बदली प्रक्रीयेबाबत महत्वाचे परीपत्रक दि १० जून २०२२

   



 बदली प्रक्रीयेबाबत महत्वाचे  परिपत्रक दि १० जून २०२२

अर्थ,सूचना व स्पष्टीकरण    

             जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार असून त्यासाठी दि १० जून २०२२ च्या महत्वाच्या परिपत्रकामध्ये खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

1) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणाली www.ott.mahardd.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर संकेतस्थळाबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच सर्व शिक्षकांना अवगत करावे व सदर संकेतस्थळावर दररोज भेट देऊन संकेत स्थळावर कार्यवाहीची मर्यादा देखील कटाक्षाने पाहण्याच्या सूचना द्याव्यात.

 2) राज्यात covid-19 तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्हा परिषद यांच्या संच मान्यता अध्याप  पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत सण 21-22 संचमान्यता या २०-२१  संचमान्यते प्रमाणे कायम ठेवाव्यात असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील दिनांक ९ जून २०२२  च्या पत्रान्वये दिलेले आहेत. त्यामुळे सन 2022 या वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या सन 2020 21 संच मान्यता विचारात घेऊन कराव्यात.

3) covid-19 आजाराच्या कारणास्तव बऱ्याच जिल्हा परिषदेच्या रोस्टर ची विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासणी झालेले नाही. त्यामुळे संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार या वर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वी रोस्ट ची तपासणी करून घेतली असल्यास त्यानुसार सदर बदल्या कराव्यात. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी निर्णय घ्यावा.

 4 ) काही शिक्षकांच्या बदल्या संदर्भात माननीय न्यायालयाचे आदेश असल्यास सदर आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. एखाद्या शिक्षकाची एका विशिष्ट शाळेतून दुसऱ्या विशिष्ट शाळेत बदली करण्याचे  न्यायालयाची विवक्षित आदेश असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वप्रथम अशा शिक्षकांची ऑफलाइन पद्धतीने बदली करावी.

             तसेच काही शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणी फक्त अर्जदार यांच्या बदली संदर्भातील विनंतीचा विचार करण्याचे न्यायालयाचे निर्देश असल्यास, असे शिक्षक बदली पात्र नसतील तरीही अशा शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये भाग घेण्याबाबत लेखी कळविण्यात यावी व त्याची पोहोच ठेवावे. 

5. आंतर जिल्हा बदली प्रकरणात बदलीपात्र शिक्षकाकडे ज्या जिल्हा परिषदेमध्ये जायचे आहे त्या जिल्हा परिषदेकडील बिंदु नामावली नुसार पद रिक्त असल्याचे भविष्यात रिक्त होणार असल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आहे. अशा शिक्षकांचा ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षकांत समावेश करावा.

         तसेच सदर संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी सेवाज्येष्ठता हाच निकष असल्याने त्यांच्या सेवा जेष्ठ प्रमाणे जेष्ठता विचारात घेण्यात यावी. सेवाजेष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचार्‍याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा जन्मदिनांक एक असल्यास इंग्रजी आद्याक्षरा प्रमाणे आडनाव प्रथम असणाऱ्या कर्मचाऱ्याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा.

 6. संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन / पदस्थापना सदर ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावे.

१० जून २०२२ चे  खालील परिपत्रक पहा. 

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. बदली यादिमध्ये बऱ्याच शिक्षकांना त्यांच्या़ मनाप्रमाणे शाळा मिळाल्या नाहित कारनं सेवा जेष्टातेनुसार पसंतीक्रम मिळाले नाहीत क्रपाया यादि दुरूस्त करावी

    उत्तर द्याहटवा
  2. बदली याद्या दुरुस्थ कराव्यात

    उत्तर द्याहटवा
  3. बदली याद्या दुरुस्थ कराव्यात

    उत्तर द्याहटवा
  4. शाळेतील सेवाज्येष्ठता सारखी असेल तर जेष्ठ कोण आहे याबाबत जी आर असेल तर पाठविणे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .