Student Portal मध्ये विद्यार्थी जात,प्रवर्ग,आधार व इतर माहिती कशी भरावी ? भरलेला data कुठे पाहावा ?

 


Student Portal मध्ये  विद्यार्थी जात,प्रवर्ग,आधार व इतर माहिती कशी भरावी ? भरलेला data कुठे पाहावा ?

   

  • प्रथमता स्टुडंट पोर्टल ला जाऊन यु-डायस ,पासवर्ड टाकून, Captcha code टाकून लॉग इन करावे.
  •  login केल्यानंतर Student Entry  या टॅब मध्ये update student Details या tab  जावे लागेल . खालील स्क्रीन वर पहा.



  • त्या ठिकाणी आपणास इयत्ता व तुकडी निवडावी लागेल त्यानंतर GO म्हणावे लागेल. Go म्हटल्यानंतर आपल्या समोर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल.
  •  ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी व कास्ट भरलेली आहे ती भरलेली दिसेल. ज्यांची भरलेली नसेल ती blank दिसेल. खालील स्क्रीन वर पहा.




  • ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे , त्या विद्यार्थ्यांच्या नावापुढील Update या बटनाला क्लिक करून त्या विद्यार्थ्यांची राहिलेली माहिती भरण्यासाठी आपणासमोर खालील प्रकारची  स्क्रीन  दिसेल.



  •  आता तुम्हाला समोर दिसणाऱ्या या पेजवर विद्यार्थ्यांची कॅटेगरी,कास्ट भरावी लागेल. याच्यामध्ये महत्त्वाची माहिती स्टार केलेली आहे. स्टार केलेली माहिती बंधनकारक असून विशेषता मोबाईल नंबर आपणाला टाकावाच लागेल. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे Religion,Category,Caste  ही माहिती भरणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती राहिली असेल अशा विद्यार्थ्यांची आधार माहिती देखील आपणाला भरून सर्व माहिती भरुन झाल्यानंतर खाली सेव बटनला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन वर पहा.



  • save  म्हटल्यानंतर या विद्यार्थ्यांची माहिती सेव्ह होणार आहे. 




शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा इयत्ता निहाय  Filled व Pending data कुठे पहावा ?

(Religion,Category,Caste,Medium,Disability,Birth Address,Permanent, Address,Current Address)


  •  विद्यार्थ्यांचा टाटा किती भरलेला आहे हे पाहण्यासाठी प्रथमतः आपणास रिपोर्ट या टॅबमध्ये स्टेटस याच्यामध्ये आपणास फेज टू ह्याला क्लिक करावे लागेल. खालील स्क्रीन वर पहा.





  • फेज २ ला  क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वर्ष निवडावे लागेल वर्ष २१-२२ निवडल्यानंतर GO ला click कराव लागेल.




  •  गो म्हटल्यानंतर आपणासमोर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा डाटा दिसेल याच्यामध्ये वर्गनिहाय कोणत्या विद्यार्थ्यांची माहिती फिल्ड केलेली आहे आणि पेंडिंग राहिलेली आहे अशी संख्यात्मक घोषवारा याठिकाणी आपणाला दिसेल. आपल्या शाळेतील वर्गातील कोणत्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची राहिली आहे. ती सर्व माहिती याठिकाणी संख्यात्मक  आपणास स्क्रीनवर दिसेल. खालील स्क्रीन वर पहा. हि माहिती चेक करावी लागेल. माहिती भरण्यासाठी आपणास अपडेट स्टुडन्ट डिटेल्स या tab  जावे लागेल .




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.