बदली प्रक्रिया २०२२ उपस्थित मुद्यांचे स्पष्टीकरण
बदली पोर्टल साठी नियुक्त विन्सीस सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड,पुणे यांनी शासनाला जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या बाबत दिनांक 1 जून 2022 ला पत्र पाठवून काही संदिग्ध मुद्यांबाबत स्पष्टीकरण / मार्गदर्शन मागवले होते . त्या संदर्भात शासनाचे उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां दिनांक 7 एप्रिल 2019 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भातील दि ३ जून २०२२ पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांवर बाबतचे स्पष्टीकरण केले.हे त्यानुसार संगणकीय बदली प्रणालीमध्ये आवश्यकता असल्यास सुधारणा करण्यात याव्यात असेही शासनाने सुचवले आहे.
खाली आपण सविस्तर परिपत्रक व संदिग्ध मुद्यांचे स्पष्ठीकरण पाहू शकता.
प्रशिक्षण बाबत
महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी राज्यातील सर्व CEO ना दि ७ जून २०२२ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि .......
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 चा दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित दोन धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई करण्याबाबत (बदली पात्र असलेल्या, विषय संवर्ग 1 मधील, विशेष संवर्ग दोन मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी बाबत) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत.
सदर धोरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन 2022 मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक ८ जून २०२२ रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी सदर प्रशिक्षणास आपण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद यांच्यासह उपस्थित रहावे ही विनंती सदर प्रशिक्षणाची V C लींक यथावकाश कळविण्यात येईल.
परिपत्रक खाली पाहू शकता.
सर्वसाधारण क्षेत्रात 10वर्ष व कार्यरत सर्वसाधारण क्षेत्रात 3 वर्षे पूर्ण झालेला शिक्षक बदलीपात्र आहे का
उत्तर द्याहटवाएकक unit बदली लाभ आहे ना
उत्तर द्याहटवारीप्लाय लवकर द्या
उत्तर द्याहटवाआपसी बदली असल्यास पूर्वीच्या जिल्ह्यातील दोघांपैकी कमी असलेली सेवा सेवाजेष्ठतेसाठी धरणार का?
उत्तर द्याहटवाSir, vishesh sanvrg -2 sathi sevichi at aahe ki nahi...
उत्तर द्याहटवासर्व चार मधून बदली झाली आहे आणि आता संवर्ग एक मध्ये आहे शाळेवर तीन वर्ष झाली आहेत बदली होईल काय
उत्तर द्याहटवाआपसी आंतरजिल्हा बदलीसाठी बदलीपात्र दिनांक कोणती?
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .