ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उद्बोधन सत्र - ३ रे ,दि १७ जून २०२२
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत तक्रार निवारण साठी येथे click करा.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी खालील apps चा वापर करा .
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत उद्बोधन मार्गदर्शन सत्र दि ३ जून २०२२ youtube Live link येथून थेट पहा.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत उद्बोधन मार्गदर्शन सत्र दि १ जून २०२२ youtube Live link येथून थेट पहा.
प्रशिक्षण सूचना
राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व अध्यापक , प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक 1 जून 2022 पासून सुरू होत आहे. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण 94 हजार 541 नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात येणार असून यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचेमार्फत विकसित प्रशिक्षण E कोर्स पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय चाचणी सोडून वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे. सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण पन्नास ते साठ तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण तीस दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपामध्ये एकूण तीस दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहेत. सदरची ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मात्र प्रशिक्षणार्थ्यांनी त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण बाबतची सर्व माहिती दिनांक 1 जून २०२२ रोजी सकाळी 11 वाजता https://youtu.be/bOXSWx5NHlw या युट्युब लाईव्ह सत्रा द्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींनी सदर उद्बोधन सत्रास उपस्थित राहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थींसाठी दिनांक 1 जून 2022 पासून 30 जून 2022 पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दिनांक 1 जून २०२२ रोजी आयोजित युट्युब लाईव्ह सत्रा द्वारे दिली जाईल.या संदर्भातील परिपत्रक खाली थेट किंवा येथे click करून पहा दि ३० मे २०२२ .
- दुबार इमेल यादी
https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx
- अवैध इमेल यादी
https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist1.aspx
- कृपया आपला ई मेल आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो खालील पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.चुकीचा मेल आपण बदलण्यासाठी येथे click करा.यासाठी आपणास आपल्या नोंदणी क्रमांकाची आवश्यकता आहे .
- प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ची सदर अधिकृत वेबसाईट असून सर्व सूचना परिषदे मार्फत याच ठिकाणी देण्यात येतील .
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्याकरिता सदर वेबसाईट असून सर्व माहिती खालील वेबसाईट वर देण्यात येत आहेत .
http://training.scertmaha.ac.in/
- नोंदणी करतांना काही अडचण आली असेल ,आपल्याला लाॅगिन आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईल वर SMS अथवा रजिस्टर मेल वर आला नसेल तर खालील मेलवर संपर्क साधावा. तसेच प्रशिक्षणासंबंधी अद्यावत इतर माहिती साठी देखील खालील लिंक वर संपर्क साधू शकता.
- प्रशिक्षण साठी लिंक भरलेली व निवड झालेली यादी आपण खालील लिंक वर जिल्हा व तालुका निवडून पाहू शकता.
- नोंदणी व दुरुस्ती प्रकीयेसाठी सदर लिंक देण्यात आली आहे .या साठी आपला नोंदणी क्र आवश्यक आहे .
- प्रशिक्षणाविषयी अधिक जाणून घ्या .
- वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्ठ व पात्रता निकष पहा .
- निवड श्रेणी प्रशिक्षण उद्दिष्ठ व पात्रता निकष पहा .
- वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत scert च्या अधिकृत खालील सूचना आपण पाहू शकता.
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.
अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/
📌ट्विटर :https://twitter.com/scertmaha
📌फेसबुक :https://www.facebook.com/MahaSCERT
📌 युट्यूब:https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw
एम डी सिंह,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
Plz provide a senior grade training date
उत्तर द्याहटवानिवड श्रेणी प्रशिक्षण date व टायमिंग पाठवा
उत्तर द्याहटवामाझी व्हिडिओ आता दिसत नाहीत
उत्तर द्याहटवाVideo पूर्ण दिसत नाही
उत्तर द्याहटवाएकही video आत्ता पर्यंत open zala nahi
उत्तर द्याहटवाNivad shreni che maze swadhyay ajun 5/6 baki ahe and mi gramin bhagatil asalyane network problem ahe teri mala vel wadhwun dyava hi namra vinanti ahe pls.
उत्तर द्याहटवाBy mistake on SR grade certificate at the place school my name is printed, how to change school name on certificate please guide me
उत्तर द्याहटवाI have completed my training with test and survey yesterday when can I download the certificate plz guide or any notification will be provided
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .