KRA उद्दिष्टे २०२२-२०२३

 


KRA उद्दिष्टे २०२२-२०२३ 

महाराष्ट्र शासनाने दि २३ मे २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची KRA उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत .

  • KRA उद्दिष्टे म्हणजे  काय ?

KRA  म्हणजे Key Result Area.

  • आपण सन २०२२-२०२३ साठीची शिक्षण विभागाची निश्चित केलेली KRA उद्दिष्टे पाहू . खालील उद्दिष्टे आहेत .

1)प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लर्निंग आऊट कम्स (lEARNING OUTCOMES) मध्ये दहा टक्क्यांनी वाढ करणे.

2)  स्कूल एम आय एस प्रणालीचे विकसन करून ते Usear Acceptance Testing  टप्प्यापर्यंत चे काम पूर्ण करणे.

3)  शासकीय अनुदानित व आरटीईअंतर्गत 25 टक्के शुल्क प्रतिपूर्ती चा लाभ घेणाऱ्या खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी व वैधता पूर्ण करणे.

4)  Command कंट्रोल सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करणे.

5) BISAG द्वारे १२ शैक्षणिक  Channel सुरु करणे.

6) इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी चा E कन्टेन्ट विकसित करणे .

7) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन प्रणाली साठी सीएमपी प्रणाली लागू करणे. 

8) वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करून जवळपास 94 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

9) परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) मध्ये 50 गुणांची वाढ करणे. 

10) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे सुरू करणे. 

11) भविष्यातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी Athlets / ॲथलेटिक्स घडवणे आणि त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट क्रीडा विज्ञान केंद्र बालेवाडी पुणे येथे विकसित करणे.

12) समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे.

13) स्टार्स प्रकल्पांतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे.

14) मध्यान्न भोजन अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे.

15) विभागाचा व अखत्यारीतील  कार्यालयांचा आकृतीबंध तयार करणे .

16) विभागाचा व अखत्यारीतील कार्यालयांचा वाहन आढावा घेणे.

           

वरील KRA उदिष्टे आपण खाली शासन निर्णयामध्ये पाहू शकता व download करू शकता.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.