख 
विषय साधन व्यक्ती विशेष विषय साधन व्यक्ती 
इत्यादी पर्यवेक्षीय यंत्रणा यांनी शैक्षणिक गुणवत्ता 
वृद्धी वर्ष दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत 
महत्त्वपूर्ण आणि विशेषणे उपक्रम अंमलबजावणीसाठी
 वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करावी.
 चार  या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 
आवश्यक की निधी अंमलबजावणी करणारी 
यंत्रणा वेळेस वेळेत उपलब्ध करून देण्याची 
कार्यवाही राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र 
प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी करावी.
 पाच परिवेक्षक यंत्रणेतील सर्व घटक यांनी 
शैक्षणिक उपक्रमासाठी राज्यस्तरावरून 
निर्देशित केलेल्या सूचनेनुसार पुढाकार सक्रीय
 सहभाग आणि समन्वय साधून जिल्हास्तरावर 
उपक्रम अंमलबजावणीचे नियोजन करावे.
सहा. शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीसाठी शाळा 
आणि शिक्षक यांना आवश्यक ते शैक्षणिक सहकार्य 
करावे तसेच प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण 
निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.
सात शैक्षणिक  उपक्रम अंमलबजावणीनंतर 
उपक्रमांच्या मूल्यमापनासाठी राज्यस्तरावरून 
निर्देशित केलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी
 आणि उत्तम कामगिरी करणार्‍या शाळा केंद्र तालुका
 आणि जिल्हा यांची माहिती संकलित करावी.
आठ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक 
पर्यवेक्षक यंत्रणेतील अधिकारी यांना उत्कृष्ट 
कामगिरीसाठी सन्मानित करण्यासाठी माहिती 
संकलित करावी त्यानुसार राज्य स्तरावरून त्यांचा
 यथोचित सन्मान करण्यात येईल.
 नऊ. राज्य स्तरावर निर्णय निर्गमित केलेल्या 
मार्गदर्शक सूचनेनुसार गुणवत्ता वृद्धीसाठी राबविण्यात 
येणाऱ्या उपक्रमांची सोबतच जिल्ह्यातील इतर नाविन्यपूर्ण
 शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीचा यशोगाथा यांची
 संकलन करावे.

खालील शासन निर्णयात आपण सविस्तर पाहू शकता.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.