जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली पदावधीची परिगणना,सेवा संदर्भ / अहर्ता दिनांक ३० जून बाबत शासन निर्णय दि ४ मे २०२२
शासनाने दि ४ मे २०२२ रोजी बदली बाबत विशेषता बदली संदर्भ / अहर्ता दिनांक बाबत GR निर्गमित केला आहे .GR च्या प्रस्तावने मध्ये असं सांगितलं आहे कि , जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबतचा निर्णय शासनाने दिनांक सात एप्रिल 20२१ च्या शासन निर्णयान्वये घेतलेला आहे. सदर शासन निर्णय मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत करण्यात याव्यात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि 2019 मधील बदली प्रक्रिया 31 मे नंतर पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना 15 जून नंतर शालेय कामी हजर व्हावे लागले. त्यामुळे सन 2019 च्या बदली प्रक्रियेतील अतिदुर्गम भागातील कार्यरत शिक्षक हे त्या पदावरील तीन वर्षाचा कालावधी दिनांक 31 मे 22 पर्यंत पूर्ण करीत नसल्यामुळे त्यांच्यावर सन 2022 मध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेमध्ये अन्याय होणार असल्याने यात सुधारणा करावी अशा स्वरूपाची निवेदने शासनाकडे प्राप्त झालेली आहेत. याकरिता दिनांक 7 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयातील 31 मे याऐवजी ३० जून 2022 अखेरपर्यंत परिगणना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या नुसार शासनाने असा शासन निर्णय निर्गमित केला कि,
शासन निर्णय
सन 2022 मध्ये होणाऱ्या बदल्या करिता पदावधीची परीगणना दिनांक 31 मे ऐवजी दिनांक 30 जून 2022 पर्यंत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रमाणे पदावधी ची परिगणना ही केवळ सन 2022 मध्ये होणाऱ्या बदल्यांसाठी लागू असेल.
३० जून संदर्भ/ अहर्ता दिनांकामुळे बदल्यांवर कोणता परिणाम होईल / बदली प्रकीयेमध्ये कोणता बदल होईल ?
टीप : हा बदल फक्त याच वर्षीच्या बदल्यांकरिता असेल.
बदल्या कधी होणार आहे हे केवळ माहितीच पाठवतात प्रत्यक्ष कार्यवाही शून्य
उत्तर द्याहटवाछान मुद्देसूद स्पष्टीकरण. हल्ली ब्लॉगच्या प्रसिध्दीसाठी GR च्या फक्त pdf ची लिंक द्यायची, हे सध्या चालू आहे. परंतु आपण त्यावर दिलेले विश्लेषण वेगळेपण दाखवून देते.
उत्तर द्याहटवासंवर्ग 1मधील शिक्षक 4वर्ष शाळेवर झालेल्यानां खो देऊ शकतील काय?
उत्तर द्याहटवाNo
हटवाvisthapitancha kontach vichar zala nahi, 2018 madhe eka shalevar 3varsh asa g.r.hota ata te5 var kele ahe mag ha 2018 madhil visthapitavaril anyay navhe ka
उत्तर द्याहटवानमस्कार सर ,माझी बदली सन 2016 साली विनंती बदलीने झाली, त्या पूर्वी मी ज्या शाळेत होतो ती शाळा अवघड क्षेत्रात होती ., त्यामुळे 27/2/2017 बदली जी आर., पूर्वी बदली असल्याने मला कोणताही लाभ मिळाला नाही,आज माझी शाळा सुगम क्षेत्रात आहे, त्या शाळेत जून महिन्यात 6 वर्षे सेवा झाली, पूर्वी अवघड क्षेत्रात काम केले असल्याने मी आता पात्र नाही, परंतु अवघड क्षेत्र जाहीर केल्यानंतर माझी पूर्वी ची शाळा सुगम झाली,आता माझी बदली होईल,का? पूर्वी अवघड क्षेत्रात काम केले चा लाभ मिळेल का?
उत्तर द्याहटवाया शाळेवर 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर बदली पात्र व्हाल....
हटवासर बदली पात्र कालावधी हा शाळेवर उपस्थितीत दिनांक ला धरून होईल का की बदलीच्या आदेश आलेल्या दिनांक ला धरून सेवा कालावधी धरल्या जाईल
उत्तर द्याहटवाअवघड क्षेत्र नवीन घोषित धरणार आहेत की फक्त मागील अवघड शाळा यादी की मागील अवघड शाळा यादी सम्पूर्ण व त्यात नवीन वाढीव अवघड शाळा
उत्तर द्याहटवासन 2020 ला झालेल्या बदल्या फक्त विनंतीने रिक्त जागेवर ऑफलाईन पद्धतीने ऑगस्ट २०२० ला झाल्या होत्या .
उत्तर द्याहटवापुढील वर्षी होणाऱ्या बदल्यांना सुद्धा या वर्षी प्रमाणे सुट मिळाली पाहिजे
नमस्कार सर माझी बदली सण २०१८ मध्ये झाली असून मी सद्याच्या शाळेत ४वर्ष आणि एकूण सुगम क्षेत्रात सलग १०वर्षा पेक्षा जादा सेवा केली आहे पण या नवीन जीआर प्रमाणे मीवयाची ५३ वर्ष १ जून२२ लापुर्णकेल्याने सवरग १मध्ये गेल्याने माझी या वर्षी बदली होईल काय
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .